31 May 2020

News Flash

जुना गडी नवं राज्य

त्या त्या देशाची संस्कृती नि परंपरा पेहरावावरून ठरवायची म्हटली तर भारतीय स्त्रियांचा पोशाख म्हणून साडीच येते चटकन डोळ्यांसमोर.

| September 4, 2015 07:07 am

त्या त्या देशाची संस्कृती नि परंपरा पेहरावावरून ठरवायची म्हटली तर भारतीय स्त्रियांचा पोशाख म्हणून साडीच येते चटकन डोळ्यांसमोर. पण नेसायला वेळ लागतो, वावरताना अडचण होते वगैरे हजार कारणं देत साडी वॉर्डरोबच्या तळाशी गेली नि सलवार-कुर्ता, फॉर्मल्स स्वीकारले गेले. केवळ सणावारापुरती साडी नेसणं आणि तीही डिझायनर वेअर किंवा शिफॉन-जॉर्जेटची हा पायंडाच जणू पडला. त्यामुळं मग एखादीनं आजीची पारंपरिक साडी नेसल्यावर ‘काकूबाई’ म्हणून हिणवलं गेलं. आता ती काकूबाईच ‘कूल’ ठरू लागलेय.
सगळ्याच ठिकाणी पारंपरिक साडी एकदम छा सी गयी हैं. फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे म्हणतात की, ‘पारंपरिक साडय़ा त्यांच्या क्लासिनेसमुळं नेहमीच इन राहिल्यात. फक्त त्यांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समुळं त्यांचा ट्रेण्ड आता आलाय, असं वाटत राहतं. खरं तर साडी हा प्रकार टाइमलेस म्हणावा लागेल. आपल्या आई-आजीच्या साडय़ांना थोडासा कन्टेम्पररी लुक दिला तर त्या यंग जनरेशनला वापरायला नक्कीच आवडतील. महेश्वरी, कांजीवरम वगैरे साडय़ांना थोडंसं रिपोझिशन केलं तर त्या आणखी खुलून दिसतील नि त्या आवडीनं नेसल्या जातील.’
फॅशन डिझाईनर अमित दिवेकर म्हणतात की, ‘व्हिंटेज ही टर्म सध्या जगभरात लोकप्रिय होतेय. बेसिक ट्रॅडिशनल गोष्टी पुन्हा रिव्हाइव्ह होताहेत. ते लोकांना आवडतंय. आपल्या पारंपरिक साडय़ांचा एक वेगळाच चार्म असतो. त्यांचा पोत, रंगरूप वेगळंच असतं. आता त्यांचा ट्रेण्ड येतोय. बरेच डिझायनर्सही यात एक्सप्लोअर करताहेत. या साडय़ांमध्ये फारसे काही बदल करता कामा नयेत पण यंगस्टर्ससाठी मॉडर्न ब्लाऊज शिवून, वेगळी ड्रेपरी करून त्यांना यंग लुक देता येईल. बनारसी साडी क्लासी असून कायमच पॉप्युलर आहे. पैठणी तिच्या अतिपरिचयामुळं नि भडक रंगसंगतीमुळं मागं पडलेय सध्या. त्याऐवजी थोडीशी काळी पडलेली, काळाच्या खुणा जपणारी साडी इन आहे.’
नवीन पिढीतील डिझायनर अनाविला मिस्राशीदेखील ‘व्हिवा’ने संवाद साधला. ‘भारतीय हवामान जरा दमट असल्याने मी खादी, कॉटन इत्यादींचा वापर जास्त करते. त्याचबरोबर लिननचाही खूप वापर होताना दिसतो. साडय़ांवर नवनवीन प्रयोग करून त्या अधिक सिप्लिफाय करण्याचा प्रयत्न आम्ही डिझायनर्स करतो आहोत, जेणेकरून पुढच्या पिढीला साडय़ा नेसायला आवडेल.’
सो, गर्ल्स, आजी किंवा आईच्या वॉर्डरोबमधली एखादी सुंदर पारंपरिक साडी चूज करा. तिला थोडा ‘तुमचावाला’ टच द्या.  नेसायला निमित्त आहेतच सध्याचे सणवार!
सम्जुक्ता मोकाशी -viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2015 1:17 am

Web Title: indian women apparel saree
Next Stories
1 बनारसी जादू
2 साडीचे सौंदर्याख्यान इटालियन नजरेतून
3 किंग ऑफ पॉप
Just Now!
X