|| वैशाली शडांगुळे

प्रकाशात आलेली गोष्ट लपून राहत नाही असं म्हणतात. हातमागावर पडलेल्या प्रकाशाची दखलही सर्वानी घेतली, कारण जे हातमागावर हाताने कोरले जाईल ते मशीनवर कधीच छापले जाणार नाही याची प्रचीती लोकांना आली आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व आणि आवड या दोहोंचा मेळ हातमागाला आणखीन ग्लोबल करतो आहे. यंदा हॅण्डमेड कपडय़ांना जगभरात हॅण्डलूमच्या बरोबरीने किंबहुना हॅण्डलूमइतके महत्त्व कसे प्राप्त झाले आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊयात..

tharala tar mag sayali arjun 15 minutes date
‘ठरलं तर मग’ : फक्त १५ मिनिटांची डेट अन् सायली चालवणार स्कूटर, मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?
chetan vadnere rujuta dharap are now married shared wedding photos
चेतन वडनेरे आणि ऋजुता धारप अडकले लग्नबंधनात; शेअर केले खास फोटोज
Karan johar opinion on fillers botox lip surgies on social media went viral
“कितीही बोटॉक्स केलं तरी…” फिलर्स आणि सर्जरीबद्दल करण जोहर स्पष्टच म्हणाला…
Vin Diesel shared photo with deepika padukone on social media
हॉलीवूड अभिनेता विन डिझेलने शेअर केला दीपिका पदुकोणसह फोटो, म्हणाला…

हातमागाचे कापड आणि त्यापासून बनवली जाणारी प्रत्येक वस्तू, कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज जास्त प्रमाणात आज जगभरातील ग्राहकांना आकर्षित करते आहे, किंबहुना सर्वत्र ग्लोबली हॅण्डलूम पोहोचले आहे. परिस्थिती अशी आहे की सगळीकडे भारतात व भारताबाहेर हातमागाचे कपडे घेऊन प्रदर्शने भरवली जातात. त्यामुळेच हातमागाची किंमत, त्यांचे महत्त्व, फॅब्रिक्स, डिझाइन्स आणि इतर सर्व गोष्टी सर्वाना ज्ञात झाल्या आहेत. जे मशीनवर बनवले जाते ते कधीच हातावर बनवलेल्या कापडाएवढे ऑथेंटिक नसते. जे आपण हाताने बनवू शकतो ते आपण मशीनवर कधीच बनवू शकत नाही. फार काळजीपूर्वक, वेळ देऊन आणि तंतोतंत जुळणारी कलाकुसर – रंग यांचा योग्य तो मिलाफ हातांनी विणलेल्या धाग्यावर उमटतो. ज्याची आज भारतात आणि भारताबाहेर सर्वाधिक विक्री होते आहे. भारतात आलेले परदेशी नागरिक इथून हातमागावरचेच कपडे खरेदी करतात आणि परदेशातूनही हातमागाच्या कपडय़ांना बऱ्यापैकी मागणी असते.

हाताने बनवलेल्या वस्तूंवर एक वेगळा टच असतो आणि त्याबरोबरच एक वेगळी कला त्यावर रेखाटलेली असते. एक वैयक्तिक ठेवा म्हणून हातमागाकडे पाहिले जाते. एक भावनिक नातं त्याच्याशी जोडलेलं असतं. खरेदी-विक्रीच्या पातळीवर पसंतीचा मुद्दाही तेवढाच लक्षात घ्यावा लागेल. हातमाग आज प्रत्येक देशात ठिकठिकाणी लोकांना आवडतंय. शिवाय, या कपडय़ांवर हाताने केलेली कलाकुसर असेल तर पाहता क्षणीच ती आपल्याला आवडते. हातमाग ग्लोबली जाण्यामागचा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की बाहेरच्या देशात हातमागाचे महत्त्व जास्त प्रमाणात आहे. तिथे हातमाग आणि त्यावर हाताने केलेली कलाकु सर असलेल्या वस्तू, कपडे या गोष्टी सहजपणे तयार आणि उपलब्ध होत नाहीत. भारतीय पद्धतीनुसार हाताने कपडे, वस्तू, भांडी या गोष्टी जशा तयार केल्या जातात तशा इतरत्र कुठेही फारशा बनत नसल्यामुळेच त्यांचे परदेशातील महत्तव जास्त वाढले आहे. आपल्याकडे पूर्वी हाताने सर्व गोष्टी करायची परंपराच होती. भारतात मशीन्स नंतरच्या काळात परप्रांतीयांकडून आले आहेत. तोपर्यंत आर्ट आणि क्राफ्ट याला कुठलाच पर्याय नव्हता. त्यामुळे तेव्हा विकसित असलेली कला कुठेतरी लोप पावत असतानाच पुन्हा प्रकाशात आली आहे. या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या नावीन्यपूर्ण योजनांचा परिपाक म्हणता येईल कदाचित.. आजच्या काळात मशीनवर गोष्टी सहजपणे मिळत असल्या तरी हाताने केलेली कारागिरी मशीनवर जशीच्या तशी छापली जाणं अशक्य आहे, याची प्रचीती लोकांनी घेतलेली आहे. त्यामुळे एकीकडे त्याचे महत्त्व आणि आवड या दोन्हींचा मेळ घातला गेला असून जगभरात हातमागाचा प्रसार होतो आहे.

आज परदेशातील मंडळी प्रचंड भ्रमंती करतात. आपणही परदेशात जातो आणि परदेशातील नागरिकही आपल्या देशात येतात. एकूणच सर्व देशोदेशांतील लोक सहजपणे बाहेरील जगात फिरू लागल्यामुळे हातमागासारखी जुनी परंपरा त्यांना पाहायला मिळते, त्याचे महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते आणि त्यांना हातमागावरच्या वस्तू सहजपणे उपलब्धही करून देता येतात. हातमाग ग्लोबल होण्याचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण हे पर्यटन आहे. हातमागावरचे कापड कुठून येते? प्रॉडक्ट्स कसे बनतात?, अशा वेगवेगळ्या गोष्टी या पर्यटनामुळे जाणून घेणं सहज शक्य झालंय. संपूर्ण हातमागावर बनलेल्या कपडे-वस्तू यांचा साज लेऊन फॅशन कशी करता येईल याबाबत जगभरात जनजागृती झाली आहे. अशा प्रकारे जनजागृती करण्यासाठी भारतात जास्त प्रमाणात, पण भारताबाहेरही विविध संस्था कार्यरत आहेत. याचा पुरेपूर परिणाम ग्लोबल मार्केटवर होतोय. सर्वात जास्त हॅण्डलूम आणि हॅण्डक्राफ्टेड गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. याची प्रसिद्धी खूप मोठय़ा स्तरावर केली जाते. या धडपडीमुळेच भविष्यातदेखील याची मागणी अधिकाअधिक वाढतच जाणार आहे. एकीकडे मशीन आल्यामुळे हातमाग उद्योगावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे हा उद्योग नामशेष होईल का, अशी भीतीही सतावत असतेच. त्याचे कारण मशीनमुळे प्रॉडक्शन आणि व्यवसाय वाढतो. तो वेग हातमागावरच्या निर्मितीला नाही. मात्र जे तुमच्या मुळांमध्ये आहे ते कधीच लोप पावत नाही, हेही तितकंच खरं असल्याने हातमागावरच्या कापडय़ांचे महत्त्व दिवसागणिक वाढत चालले आहे. त्याला हा उद्योग टिकवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचीही साथ मिळाली असल्याने त्याचा विस्तार मोठय़ा प्रमाणावर होतो आहे.

पाश्चिमात्य देशांप्रमाणेच अनेक थंड प्रदेशातील ठिकाणीसुद्धा हातमागाच्या कापडाला महत्त्व आहे. हातमागावरचे कापड हे युरोपियन देशांना जास्त प्रमाणात आकर्षित करते, परंतु अजूनही तिथे हातमागाबद्दल जेवढी जागरूकता असायला हवी तितकी दिसत नाही. हातमागामुळे तुम्हाला कलाकुसर आणि नैसर्गिक रॉ मटेरियलपासून बनवलेल्या कापडाचा टिकाऊपणा या दोन्ही गोष्टी एकाच हातमागाच्या कापडावर मिळतात याची जाणीव होणे गरजेचे आहे. युरोपियन देशात टिकाऊ कपडे जास्त वापरण्याची मानसिकता आढळते. तिथे फॅब्रिक कोणतेही असले तरी कपडय़ांचा टिकाऊपणा जास्त पाहिला जातो. यामागे खरंतर एका वेगळा प्रयत्न आपापल्या पद्धतीने सर्व देशांमध्ये सुरू आहे, पण तरीही तिथे हातमागाला खूप चालना मिळायला हवी. इतरत्र परदेशात म्हणजे भारताकडच्या पूर्व भागात आणि अमेरिकेत हॅण्डलूम, युजेबल कपडे वापरले जातात. नैसर्गिक तत्त्वातून तयार केलेले फॅब्रिक्स, रंग यातून कपडे कसे तयार होऊ शकतात, डिझाइन कसं करता येईल?, यावर तिथे प्रयत्न सुरू आहेत. खूप कपडे असे असतात ज्याच्या डाइंगमुळे, लिक्विडमुळे प्रदूषण होतं. त्यामुळे बऱ्याच देशात असे कपडे वापरात आणले जात नाहीत. परदेशात ज्वेलरी ही मेटलपेक्षा वूडपासून बनवली जाते आहे. या सगळ्यात डिझाइनर्सचा खूप मोठा वाटा आहे, कारण नैसर्गिक गोष्टींमध्येदेखील त्यांना क्रिएटिव्हिटी दिसते आहे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ते मेहनत घेताना दिसतात. कापडालाही अ‍ॅक्सेसरीजच्या रूपात आणले जाते. त्यामुळे हॅण्डलूम ग्लोबली पोहोचत असताना त्याच्या गुणधर्मासह ते सर्वदूर जाते आहे. आपल्याकडून जितक्या क्रिएटिव्ह गोष्टी बनवणं शक्य आहे, त्या बनवण्यावर भर दिला जातो आहे. त्यामुळे हॅण्डमेड कपडे किंवा वस्तूच्या निर्मितीसाठी कुठलीच मर्यादा, बंधन उरलेले नसल्याने डिझाइनर्स आपली स्वत:ची सिग्नेचर स्टाइल हॅण्डमेड कपडय़ांच्या मदतीने विकसित करताना दिसतात.

हॅण्डलूमच्या या चळवळीत ग्लोबली खादीची महतीही दिवसागणिक वाढत चालली आहे. आंतरराष्ट्रीय जाहिरातीतही खादी प्रामुख्याने दिसू लागली आहे. स्कीन फ्रेन्डली फॅब्रिक असल्याने खादीला खूप मागणी आहे. भारताकडून खादी अजून जास्त प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याची गरज आहे. खादी ही कपडय़ांमध्ये, फर्निशिंगमध्ये, अ‍ॅक्सेसरीजमध्ये सगळ्या तऱ्हेने वापरली जाते. ‘केव्हीआयसी’साठी मागच्या वर्षी मी खादीच्या राख्या बनवल्या होत्या. त्यामुळे फॅशन ही जास्त आता हॅण्डलूम, हॅण्डमेड आणि हॅण्डक्राफ्टेड गोष्टींना प्राधान्य देत जगभरात पोहोचते आहे.

शब्दांकन : गायत्री हसबनीस
viva@expressindia.com