काही मुलींना डॅशिंग, स्टंट करणारा मुलगा आवडतो तर काही जणींना हँडसम हंक भावतो, काही मुलींना चॉकलेट हीरोसारखी प्रतिमा असणारा लव्हर बॉय हवासा वाटतो. प्रत्येकाच्या जमान्यात लाखो दिलोंकी धडकन असणारा एकतरी हिरो असतोच, पण हिरो आवडण्यामागच्या मुलींच्या कल्पना मात्र वेगवेगळ्या असतात.
तुमच्या मनातला हीरो कोण आणि का याविषयी विचारल्यावर भाग्यश्री म्हणाली, तिला रणवीर सिंग आवडतो, कारण त्याची स्माईल, उंची तिला खूप आवडते. शिवाय आत्ताच्या सिनेमात ‘शर्टलेस हिरो’ म्हणून तो एकच गाजतोय, असंही ती सांगते. ऋचा आणि मधुरा म्हणतात की, त्यांना सुयश टिळक आवडतो, कारण त्याच्या मालिकेतल्या भूमिकेत तो खूप हँडसम दिसतो. म्हणजेच एखादा हिरो आवडताना त्याच्या लुक्सबरोबरच त्याची मालिकेतली किंवा सिनेमातली भूमिकाही इम्प्रेस करत असते.

vv20‘‘विकास खन्ना आवडतो, याच्या बोलण्यामुळे आणि स्टाईलमुळे. स्वयंपाक येणारी मुलं इम्प्रेसिव्ह वाटतातच.’’

श्रुती

आता टीव्हीवरच्या हँडसम्समध्ये केवळ अभिनेतेच आहेत असं नाही. याबद्दल बोलताना श्रुती म्हणाली, तिला विकास खन्ना आवडतो. त्याच्या बोलण्यामुळे आणि स्टाईलमुळे. शिवाय मुलाला स्वयंपाक करता येणं हे आजकालच्या ‘इनडिपेंडंट’ मुलींसाठी खूप महत्वाची आणि इम्प्रेशन पाडणारा विषय असतो, असं तिचं म्हणणं.

vv21‘‘सुयश टिळक आवडतो, कारण त्याच्या मालिकेतल्या भूमिकेत तो खूप हँडसम दिसतो.’’

– ऋचा

एकूण काय तर मुलींना लुक्सबरोबरच गुणही हवे असतात तर. मालिकेत बायकोला समजून घेणारा, तिच्या करिअरला स्वत:च्या करिअर इतकंच महत्वं देणारा, सिनेमात गुंडांशी लढणारा तर कधी लाडिकपणे खोड्या काढणारा मुलगा मुलींच्या पसंतीस उतरतो.