आता ख्रिसमस आणि न्यू इअर जवळ येत असताना पार्टीचा सीझन सुरू होणार हे नक्की. पार्टीसाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे, तर या काळात आरोग्यासाठीचे काऊंटडाऊनही करणे आवश्यक आहे. आपल्यापकी बहुतेकांना अशा समारंभांना छान दिसावं असं वाटतं. नवीन वर्षांच्या सायंकाळी सुंदर आणि आकर्षक दिसण्याच्या तयारीला लागण्याची हीच वेळ आहे. याकरिता उपासमार करण्याची गरज नाही. फक्त साध्या नियमांचे पालन करून तुम्ही तुमचे शरीर सुस्थितीत ठेवू शकता. तुमच्या निरोगी आणि सुव्यवस्थापित शरीराने सर्वाना चकित करून सोडण्यासाठी तुमच्याकरिता काही मार्गदर्शक सूचना:
नवीन वर्षांच्या आधीचे तीन आठवडे:
पुरेसे पाणी प्या: दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि शरीरातून विषारी पदार्थ निघून जातात.
ग्रीन टी प्या: दर दिवशी ३ ते ४ कप ग्रीन टी प्या. ग्रीन टीमधील फ्लॅवॅनॉईड्स घटक त्वचेची चमक वाढवत सूक्ष्म अभिसरण सुधारतात.
फळे, भाज्या आणि तृणधान्ये जास्त प्रमाणात खा: ताजी फळे आणि भाज्यांच्या सेवनामुळे तुमची त्वचा आकर्षक, निरोगी व नितळ बनेल. याशिवाय होल व्हिट ब्रेड, ओट्स, ब्राऊन राइस, बाजरी आणि जव यांसारख्या तृणधान्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा.
आपल्या शरीराला सातत्याने विषारी पदार्थाचा प्रादुर्भाव होत असतो. विषारी पदार्थ घालवण्याच्या सोप्या प्रकारांपकी एक म्हणजे तुमच्या आहारामध्ये भाज्या आणि फळांच्या रसांचा समावेश करणे.
एका साध्या पण उत्कृष्ट ज्यूसची ही रेसिपी : १ गाजर, अर्धे बीट आणि २ टोमॅटो घ्या, कापा आणि ज्युसरच्या माध्यमातून रस काढा. हा रस तुमच्या शरीराच्या पेशींना चेतना देईल, यकृत डिटॉक्सिफाय करेल आणि तुमची त्वचा नितळ बनवेल.
तेलकट पदार्थ टाळा: तुमच्या त्वचेसाठी तेलकट पदार्थ चांगले नसतात आणि तुमची पचनक्रिया त्यांच्यामुळे मंदावते, त्यामुळे ते टाळा.
प्रथिनांचा समावेश करा: मासे, चिकन, अंडय़ाचे पांढरे आवरण यांसारखे प्रोटीन्स खा.
नवीन वर्षांच्या सायंकाळच्या दोन आठवडय़ांपूर्वी:
तुमची प्रतिकारशक्ती वाढवा: वर्षांच्या या कालावधीमध्ये सर्दी आणि तापाची लागण आपणा सर्वाना होण्याची शक्यता असते. दिवसातून एकदा १०० मिलिग्रॅम व्हिटॅमिन सीची गोळी घ्या. आवळा सरबत प्या.
घरी तयार केलेले खाद्यपदार्थ खा: स्वत:चे जेवण स्वत तयार केल्यामुळे तुम्ही काय खाता यावर तुमचे महत्त्वपूर्ण नियंत्रण राहते. फास्ट फूड आणि रेस्टॉरन्ट फूड वज्र्य करा.
व्यायाम आणि चलनवलन : आठवडय़ाचे कमीत कमी तीन दिवस व्यायाम करा. यामुळे तुमच्या शरीराचा डौल सुधारेल आणि तुम्हाला जास्त ऊर्जा मिळेल.
नवीन वर्षांच्या सायंकाळच्या
१ आठवडय़ापूर्वी :
मीठ कमी करा : मीठ पाणी रिटेन करते, यामुळे वजन वाढते आणि आपण सुस्त दिसतो. केचप, बार्बकि सॉससारखे खारट आणि कॉन्डिमेंट्स म्हणजेच खाद्यपदार्थाची चव वाढविणारे पदार्थ आणि हवाबंद किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ कोणत्याही मोठय़ा उपक्रमाचा प्राधान्यक्रम ठेवत खाणे टाळा.
तुमचे जेवण टाळू नका: उपवास आणि उपवास पद्धती अनुसरू नका. जेवण टाळल्यामुळे गोड पदार्थ, फरसाण आणि उरलेसुरले खाण्याकडे तुमचा कल असतो. २-३ वेळा जास्त खाण्याऐवजी ५-६ वेळा कमी खा.
अल्कोहोल घेणे कमी करा : यामुळे डोळे निस्तेज आणि सुजलेले दिसतात. जर तुम्हाला प्यायचेच आहे तर छोटा व्होडका प्या. कॉक्टेल्स टाळा, कारण त्यामुळे वजन वाढते.
ताणतणाव टाळा : आपल्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी ताणतणाव चांगला नाही. यामुळे तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते. छोटय़ा विषयांसाठी भावुक होऊ नका आणि जीवन सहजतेने जगा. हा तणाव टाळण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे.
झोपेकडे लक्ष द्या : शरीराला विश्रांती आणि ऊर्जा देण्यासाठी शक्य तितक्या लवकर रात्री पुरेशी झोप घेणे जरुरीचे आहे.

हिवाळ्यासाठी खास काळजी
* नवीन वर्ष आणि हिवाळा साथीनेच येत असल्याने हवामानबदलासाठी शरीराला तयार करा. स्वत:ला उबदार ठेवा आणि उष्णतावर्धक पदार्थाचे सेवन करून संसर्गापासून लांब राहा.
* बदाम, काजू, मनुका, अक्रोड आणि जर्दाळूसारखे अनसॉल्टेड नट्स आणि सुकामेवा खा. यांमध्ये पोषक न्यूट्रिशन्स जास्त असतात आणि पचायला दीर्घकाळ लागत असल्याने तुमची भूक शमवतात. ग्रिल्ड केलेले आणि भाजलेले अन्नपदार्थ खा, जे अतिरिक्त उष्णता निर्माण करण्यासाठी शरीराला स्टिम्युलेट करतील.
* ताज्या हळदीची एक स्टिक आणि एका आवळ्याचा रस नियमितपणे प्या. हे हिवाळ्यामध्ये उपलब्ध असतात आणि संसर्गापासून संरक्षण करण्यात तुमची मदत करतात.
* पुरेसे पाणी प्या आणि नट्स व फिश ऑइल्ससारखे व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ फॅट्टी अ‍ॅसिडने युक्त पदार्थाचे सेवन करा, जेणेकरून तुमची त्वचा शुष्क होणार नाही.
* मॉइश्चर राहण्यासाठी केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावा. चांगल्या कंडिशनरने केस नियमितपणे कंडिशन करा.
* भारतात, आपण वर्षांचे काही महिनेच कमी तापमानाचा अनुभव घेतो. गरम सूप्स, गरम करी, स्टीमी ब्रोथ्ज, तृणधान्ये, रोस्टेड नटस् यांसारख्या गरम खाद्यपदार्थासोबत या मोसमाचा आनंद लुटा, जे तुम्हाला शारीरिक ऊर्जा आणि आंतरिक उबदारपणा देतात.