vv18एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

आयुष्यात खरं असण्याला, सच्चं असण्याला आपण नेहमीच महत्त्व देतो. हा सच्चेपणा जितका स्वभावात, वागण्यात हवा तितकाच बोलण्यातही हवा. काय बोलतो आहोत त्या आशयासह उच्चारही ‘जेनयुअन्’ हवे. मी हा शब्द जेव्हा असा फोडून लिहिला, माझं मलाच वाटायला लागलं की काही गडबड तर होत नाहीय ना? म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीशी आपण रोज गप्पा मारत असतो, भेटत असतो. पण त्याच व्यक्तीविषयी औपचारिकरीत्या एखाद्या समारंभात बोलायची वेळ आली की, आपण गडबडतो. खूप जवळ धरलं की वाचता येत नाही, अगदी तसंच या शब्दाबद्दल वाटतंय. इतका हा शब्द रोजच्या वापरातला, परिचयातला आहे ‘जेनयुअनली’!
जेनयुअन्, जेन्यून, जेनयुइन् असे विविध अवतार धारण करून हा शब्द आपल्या बोलण्यात अनेकदा येतो. ‘जेन्युअनली’ यार ! खरंच सुट्टी नाहीय’, ‘अगं त्या दुकानात जेन्युअन लेदर पर्स मिळेल तुला’. हे आणि असे अनेक वाक् प्रयोग या शब्दाच्या वापरासह आपण करत असतो. फरक इतकाच की, वास्तवात हा उच्चार अमेरिकन मंडळी ‘जेनयुअन्’ असा व्यवस्थित ऐसपस करतात. आपण ‘न’ ला ‘यु’मध्ये सरकवून जेन्युअन असा झटपट करतो. मूळचं इंग्रजी स्पेिलग आहे ॠील्ल४्रल्ली. इंग्रजांनी या स्पेिलगसोबतच जायचं ठरवलेलं दिसतं. त्यांनी ‘जेनयुइन’ असा उच्चार स्वीकारला आहे. त्यामुळे आपल्याकडे आढळणाऱ्या या शब्दाच्या रूपातील ‘जेनयुअन्’, ‘जेन्युइन’ दोन्ही करेक्ट. पण जेन्यून मात्र साफ चूक! उच्चारांची एक गम्मत असते. प्रत्येकाला आपला उच्चारच थोर आहे असं ठामपणे वाटत असतं. सहज या निमित्ताने मला ‘पोरसवदा’ या शब्दावरून झालेला गोंधळ आठवला. पोर-सवदा का पोरस-वदा, शब्द कुठे तोडायचा यावरून सगळे कसे हिरिरीने मतं मांडत होते. त्यामुळे जेनयुअन व जेनयुइनमध्ये प्रत्येकाला आपलाच उच्चार योग्य वाटणं ओघानेच आलं. आपण काय घ्यायचं आपल्यावर आहे.
मुळात हा शब्द लॅटिनमधून आलाय. जेनयुअन म्हणजे लॅटिनमध्ये नसíगक, सच्चे, कोणताही बदल न घडवता जसे आहे तसे. एखादी व्यक्ती जेनयुअन आहे म्हणजे प्रामाणिक, खरी आहे. याखेरीज या शब्दाचा अधिक शोध घेता, पुत्रजन्मानंतर पिता आपल्या पुत्राला गुडघ्यावर (‘ल्ली) घेई अशी एक प्राचीन प्रथा होती, तिचा संदर्भ या शब्दाच्या उत्पत्तीशी जोडलेला दिसतो. ॅील्ल४-ङल्ली संदर्भात औरस, अस्सलपणा सिद्ध करणे या अर्थाने प्रथेकडे पाहिले तर ॠील्ल४्रल्ली शब्द कसा वाढत गेला असावा याची कल्पना आपण करू शकतो. पण या शब्दाच्या कुळकथेचा हा एक भाग झाला. हे या शब्दाच्या निर्मितीचे ठाम कारण म्हणता येणार नाही.
मुळात शब्दाची कुळकथा शोधायची म्हटली तर नदीचे मूळ व ऋषीचे कूळ शोधू नये हाच न्याय लागू व्हावा. अर्थात भाषाशास्त्रज्ञ जी मेहनत घेऊन हा इतिहास समोर आणतात त्यासाठी ँं३२ ऋऋ! आपण मात्र सध्या तरी उच्चारांवरच फोकस करणे इष्ट नाही का? कारण एखाद्या शब्दाचा जेनयुअन उच्चार कळल्यावर इतका जेनयुअन आनंद होतो ना की क्या बात है! हे जर जेनयुअनली पटलं असेल तर ई-मेल वा पत्ररूपाने अवश्य कळवा.
रश्मी वारंग