कॉलेजिअन्स परीक्षा संपताच कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला, दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला लागलेत. कंदील करण्यासाठी रात्रभर जागरण करायचं. फराळावर यथेच्छ ताव मारून पुन्हा एकदा लहान होऊन मनसोक्तपणे दिवाळी साजरी करायचीये. अशा अनेकविध गप्पांनी सध्या कॉलेज कॅम्पस गजबजू लागलाय.. अशा या दिवाळीप्रेमी कॉलेजिअन्ससाठी दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा आणि बरंच काही…
दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहणारे कॉलेजिअन्स परीक्षा संपताच कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला, दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला लागलेत. कंदील करण्यासाठी रात्रभर जागरण करायचं. नवनवीन ड्रेसेससाठी आईकडे हट्ट धरायचाय.
फराळावर यथेच्छ ताव मारून पुन्हा एकदा लहान होऊन मनसोक्तपणे दिवाळी साजरी करायचीये. अशा अनेकविध गप्पांनी सध्या कॉलेज कॅम्पस गजबजू लागलाय.. अशा या दिवाळीप्रेमी कॉलेजिअन्ससाठी दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा आणि बरंच काही..
दिवाळी म्हटलं की घराघरात उत्साह,आनंद आणि जोश! आकाशकंदील, रांगोळ्या, दिवे, फटाके, दिवाळीचा फराळ, नवीन कपडे, शुभेच्छा पत्र, फोन, एसएमएस, ई-मेल्स, हल्लागुल्ला! म्हणूनच दिवाळीला सणांचा राजा म्हणतात. कोणत्याही सणांना इतके महत्त्व असत नाही जितके की आपण या दिव्यांच्या सणाला देतो.अगदी धनत्रयोदशी, वसूबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत मस्त चार-पाच दिवस चालणाऱ्या या सणादरम्यान कॉलेजिअन्सच्या परीक्षा संपल्याने त्यांच्यातील उत्साह नुसता सळसळत असतो, त्यामुळे दिवाळी म्हंटलं की या कॉलेजिअन्सच्या डोळ्यांसमोर सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे दिवाळीसाठी करावयाचं प्लॅिनग. परीक्षेचा शेवटचा पेपर अगदी टाकल्यासारखा लिहिला जाऊन कधी एकदा परीक्षा संपते आणि दिवाळीची सुट्टी जाहीर होते असं या मुलांना झालेलं असतं. त्यांच्यासाठी दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा. रात्री उशिरा झोपूनही दिवाळीच्या दिवशी मात्र आईच्या एका हाकेने जागं व्हायचं केवळ पहिल्या आंघोळीनंतर चिराट फोडण्याची मजा लुटायला तसेच अंगाला येणाऱ्या सुगंधी उटण्याचा वास घ्यायला आणि मग नवीन कपडे घालून सज्ज व्हायचं दिवाळी साजरी करायला. घरोघरी जाऊन फराळावर यथेच्छ ताव मारायचा. बहिणीने काढलेली रांगोळी विस्कटायची आणि भावंडांबरोबर दंगा करून घर डोक्यावर घ्यायचं. फुटलेल्या फटाक्यांच्या कचऱ्यात न फुटलेले फटाके शोधायला जायचं आणि लहानग्यांसारखं खटय़ाळ दिवाळी सेलिब्रेशन करायचं. आज्जी-आजोबांसाठी, मित्रपरिवारासाठी हाताने भेटकार्ड बनवायचं, धाकटय़ा भावा-बहिणीची दिवाळी गृहपाल्लाची वही सजवायची तर त्यांच्या हस्तकलेसाठी मिठाईचे बॉक्सही जमवायचे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गड किल्ले बांधण्याची धमाल अनुभवून दिवाळी साजरी करायची. किल्ला करायचा. या किल्ला प्रकारामुळे या तरुणांच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळतेच पण ऑफिशियली चिखलात खेळायला मिळतं ती गोष्ट वेगळी. मामाला फटाक्यांसाठी मस्का लावायचा. फटके मिळाल्यावर एवढेसेच फटाके! म्हणून अन्नत्याग करायचा आणि मग हट्टापायी आणिक जास्त फटाके मिळाल्यावर रुसवा फुगवा सोडून प्रदूषणाची तमा न बाळगता भरपूर फटाके फोडायचे. लवंगीची माळ सुटी करून वाजवायची. नरक चतुर्दशीला सकाळी पहिला फटाका कोण लावणार त्याची स्पर्धा लावायची, फोडलेल्या फटाक्यांच्या कागदाचा धूर करायचा आणि दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटायचा. फटाक्याच्या बॉक्सवरील रंगीत स्टिकर्स जमवून लहानग्यांमध्ये वाटून टाकायचे आणि मग हे सगळं करता करता दिवाळीची सुट्टी संपली म्हणून आईपुढे खट्ट व्हायचं आणि दुसऱ्या दिवशीच मित्र-मत्रीणींना दिवाळीची धमाल रंगवून सांगण्यासाठी कॉलेज कट्टय़ावर सगळ्यात आधी हजर व्हायचं आणि साऱ्यांनी मिळून म्हणायचं ‘दिन.दिन.दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी.’
दिवाळीच्या दिवसांत जसा फराळ खाण्याचा उत्साह मावळत नाही त्याचप्रमाणे शॉिपगचा उत्साहही मावळूच शकत नाही. दिवाळी ही शॉिपगपासून हॉलीडे-आऊटिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी हक्काचं निमित्त. त्यामुळे कॉलेजिअन्सच्या दिवाळी प्लॅिनगमध्ये शॉिपग फंडा हा विशेष भाग असतो. सध्याच्या तरुणाईचा जुन्या-नव्याची सरमिसळ असलेल्या पेहरावाला पसंती देण्यास अधिक कल आहे. म्हणजे बघा हं, एकीकडे पब आणि डिस्कोमध्ये इवले इवले कपडे घालून जाणाऱ्या जनरेशनला दिवाळीच्या वेळी मात्र पक्के ट्रॅडिशनल कपडे हवे असतात. शरारा, साडी आणि चक्क नऊवारीसुद्धा. म्हणजेच शॉिपग प्लॅन करताना एकीकडे नव्याची ओढ असतानाच आपल्या सणांमध्ये जुनं टिकवून ठेवण्याची तरुणाईची धडपड चालू आहे. सातासमुद्रापलीकडे असलेल्या भावंडांना दिवाळीच्या भाऊबीज या एका दिवसासाठी घरी येणं शक्य नसतं म्हणून ऑनलाइन दिवाळी साजरी करण्यासाठी कॉलेजिअन्स नवनवीन ऑनलाइन पर्यायांचा आधार घेऊन आधुनिक पद्धतीने दिवाळी साजरी करणारेत. नटूनथटून आपापल्या संगणकासमोर बसून चॅटिंग किंवा स्काइपवरून थेट गप्पा मारून भाऊ-बहीण दिवाळी साजरी करतील. एकमेकांच्या घरी जाऊन अनेकदा शुभेच्छा देण्यासाठी सवड मिळत नसल्यामुळे कॉलेजिअन्स शुभेच्छांसाठी ट्विटिंगचा पर्याय अवलंबणार आहेत. शे-दोनशे एसएमएस करण्यापेक्षा सोशल नेटवìकग साइटवर मेसेज टाकणं किंवा ट्विटिंग करणं या कॉलेजिअन्सना सहज आणि सोपं, शिवाय ट्रेंडीही वाटतं आणि शुभेच्छापत्रांचा खर्च वाचल्यामुळे दिवाळीही तशी बजेटमध्ये होते. मुळातच ना, आजची तरुणाई उत्साही आहे. त्यांना आनंद समुदायानं व्यक्त करायला आवडतं. म्हणूनच दिवाळीच्या पहिल्या दिवशी किंवा सवडीनुसार घरी किंवा हॉटेलमध्ये पाटर्य़ा करण्याकडे तरुणांचा कल अधिक दिसून येतोय. अशा वेळी भेटीगाठीदरम्यान खास तिखट आणि गोड पदार्थाचे मेन्यू मुलांकडून आधीच ठरवले जाताएत. उच्चभ्रू समाजात असणारा हा ट्रेण्ड कॉलेजिअन्सच्या निमित्ताने का होईना गेल्या काही वर्षांपासून मध्यमवगीर्यामध्येही रुळू लागलाय. दिवाळीच्या दिवसांत हॉटेल्समधील गर्दी भुकेची परीक्षा घेण्यासारखीच असते. टेबल मिळवण्यासाठी हॉटेलबाहेर लागलेल्या रांगा या काळात अधिक दिसतात. म्हणूनच या कॉलेजिअन्सनी यंदा मात्र आपल्या कुटुंबीयांसाठी टेबल आठवडाभर आधीच बुक करून ठेवलं आहे. एवढंच नाही तर फॅमिली गेट-टुगेदरला डिक्टो पार्टीचा लुक येण्यासाठी या तरुणांनी कुटुंबीयांसाठी काही खास ड्रेसकोडही ठेवले आहेत. पणत्या, कंदील आणि झगमगत्या तोरणांचं प्रकाशमय डेकोरेशन या पार्टीची रंगत आणखी वाढवेलच, शिवाय बॅकग्राऊंडला वाजणाऱ्या गाण्यांमुळे डान्सचा माहौलही तयार झालेला असेल. सोबत डिलिशस मेन्यू फुल्ल टू पार्टी मूड बनवेल यात तिळमात्र शंका नाही. काही कॉलेजिअन्स या काळात पिकनिकही प्लॅन करत आहेत. फॅमिली किंवा फ्रेण्ड्सबरोबर एखाद-दोन दिवस फिरून येऊन दिवाळी सेलिब्रेशनचा एक रीफ्रेिशग आनंद काहीजण लुटणार आहेत. कारण काही दिवाळीप्रेमी तरुणांच्या मते सेलिब्रेशन कशाही प्रकारे असलं तरी सगळ्यांना भेटणं या निमित्ताने शक्य होतं. घटका दोन घटका रिलीफ मिळवत पुन्हा नव्या दम्याने सुरुवात करायला मग सगळेच तयार होत असतात.
कॉलेज कट्टय़ावर दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा, प्लॅिनग दिवाळी येईपर्यंत असंच सुरू राहील. पण तोवर दिवाळीसाठी वातावरण निर्मिती झालेली प्रत्येकालाच आढळेल. पिठाच्या गिरण्या डाळीच्या, चकलीच्या भाजण्यांनी गच्च भरून गेलेल्या दिसतील. रस्त्यातून जाताना चकलीच्या खमंग वासाची झुळूक येत असेल. बििल्डगमध्ये कुठूनतरी बेसनाच्या लाडूंचा वास हजेरी लाऊ
लागेल. चकली, शेवया पाडण्याचे यंत्र शेअिरग बेसिसवर आजूबाजूच्या घरांत फिरू लागले असेल. रस्त्यात, दुकानांत रंगीबेरंगी आकाशकंदील,फटाक्यांचे स्टोल दिसू लागले असतील. खरोखरच या दिवाळीप्रेमी कॉलेजिअन्ससाठी दिवाळी म्हणजे थोडक्यात ती संपताक्षणी परत कधी येणार अशी वाट बघायला लावणारा सण. नवीन वर्षांचं कॅलेंडर घरात आल रे आलं की पहिल्यांदा पाहिलं जातं दिवाळी कधी आहे, किती दिवस आहे. ज्यावर्षी अगदी पाच दिवस दिवाळी असेल त्या दिवशी एकदम भारी वाटतं की यंदा खूप दिवस दिवाळी अनुभवायला मिळणार. पण एक आहे, दिवाळीच्या शेवटच्या दिवसाची संध्याकाळ कधीच येऊ नये हे प्रत्येकालाच वाटतं. कारण त्या संध्याकाळी फराळाचे संपत आलेले डबे, फुसके म्हणून उरलेले फटाके, खिडकीतून काढून ठेवलेला आकाशकंदील, शाळा, कॉलेज, ऑफिस चालू व्हायची तारीख असं सगळं नको नको ते चित्र डोळ्यांसमोर दिसू लागतं. पण असो, अजूनतरी त्या दिवसाला पुष्कळ वेळ आहे नाही का! तोपर्यंत आपण सारे जण कॉलेजिअन्सनी प्लॅन केलेली भन्नाट दिवाळी साजरी करून ‘फुल टू कल्ला’ करू या…