सुंदर दिसणे हा प्रत्येकाचा  जन्मसिद्ध हक्क आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत काही खास समारंभांसाठी, सणांसाठी तरुणी तयार होत असतं. मग पार्लरच्या वाऱ्या, आजीच्या पोतडीतल्या खास घरगुती उपायांनी चेहरा साफ करणे, घरगुती मास्क, ट्राय अ‍ॅण्ड टेस्टेड  फॉम्र्युलाज् हे सगळं ओघाने यायचं, पण हल्ली ऑफिसकल्चर म्हणून, सोशल स्टेटस जपण्यासाठी आणि पर्यायाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग म्हणून अपटूडेट राहण्याची गरज प्रत्येकीलाच भासते. त्यामुळेच आजकाल तरुणींच्या पार्लरच्या वाऱ्या वाढू लागल्या आहेत. फेशियल, क्लीन अप, मॅनिक्युअर, पेडिक्युअर अशा ट्रीटमेंटची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
या सगळ्यातील अजून एक महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे हेअर रिमुव्हिंग. आयब्रो, अपर आणि लोवर लिप्सचे केस थ्रेिडगनी काढले जातात. प्रश्न येतो तो म्हणजे हातापायाचे केस काढायच्या वेळेस. आजच्या घडीला हातापायाचे केस काढण्यासाठी बाजारात अनेक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. यातील वॅिक्सगच्या पर्यायाला भारतात बहुतेक जणी पसंती देतात. त्याचबरोबर लेझर ट्रीटमेंट, शेव्हिंग तसेच हेअर रिमुिव्हग क्रीम्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत; परंत यातील नक्की कोणता पर्याय निवडावा याबद्दल प्रत्येकीचं स्वत:चं मत असतं आणि त्याचबरोबर खूपसे समज-गरसमजही यासोबत असतात.
इंटरनेटवरील अपुरी माहिती, मत्रिणींचे चुकलेले किंवा फसलेले प्रयोग आणि काही अनाहूत सल्ले यामुळे बहुतेक वेळा उत्साहाच्या भरात अनेक मुली काही चुकीचे प्रयोग किंवा चुकीच्या पद्धतीने एखादा प्रयोग करतात आणि फसतात. मग त्याचे व्रण कायमस्वरूपी त्यांच्या हातापायावर राहतात. त्यामुळे कोणतीही ट्रीटमेंट करण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. नुकतेच शेव्हिंग रेझरच्या दुनियेतील प्रस्थापित ब्रँड ‘जिलेट’ यांनी ‘व्हिनस’ या त्यांच्या स्त्रियांसाठी असलेल्या खास रेझरचे अनावरण भारतात केले. त्यानिमित्ताने मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शेव्हिंगबद्दल असलेल्या समज-गरसमजांची नामवंत त्वचारोगतज्ज्ञांनी चर्चा केली. त्यातून अनेक गोष्टी उघड झाल्या आणि अनेक समज-गैरसमज असल्याचे जाणवले.
मुळात हेअर रिमुिव्हग ट्रीटमेंटबद्दल काहीही बोलण्याअगोदरच डॉ. जमुना प यांनी महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला की, ‘पार्लरमध्ये त्वचेवरील केस काढण्याच्या ज्या ट्रीटमेंट्स आपण घेतो त्या हेअर रिमुिव्हग ट्रीटमेंट्स नसून हेअर रीडक्शन ट्रीटमेंट्स आहेत, कारण यातील कोणतीही ट्रीटमेंट त्वचेवरील केस कायमस्वरूपी काढून टाकत नाही, त्या फक्त त्वचेच्या वरच्या बाजूस दिसणारे केस काढतात. जे काही ठरावीक काळानंतर पुन्हा येतात. अगदी लेसर ट्रीटमेंटसारख्या महागडय़ा ट्रीटमेंटने काढलेले केससुद्धा तुमच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस किंवा शरीरात काही संप्रेरक बदल घडल्यास पुन्हा येतात.’ हेअर रिमुिव्हग ट्रीटमेंट्सबद्दलच्या वाढत्या जागरूकतेबद्दल बोलताना डॉ. उषा खेमानी म्हणतात की, ‘आजकाल मुलींमध्ये हेअर रिमुिव्हग ट्रीटमेंट्सबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या ९ ते १२ वर्षांच्या वयोगटातील मुलीदेखील आज पार्लरमध्ये जाऊन वॅिक्सगसारख्या ट्रीटमेंट्स करून घेतात.’
बाजारात हेअर रिमुिव्हगसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांकडे नजर फिरवल्यास त्यातील फायदे-तोटे आपल्याही लक्षात येतील. हेअर रिमुिव्हग क्रीम्स हा सर्वात सोप्पा आणि सोयीचा मार्ग असला तरी कित्येक जणींना या क्रीम्सचा वास आवडत नाही. तसेच या क्रीम्समधील रासायनिक द्रव्ये तुमची त्वचा काळपट करतात. थ्रेिडगचा वापर आयब्रोसारख्या लहान भागात करता येतोस, पण हातापायांवर ते त्रासदायक ठरू शकते. तसेच लेसर ट्रीटमेंटचा खर्च हा प्रत्येकीच्या खिशाला परवडेल असे नाही. म्हणून मग बहुतेक जणी वॅिक्सगचा मार्ग स्वीकारतात. याबद्दल बोलताना डॉ. प म्हणाल्या की, ‘वॅिक्सगचा मार्ग सुरक्षित आणि भरवशाचा वाटत असला तरी त्यासाठी आधी तुम्हाला पार्लरची वेळ ठरवावी लागते. पुन्हा एकदा वॅक्स केल्यावर आठवडय़ाभरात येणारे छोटेछोटे केस तुम्ही पुन्हा वॅिक्सग करून काढू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला केसांची संपूर्ण वाढ होण्याची वाट बघावी लागते. या सगळ्यावर उत्तम उपाय म्हणजे शेव्हिंग. तुमच्या हातापायावरील केस हे शेव्हिंगच्या साहाय्याने तुम्ही हवे तेव्हा काढू शकता.’
पण शेव्हिंगबद्दल अनेक गरसमज स्त्रियांच्या मनात असतात. त्यातील एक म्हणजे शेव्हिंगमुळे केसाची वाढ जास्त होते. याबद्दल डॉ. चित्रा नायक म्हणतात की, ‘मुळात तुमच्या शरीरावरील कुठल्या भागावर केसांची वाढ किती आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. शेव्हिंगचा विषय निघताच आपले लक्ष पुरुषांच्या दाढीमिशीवर जाते; परंतु पुरुषांच्या दाढीमिशीत होणारी जलद वाढ ही नसíगक असते, त्यात शेव्हिंगचा काहीच दोष नाही. तसेच त्यांच्या दाढीमिशीला काही इंचांची वाढ असतेच, त्यामुळे ज्याप्रमाणे आपले डोक्यावरचे केस हे नियमित न कापल्यास वाढत राहतात तसंच त्यांची दाढीमिशीदेखील नियमित शेव्हिंग न केल्यास विशिष्ट लांबीपर्यंत वाढते; परंतु आपल्या हातापायांच्या केसांची वाढ ही १ सेंमीपेक्षा जास्त कधीच होत नाही, कारण त्यांना तेवढी वाढ मुळात नसतेच.’
तसंच शेव्हिंगमधील दुसरा गरसमज हा मानला जातो की, शेव्हिंगमुळे केस दाट बनतात. याबद्दल डॉ. पंचे म्हणणे होते की, ‘आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, शेव्हिंग करणे म्हणजे फक्त त्वचेवरील केस कापणे आणि यामुळे केसांच्या जाडीवर काही परिणाम होत नाही, पण म्हणून स्त्रिया जे म्हणतात ते खोटं आहे असं मुळीच नाही. आपल्या त्वचेवरील केस हे मुळापाशी जास्त जाड असतात. त्यामुळेच जेव्हा हेअर कट करतो तेव्हा आपल्याला आपले केस दाट झाल्यासारखे वाटतात. तोच नियम येथेही लागू पडतो. जेव्हा तुम्ही शेव्हिंग करता त्याच्या दोन ते तीन दिवसांनंतर येणारे केस हे मुळाजवळ असल्याने ते तुम्हाला जाडे वाटतात, परंतु त्यांची पूर्ण वाढ झाल्यावर त्यांची जाडी पूर्वीइतकीच आहे हे लक्षात येते.’
जिलेटच्या अनावरण सोहळ्यादरम्यान अभिनेत्री चित्रांगदाने म्हटल्याप्रमाणे, ‘बिझी शेडय़ुलमुळे हल्लीच्या स्त्रीला पार्लरमध्ये जाऊन वॅिक्सग करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि कित्येकदा पार्लरच्या पडद्यामागे वॅिक्सग करताना आपण अवघडून जातो. अशा वेळेस शेव्हिंगचा पर्याय आपल्या मदतीला धावून येतो. तसेच प्रवासातही कधी तरी पायावर दिसणारे नको असलेले केस काढण्यासाठी रेझरचा वापर करता येतो.’

शेव्हिंग करताना घ्यायची प्राथमिक काळजी…
* आपल्या हातापायाचा पृष्ठभाग हा पुरुषांच्या दाढीच्या भागाप्रमाणे सपाट नसतो, तर त्याला ठिकठिकाणी वळण असते. त्यामुळे पुरुषांचे रेझर वापरणे कधीही चुकीचे ठरते. बाजारात उपलब्ध असलेले स्त्रियांसाठीचे रेझर्स हे तुमच्या हातापायाच्या आकारानुसार वळते. त्यामुळे जखम होण्याची शक्यता टाळते.
* रेझर वापरताना स्वच्छता महत्त्वाची असते. म्हणून शक्यतो तुमचे रेझर इतरांसोबत शेअर करू नका. तसेच रेझर पुसण्यासाठी टॉवेल किंवा कापडाचा वापर केल्यास त्याची धार बोथट होऊ शकते.
* रेझरची ब्लेड योग्य वेळी बदलणे गरजेचे आहे. बोथट धारेच्या रेझरने जखम होण्याची शक्यता जास्त असते.
* शेव्हिंग करताना गरम पाण्याने हातपाय धुऊन घ्यावे. गरजेचे वाटल्यास साबण लावून मग रेझर वापरावे; परंतु पुरुषांप्रमाणे शेव्हिंग क्रीम वापरण्याची गरज नाही.
* रेझरला चांगली ग्रिप असली पाहिजे, कारण बाथरूममध्ये ओलसर हातातून रेझर सटकण्याचा धोका असतो.