मुलगा आणि मुलगी यांच्यातली निखळ मैत्री हल्ली बरीच मोकळी झालीय, बोल्ड झालीय. बहीण आणि गर्लफ्रेंड यांचा सुवर्णमध्य म्हणजे मत्रीण असं काहीसं मुलांसाठी असतं. मुलगा – मुलगी एकत्र दिसली की ‘कुछ तो चक्कर है’ असं म्हणणारी पिढीही आता बदललीय. प्रेमाची सुरुवात मैत्रीने होते, पण प्रत्येक मत्रीचं प्रेम होत नाही हे समजणारी पिढी तयार झाली आाहे.
एकदा अर्थशास्त्राच्या तासाला जाहिरातींचा विषय निघालेला. पूर्वी एखाद्या साबणाच्या जाहिरातीत मुलगा मुलीकडे आकर्षति होत आहे हे दाखवण्याकरिता दोन गुलाबांची फुलं एकमेकांच्या जवळ आलेली दाखवायचे आणि तिथे ती जाहिरात संपायची, असं आमच्या मॅडम म्हणाल्या. स्त्री-पुरुष संबंधांचं ऑन स्क्रीन प्रदर्शन हे इतकंच होतं. इन फॅक्ट हा परमोच्च िबदू होता. त्यानंतर हळूहळू मुलगा-मुलगी हातात हात घालून दिसायला लागले.. असं करत करत आज इथवर आलो. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एक मुलगा – मुलगी आपसात हसून- खेळून बोलताहेत म्हणजे ‘कुछ तो चक्कर है’ असं सरसकट मानणारी पिढीही आता बदललीय. ते एकमेकांचे खूप छान मित्र-मैत्रीण असूच शकतात आता.
मत्रिणींशी बोलायचे विषय आणि मित्रांशी बोलायचे विषय आजही थोडे वेगळे आहेत. पण आपल्या भावना, समस्या, विचार.. अगदी सगळं सगळं स्पष्टपणे बोलण्याइतकी मोकळीक या मत्रीच्या नात्यात निर्माण झाली आहे. तीन-चार मित्रांसोबत एकटी मुलगी आज निर्धास्तपणे फिरताना दिसते. तो तिचा निष्काळजीपणा नव्हे, विश्वास असतो. त्या दोस्तांशी खरंच तिचं तेवढं घट्ट नातं असतं. मुलंसुद्धा तितक्याच मोकळेपणाने आपल्या मत्रिणीच्या जवळ असतात. घरातले प्रॉब्लेम्स असोत वा मुलगी पटवण्याची पद्धत.. सगळं काही आपल्या मत्रिणीबरोबर शेअर करता येतं. बहीण आणि गर्लफ्रेंड यांचा सुवर्णमध्य म्हणजे मत्रीण असं काहीसं मुलांसाठी असतं. त्यामुळे तिला तिच्या हॉटनेसची कॉम्प्लिमेंट देणारेसुद्धा मित्रच असतात आणि जबाबदारी ओळखून रात्री दारापर्यंत सोडणारेसुद्धा मित्रच असतात. अशा नात्यावर शंका घेणारी मंडळी शंका घेतच राहतात; पण या मोकळेपणाला उघडपणे विरोध होणं मात्र कमी होत चाललंय. आपली शंभर अफेअर्स असली तरी ‘मत्रिणी’कडे ‘त्या’ दृष्टीने पाहण्याची इच्छा सहसा मुलांना होत नाही. दोस्तीतली यारी सच्ची असली की प्रेमभावना आणि मत्रभावना यांच्यातला फरक नक्कीच समजून करता येतो. प्रेमाची सुरुवात मत्रीपासून होते असा म्हणतात; पण प्रत्येक मत्रीचं प्रेम होत नाही हे समजणारी पिढी तयार झाली आहे. त्यामुळे हक्कानं मुस्काट फोडण्याचा आणि तितकीच कडकडून मिठी मारण्याच्या मत्रीच्या नात्यात बऱ्यापैकी बोल्डनेस आला आहे.
छाया : गार्गी गीध