News Flash

खावे त्यांच्या देशा : इटालियन पिझ्झा (इटली २)

शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होतेय. युरोपीय संस्कृतीत खाण्याची सगळ्यात जास्त चंगळ असलेला देश म्हणजे इटली.

| May 23, 2014 01:05 am

शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होतेय. युरोपीय संस्कृतीत खाण्याची सगळ्यात जास्त चंगळ असलेला देश म्हणजे इटली. इथलं खाणं जगभरात लोकप्रिय आहे. आधुनिक पाकक्रियेची सुरुवात आणि रेसीपीज शेअर करणारी कुक बुक इथेच प्रथम जन्माला आली. अशा आद्य खाद्यसंस्कृतीची ओळख. तिथल्या पिझ्झाच्या जन्माची गोष्ट
इटली म्हटलं की पिझ्झा डोळय़ांसमोर आलाच पाहिजे आणि पिझ्झा म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. आजकाल तर आठवडय़ा-दोन आठवडय़ांतून पिझ्झावर ताव मारला नाही तर उपास घडल्यासारखा वाटतो नाही? पिझ्झाची क्रेझ आहेच अशी.
पिझ्झा इटालियन आहे हे माहितीय. पण या पदार्थाची सुरुवात नेमकी कुठे आणि कशी झाली माहितीय का? इटलीमध्ये ‘नेपल्स’ या भागात या पदार्थाचा उगम झालाय. छोटय़ा छोटय़ा ‘पिझ्झारियात’ हा चवदार पदार्थ सव्‍‌र्ह केला जाऊ लागला. रस्त्यावरच्या हातगाडीवर पण मिळू लागला. या पिझ्झारियात आजही ‘वुड फायर ओव्हन’ मधला पिझ्झा मिळतो. म्हणजे लाकडाच्या चुलीवरच्या भट्टीत भाजलेला. हा पिझ्झा भलताच टेस्टी असतो. आज कुठेही मेन्यूकार्डवर आपण ‘पिझ्झा मार्गारिटा’ वाचतो. याचं नाव पडलं ते इटलीच्या ‘मार्गारिटा’ या राणीवरून हे मी मागच्या भागात सांगितलंच. पण त्याची कथा रंजक आहे. आज जो पिझ्झाला मान आहे तो आधी नव्हता बरं का! ही मार्गारिटा राणी जेव्हा शहरात फेरफटका मारत होती, तेव्हा तिला एका छोटय़ाशा दुकानात एका पातळ ब्रेडवर सॉस टाकून, वरून चीज घालून लोक खाताना दिसले. तिने तिच्या नोकरांना पाठवून तो पदार्थ मागवला आणि खाल्ला. तिला ते कॉम्बिनेशन फारच आवडलं. तिने तिच्या शेफ मंडळींना तो बनवायला सांगितला आणि तेव्हापासून तिच्या नावाचा ‘पिझ्झा मार्गारिटा’ जगभरात फेमस झाला.
पिझ्झामध्ये सगळय़ात महत्त्वाचा घटक म्हणजे पिझ्झा क्रस्ट किंवा पिझ्झा बेस. त्याची रेसिपी प्रत्येकाची थोडीफार वेगळी असते. यात साधारणपणे मदा, यिस्ट, साखर, मीठ, पाणी आणि ऑलिव्ह ऑईल हे घटक असतात. हातानं पिझ्झा बेस पसरवून मग टॉपिंग्ज टाकतात. पिझ्झाबेस क्रिस्पी करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे राइट टेम्परेचरसकट सगळं व्यवस्थित जुळून आलं की मग काय आपल्या पिझ्झा पार्टीला धमाल येते.

पॅन रोस्टेड फिश विथ टोमॅटो अ‍ॅण्ड हर्ब ऑलिव्ह ऑईल

साहित्य : ऑलिव्ह ऑईल – एकतृतीयांश कप, ओवा -२ चिमूट , रोझमेरी – २ टीस्पून, बेसिल – १ टीस्पुन (चिरलेले), रेड चिली फ्लेक्स – अर्धा टी स्पून, मीठ-काळीमिरी पूड – चवीनुसार, माशाचे तुकडे – २ (अर्धा इंच तुकडे केलेले) चेरी टोमॅटो – अर्धा कप, (दोन दोन तुकडे केलेले)

कृती : एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि हर्बस् (वर दिलेले मसाले) घेऊन एकत्र मिक्स करा. चवीपुरते मीठ आणि काळीमिरी पूड टाका आणि बाजूला ठेवा. ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करा. मध्यम आचेवर कढई गरम करा. त्यामध्ये १ टेबल स्पून ऑलीव्ह ऑईल टाका. तेल चांगले गरम होईपर्यंत आचेवर ठेवा. माशांच्या तुकडय़ांना मीठ आणि काळीमिरी पूड लावून घ्या. २ ते ३ मिनिटे, सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्या. माशांचे तुकडे दोन्ही बाजूंनी परतून घ्या आणि ओव्हनमध्ये टाकून ५-७ मिनिटे शिजू दय़ा. ओव्हनमधून काढून घ्या. त्यावर हर्ब ऑईल टाका. टोमॅटोसोबत गरमागरम सव्‍‌र्ह करा.

रोस्टेड पेपर सूप

साहित्य : रंगीत सिमला मिरची (पिवळी, लाल) – प्रत्येकी २, ऑलिव्ह ऑईल – ३ टेबल स्पून, चिरलेला कांदा – १ छोटा, लसूण पाकळय़ा – ३, मध्यम आकाराचा बटाटा – १ (मोठे तुकडे केलेला), चिकन स्टॉक- ३ कप, मीठ-काळीमिरी पूड – चवीनुसार.
गाíनशसाठी – क्रुटॉन्स (भाजलेले ब्रेडचे तुकडे), परतलेले झिंगे किंवा कांदा पात

कृती : ढोबळी मिरचीला थोडं तेल लावून परतून घ्या. (वरची साल थोडी काळी पडेपर्यंत). नंतर प्लॅस्टिक पिशवीमध्ये १५ मिनिटे ठेवून दय़ा. एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात कांदा आणि लसूण परतून घ्या. नंतर त्यात ब्रोथ आणि बटाटा टाका. पंधरा मिनिटे शिजू दय़ा. ढोबळी मिरचीची साल, बिया काढून बारीक करून घ्या. तयार मिश्रणात हे टाकून आणखी १० मिनिटे शिजू दय़ा. नंतर तयार मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. नंतर तयार सूप बाऊलमध्ये घेऊन चवीनुसार मीठ, काळीमिरी पूड टाका. कांदापात किंवा िझग्याने गाíनश करून गरमागरम सव्‍‌र्ह करा.
www.devwratjategaonkar.com


आजची सजावट : स्ट्रॉबेरी जेली बाईट्स

हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कावर्ि्हग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
साहित्य : स्ट्रॉबेरी, लिंबू, पिठी साखर, स्ट्रॉबेरी जेली
कृती : प्रथम स्ट्रॉबेरीच्या टोकाचा भाग (बेससाठी) आणि देठाचा खालचा भाग काढून घ्या. स्ट्रॉबेरीचा गर स्कूपरनं काढावा.
मग त्या स्ट्रॉबेरीच्या बाऊलमध्ये स्ट्रॉबेरी जेलीचे लिक्वीड घाला आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्या.
प्लेटमध्ये पिठीसाखर काढून घ्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे स्ट्रॉबेरीची वरची बाजू त्यावर घोळवा.
लिंबाची एक फोड कापून घ्या आणि त्याचे चित्रात दाखवल्याप्रमाणे बारीक स्लाईस कापून स्ट्रॉबेरीवर गार्निश करा.
प्लेटमध्ये स्ट्रॉबेरी अरेंज करून स्ट्रॉबेरी जेली बाईट्स सव्‍‌र्ह करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2014 1:05 am

Web Title: italian pizza
Next Stories
1 मूड फूड
2 कानच्या कार्पेटवर
3 व्हिवा दिवा : समीधा अवसरे
Just Now!
X