‘तो’ दिसतो अंधूकसा.. पाठमोरा.. आपल्याच धुंदीत जाणारा.. तेवढय़ात ‘तिला’ जाग येते.. अगदी खडबडून.. कोण असेल तो? कसा असेल? ‘ड्रीमबॉय’चं स्वप्नीच्या राजकुमाराचं प्रत्यक्षात येणं आधीपेक्षा थोडं जास्त प्रॅक्टिकल झालंय. ‘ड्रीमबॉय’ची पूर्वापार चालत आलेली गुणवैशिष्टय़ं मागं पडताहेत. तो दिसायला कसा आहे, यापेक्षा तो समजूतदार, सपोर्टव्हि, सुशिक्षित, सेन्सेटिव्ह, केअरिंग असावा. केवळ वरवरच्या दिखाव्याला न भुलता तो माणूस म्हणून कसा आहे, हे पाहिलं जावं, असं काही जणींना वाटतंय. तो मनापासून आवडला तर त्याच्या दिसण्यानं फारसा फरक पडत नाही, असं काही जणींना वाटतं. त्यामुळे केवळ स्वप्नरंजनात न रमता सारासार विचार करून ‘ड्रीमबॉय’ची संकल्पना विचारात घ्यावी, असं सगळ्या जणींचं मत आहे. तुमच्या ड्रीमबॉयच्या संकल्पनेच्या जवळ जाणारी कोणती मालिकेतली, पुस्तकातली, सिनेमातली कॅरॅक्टर्स आहेत का, असं विचारल्यावर अनेक  पात्रं, अनेक चेहरे समोर आले. काही जणींनी ‘ड्रीमबॉय’विषयी आपली मतं ‘व्हिवा’शी शेअर केली.

ओशिन जव्हारकर
vv07माझा ‘ड्रीमबॉय’ म्हणजे आयडियल मुलगा हा माणूस म्हणून कसा आहे, हे अतिशय महत्त्वाचं असतं. तो स्वभावानं चांगला, समजूतदार असावा. कुटुंबाला प्राधान्य देणारा असावा. आमची आíथक बाजू आम्ही दोघांनी मिळून सांभाळावी. तो आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवणारा हवा. लग्नानंतरही एकमेकांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं. त्याचं एज्युकेशन चांगलं असावं. त्यानं ध्येय निश्चित करून ते साध्य करायला हवं. तो माणूस आपल्याला मनापासून आवडला असेल तर तो कसा दिसतो, यानं जास्त फरक पडत नाही. माझ्या ड्रीमबॉय कनसेप्टजवळ जाणारी बरीच कॅरॅक्टर्स आहेत. ‘पी. एस. आय लव्ह यू’ या मूव्हीतली ‘ती’ मॅरिड आहे. ‘ती’ मूव्हऑन होऊ शकत नाही. पण ‘तो’ तिला सपोर्ट करतो. हा हिरो आहे जेरार्ड बटलर. एक पर्सनॅलिटी म्हणून मला रॉबी विलियम्सही आवडतो. त्यानं त्याची फॅमिली खूप छान सांभाळलीय. शाहरुख खाननंही फॅमिली लाइफ नि करिअर चांगलं मॅनेज केलंय.

सपना रोहरा
vv08आजच्या काळात ‘ड्रीमबॉय’ या कनसेप्टमुळे एक हॅप्पी फििलग येणं नि त्यामुळे स्वप्नांच्या दुनियेत रमणं शक्य आहे का, हे मला माहिती नाही. आपल्या आयुष्यात काही तरी जादूई घडेल, हे स्वप्नरंजन आताशा फारसं होत नाहीये. पण तरीही प्रत्येकीनं कधी तरी आपल्या आयुष्याविषयी काही स्वप्नं बघितलेली असतात. परीकथेतल्या राजकुमारीसारखी.. माझ्या ‘ड्रीमबॉय’नं त्याच्या आईइतकाच सन्मान मलाही द्यावा. माझ्या मनाचं हितगुज त्यानं लक्ष देऊन ऐकावं. एखाद्या लहान मुलासारखी त्यानं माझी काळजी घ्यावी. काही वेळा आम्हाला नि:शब्द संवाद साधता यायला हवा. माझ्या मनातल्या भावना त्यानं समजून घ्याव्यात. हसू-आसू, लटके-खटके नि नाच-गाण्यात एकत्र रमताना आमचं एकमेकांना समजणं नि आमचं प्रेम मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक वाढावं. त्यानं  You re just mine, There is no one like you असं सगळ्यांसमोर मला सांगावं. जणू काही तो माझा ‘डिस्ने प्रिन्स’ आहे.. या स्वप्नांच्या दुनियेपलीकडच्या सत्यात वावरताना मला माहितेय की, तो राजकुमार असो किंवा सामान्य मुलगा, त्याच्यामुळे माझं लाइफ ‘फेअरी टेल’सारखं होणार, हे नक्की.

गायत्री रायकर
vv09माझा ‘ड्रीमबॉय’ असा असावा की, तो मी न सांगता मला काय हवं ते समजेल आणि त्याप्रमाणे वागेल. मला रिस्पेक्ट देईल नि अभिमानानं सगळ्यांना सांगेल की, मी त्याची गर्लफ्रेण्ड आहे. मला ‘2स्टेट्स’मधल्या अर्जुन कपूर (क्रिश)चं कॅरॅक्टर खूप आवडतं. कारण तो पॅरेण्टस्नाही खूप इम्पॉर्टन्स देतो. माझ्या ‘ड्रीमबॉय’नंही माझ्या पॅरेण्टस्ना कनव्हिन्स केलं, तर मी खूप खूश होईन. माझा ‘ड्रीमबॉय’ असा असावा की, माझ्या प्रोफेशनल करिअरबद्दल त्याला गर्व वाटेल नि माझ्या स्ट्रगलमध्ये तो मला सपोर्ट करील. स्पेस इज इम्पॉर्टण्ट, हे लक्षात घेऊन तो माझ्या फ्रेण्ड्सबरोबर वेळ घालवायला मला फ्रीडम देईल.

दिव्या गुंडे
vv11माझा ‘ड्रीमबॉय’ ना अगदी हॅण्डसम किंवा ना अगदी ‘रिची रिच’ असावा. मला जो आयडिअल वाटेल, तो इतरांना आयडिअल वाटेलच असं नाही. ‘द व्हाऊ’मधला आपल्या बायकोची स्मृती गेलेली असताना तिचं प्रेम परत मिळवण्यासाठी धडपडणारा चॅनिंग टॅटम मला प्रेरक वाटला. ‘ड्रीमबॉय’चं पहिलं कॅरॅक्टरिस्टिक हे प्रेम असावं. त्यानं माझ्यावर मी करेन तितकंच जिवापाड प्रेम करावं. त्याच्याविषयी माझ्या फार भव्यदिव्य अपेक्षा नाहीत. तो कन्सिडरेट, सेन्सिटिव्ह आणि अफेक्शनेट असावा. त्यानं आमच्या पालकांचा, वडीलधाऱ्यांचा नि माझाही योग्य तो आदर राखावा. मी काही त्याच्या हातातलं खेळणं नव्हे. “ळऌअळ ’र ट ॅकफछ!” असं त्यानं म्हणावं, अशी माझी अपेक्षा आहे. तो कसा दिसावा? तो खूप उंच असावा. डिसेन्टली ड्रेस्ड असावा. एक्सपेन्ससिव्ह डेटस्, फनी प्लेसेस, शायनी कारमधून ड्राइव्हला जाणं, यापकी मला काहीही अपेक्षित नाहीये. फक्त निवांत संध्याकाळी आम्ही फिरायला जावं, गप्पा माराव्यात, मनसोक्त हसावं नि आमची सुख-दु:खं शेअर करावीत.. खरंच, माझा आयडिअल चॉइस हा एक ‘जंटलमन’ असेल.   

अंकिता पोतनीस
vv10माझ्या ‘ड्रीमबॉय’च्या कनसेप्टनुसार तो तत्त्वनिष्ठ, स्वत:ची मतं असणारा, ध्येयासक्त नि चिअरफुल नि ‘डाऊन टू अर्थ’ असावा. माझ्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्यात त्यानं मला कायम सपोर्ट करावा. अर्थातच एखाद्या प्रसंगी मी चुकत असेन तर मला योग्य सल्ला द्यावा. पण तो डॉमिनंट नसावा. त्यानं मला माझे निर्णय बदलायला फोर्स करू नये. माझ्या ‘ड्रीमबॉय’सारखं कॅरॅक्टर आहे ‘फ्रेण्ड्स’ या अमेरिकन मालिकेतला चँण्डलर िबग. तो त्याच्या बायकोची- मोनिकाची खूप काळजी घेतो. तिच्यासाठी लढा देतो. तिच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहील, हे बघतो. तिच्या आनंदाचं मोल हे त्याच्यासाठी कायमच पशापेक्षा वरचढ ठरलंय. त्याशिवाय ‘मेरी कोम’चा नवरा ऑन्लरचं कॅरॅक्टरही माझ्या ‘ड्रीमबॉय’च्या कनसेप्टजवळ जाणारं आहे. त्यांच्या लग्नानंतर त्यानं मेरीला यशस्वी बॉक्सर होण्यासाठी केलेला त्याग वाखाणण्याजोगा आहे. या दोन्ही कॅरॅक्टर्सचे किमान ७० टक्के गुण अंगी असलेला कुणी तरी मला भेटला तर मला ती देवाची कृपाच वाटेल.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – व्हिवा वॉल असं जरूर लिहा.