14 October 2019

News Flash

फॅशन पॅशन : मुलांसाठी आयडियल फॉर्मल वेअर

हाय, मी तुमच्या कॉलमचा आणि ‘व्हिवा’चा फॅन आहे. मी २० वर्षांचा असून बीकॉम करतोय. माझी उंची ५’ ८’’ आहे. मी तसा बारीक आहे आणि वजन

| May 23, 2014 01:09 am

हाय, मी तुमच्या कॉलमचा आणि ‘व्हिवा’चा फॅन आहे. मी २० वर्षांचा असून बीकॉम करतोय. माझी उंची ५’ ८’’ आहे. मी तसा बारीक आहे आणि वजन अंदाजे ५५ ते ५७ किलोच्या आसपास असते. माझं कॉम्प्लेक्शन ब्राइट आहे. स्मार्ट ड्रेसिंगबद्दल काही सल्ला द्या.. मला फॉर्मल्स वापरायला आवडतात.
– तेजस (अहमदनगर)

हॅलो तेजस,
सर्वप्रथम धन्यवाद. या सदरामधून मुलांना मदत होतेय हे वाचून आनंद झाला. आता तुझ्या प्रश्नाकडे वळूया. तुझ्या वर्णनावरून तू अगदी सडपातळ बांध्याचा वाटतोस. तुझी उंची चांगली आहे. माझ्या मते, खरेतर सगळेच पुरुष फॉर्मल्समध्ये चांगले दिसतात. पण तू आत्ता कॉलेजला आहेस आणि आत्ता याच वयात ड्रेसिंगचे सगळे पर्याय मुलांना खुले असतात. एकदा का तुम्ही कामाला लागलात की, कॉलेज स्टाइल ड्रेसिंग करता येत नाही म्हणून रुखरुख वाटत राहते.
मुलांच्या देहयष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचे खांदे. रुंद खांदे आणि निमुळती कंबर हे मुलांसाठी आदर्श शरीरयष्टीचं लक्षण मानलं जातं. अशी उठावदार देहयष्टी खुलते फॉर्मल जॅकेट घातल्यावर.. आपण ज्याला नॉर्मली ब्लेझर म्हणतो त्या ब्लेझरमध्ये म्हणूनच मुलं स्मार्ट वाटतात. ब्लेझरला शोल्डर पॅड्स असतात. त्यामुळे खांदे आहेत त्यापेक्षाही रुंद वाटतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व भारदस्त वाटते. तुझ्यासारखी शरीरयष्टी असणाऱ्या मुलासाठी एखादा जाड कापडाचा शर्ट आत घातलास की काम झाले. त्याच्याखाली स्ट्रेट ट्राउझर्स असले पाहिजेत. पण लक्षात घे.. हा लूक पूर्णपणे फॉर्मल आहे. फॉर्मल मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा तशाच औपचारिक कार्यक्रमात हे कपडे शोभून दिसतील. पण आजकाल त्या बरोबरीने तसेच पण अधिक युथफूल अशी डेनिम जॅकेट्स आली आहेत. त्याचा वापर करू शकतोस. या जॅकेट्सचा ब्लेझरसारखाच परिणाम असतो. म्हणजे खांदे रुंद दिसतात आणि ब्लेझरपेक्षा कंफर्टेबलही असतात. मुख्य म्हणजे अशी जॅकेट्स जीन्सवर घातलेली चालतात आणि त्यावरच उठून दिसतात. यातून एक स्मार्ट, कॅज्युअल लूक मिळतो आणि त्याला तुला हवा तसा फॉर्मल टचसुद्धा असतो.
रंगाबद्दल म्हणशील तर तू या वयात कुठलाही रंग वापरू शकतोस. तुझा वर्णही उठावदार आहे, त्यामुळे सगळेच रंग तुला चांगले दिसतील. पण हलके, फिके रंग तुला आहेस त्यापेक्षा थोडा जाड असल्याचा भास निर्माण करतील. त्यामुळे ते वापरायला प्राधान्य दे. कापड जड आणि जाड असलेलं वापर. त्यामुळे तू सडपातळ दिसणार नाहीस. स्वेटशर्ट किंवा त्या प्रकारचे जाड कापडाचे शर्ट वापर (अर्थात उन्हाळ्यात हे शक्य होणार नाही.) उभ्या लाइनीऐवजी आडव्या रेघा असणारे शर्ट घे. त्यामुळेदेखील तू आहेस त्यापेक्षा सुदृढ दिसशील. बाकीच्या गोष्टी तुझ्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वासाचा भाग आहे. तू किती कॉन्फिडंटली हे कपडे कॅरी करतोस त्यानुसार तुझा अ‍ॅटिटय़ूड दिसून येईल.

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com

First Published on May 23, 2014 1:09 am

Web Title: ideal formal wear for guys
टॅग Cloths,Fashion