28 September 2020

News Flash

फिटनेस ट्रेण्ड्स

तेच ते व्यायाम प्रकार करून कंटाळलेल्या तरुणाईला या नवीन ट्रेण्ड्सचं आकर्षण असतं.

फिटनेसच्या जगात दररोज काही नवीन नवीन गोष्टी दाखल होत असतात. तेच ते व्यायाम प्रकार करून कंटाळलेल्या तरुणाईला या नवीन ट्रेण्ड्सचं आकर्षण असतं. लेटेस्ट फिटनेस ट्रेण्ड्स काय आहेत?

बदलत्या जीवनशैलीनुसार जुन्या-नव्या व्यायाम प्रकारांची सांगड घालत किंवा नव्यानेच एखादा व्यायाम प्रकार समोर आणत प्रत्येक जण फिटनेस मंत्र जपण्याच्या मागे आहे. शिक्षण, करिअर, पैसा आणि त्यासोबत येणाऱ्या लाइफस्टाइलच्या चेकलिस्टमध्ये फिटनेस आघाडीवर असावा असं वाटणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकेकाळी एरोबिक्स हा प्रकार अनेकांना आकर्षित करत होता. त्यानंतर अनेक फिटनेस ट्रेण्ड आले आणि गेले. सध्याचे फिटनेस ट्रेण्ड कोणते आहेत याची झलक..

किक बॉक्सिंग :
16ऑलिम्पिकचा एक खेळ म्हणून नव्हे तर फिटनेसच्या दृष्टीने किक बॉक्सिंगच्या आखाडय़ात अनेक जण पाय ठेवत आहेत. हाय इन्टेन्सिटी वर्कआऊट म्हणून या प्रकाराकडे पाहिलं जातं. एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करण्यासाठी किक बॉक्सिंगकडे अनेक जण वळतात. किक बॉक्सिंगच्या एका तासाच्या वर्कआऊटमुळे जवळपास ७५० कॅलरीज कमी करता येऊ शकतात असं या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचं मत आहे. सेल्फ डिफेन्स म्हणूनही किक बॉक्सिंग शिकण्याचा फायदा होतो. त्याबरोबर शारीरिक लवचीकता वाढवण्यासाठीही मदत होते. सुदृढ शरीराबरोबर आत्मविश्वास आणि परिणामकारक स्ट्रेस बस्टर म्हणून सध्या या प्रकाराला महत्त्व येत आहे.

बूट कॅम्प :
बूट कॅम्प हा अशा व्यायाम प्रकारांचा समूह आहे ज्यात पारंपरिक व्यायामाबरोबरच बॉडी वेट ट्रेनिंग, इंटरव्हल ट्रेनिंग व स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा समावेश 21असतो. बूट कॅम्पमध्येही पूर्ण क्षमतेनिशी व्यायाम करणं अपेक्षित असतं. वेगवेगळे व्यायाम प्रकार एकामागून एक करणं आणि त्याची लय बिघडू न देणं हे यात महत्त्वाचं असतं. हा ग्रुप एक्सरसाइजचा व्यायाम प्रकार आहे. सध्या जिम्समध्ये बऱ्याच मोठय़ा प्रमाणात बूट कॅम्प केले जातात. सैन्यदलात दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंगशीही बूट कॅम्पची तुलना केली जाते. रनिंग इन प्लेस, जम्पिंग जॅक्स, पुश-अप्स, फुटबॉल, स्टाइल ड्रिल्ससारख्या व्यायाम प्रकारांनी हे बूट कॅम्पचं पॅकेज फुल्ल असतं. स्नायू आणि हाडांच्या मजबुतीसोबतच उत्तम असा कार्डिओ करण्यासाठी बूट कॅम्प इज द बेस्ट..

 

एचआयआयटी :
19हे कोणत्या सॉफ्टवेअरचं वगैरे नाव नसून हे लघुरूप आहे आणि फिटनेस जगतात लोकप्रिय आहे. एचआयआयटी म्हणजे ‘हाय इन्टेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग’. हा कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइजचाच अधिक प्रभावी असा एक प्रकार आहे. सहसा चार मिनिटांपासून ते ३० मिनिटांपर्यंत हा व्यायाम केला जातो. सहनशक्ती, शारीरिक ताकदीची क्षमता वाढवण्यासाठी आणि शरीरातील चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठी एचआयआयटी या व्यायाम प्रकाराचा उपयोग होतो. फिटनेसबाबत काही ध्येय ठेवून एचआयआयटीचे व्यायाम प्रकार अवलंबले जातात. हे करणाऱ्यांनी आपल्या डाएटकडे विशेष लक्ष द्यायची आवश्यकता असते. एचआयआयटी इंटरव्हल ट्रेनिंग टायमर (मेन, वुमेन) आणि एचआयआयटी इंटरव्हल ट्रेनिंग प्रो असे अ‍ॅप्सही तुमच्या स्मार्टफोनमधून तुम्हाला गाइड करू शकतात. कमीत कमी वेळात वेगानं आणि पूर्ण क्षमतेनं व्यायाम करायचा आणि मग थोडे क्षण विश्रांती, पुन्हा वेगाने पुढचा तितकाच अवघड सेट करायचा.. अशी याची सर्वसाधारण रचना असते.
अ‍ॅक्वा झुम्बा
20गेल्या काही वर्षांत झुम्बा हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. लॅटिन अमेरिकन म्युझिकच्या तालावरचा हा प्रकार एरोबिक्सच्या जवळ जाणारा असला, तरी यातल्या स्टेप्स वेगळ्या आहेत. अधिक लयबद्ध हालचाली यात अपेक्षित असतात. सध्या पाण्यात उभे राहून झुम्बा करण्याचा प्रकार अ‍ॅक्वा झुम्बा नावानं ट्रेण्डमध्ये आहे. संगीताच्या तालावर पाण्यात केलेल्या लयबद्ध हालचाली संपूर्ण शरीराला व्यायाम देणाऱ्या असतात. स्विमिंग पूलमध्ये करण्याचा हा ग्रुप एक्सरसाइजचा प्रकार आहे.

मिक्स्ड मार्शल आर्ट्स :
एमएमए या नावानं हा प्रकार भारतात फार प्रचलित नसला तरीही महत्त्वाच्या व्यायाम प्रकारांमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये ट्रेण्डिंग आहे. मार्शल 18आर्ट्स हा पूर्वेकडील जगाचा प्रकार. पण आता जगभर याची ख्याती पसरली आहे. लढाई किंवा सेल्फ डिफेन्सच्या पलीकडे जाऊन फिटनेस ट्रेण्ड म्हणूनही मिक्स्ड मार्शल आर्ट्स ओळखलं जातं. सततचे जुनाट व्यायाम प्रकार बाजूला सारत काहीतरी चॅलेंजिंग करण्यासाठी तरुणाई एमएमएकडे वळत आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये ग्राऊंड बेस्ड आणि स्टँडअप फायटिंग ट्रिक्ससोबतच ब्राझिलिअन जिऊ जित्सू आणि किक बॉक्सिंगचाही समावेश होतो.

 

पिलाटीस :
पिलाटीस हा दक्षिणात्य देशांत बराच प्रचलित असणारा व्यायाम प्रकार. काही निवडक व साचेबद्ध व्यायाम पद्धतींनी शरीराची केलेली हालचाल म्हणजे ‘पिलाटीस’. नेहमी पिलाटीस या व्यायाम प्रकाराने वर्कआऊट केलं, तर स्नायू आणि सबंध शरीराचीच लवचीकता, सहनशक्ती आणि ताकद वाढते. पिलाटीसमध्ये पिलाटीस कर्ल, द हण्ड्रेड, रोल अप, सिंगल – डबल लेग स्ट्रेच, क्रिसक्रॉस यांसारख्या प्रकारचे व्यायाम केले जातात. इंटरनेटच्या माध्यमातून हे व्यायाम प्रकार घरच्या घरीही शिकण्याचा पर्याय आता सर्वानाच उपलब्ध आहे.    17

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:31 am

Web Title: latest fitness trends
Next Stories
1 Wear हौस: ट्रेण्डी जिम लूक
2 एक्स्प्लोअर करा, एक्स्पोज नको!
3 सांग ना रे मना..
Just Now!
X