लॅबमधली प्रॅक्टिकल्स, ‘डॉमिनोज्’मधला जॉब नि इंग्रजीच्या टय़ूशन्स अशी व्यवधानं ‘ती’ सांभाळतेय. मराठमोळ्या संस्कृतीत रुजून मुंबईकरच झाल्येय. जाणून घेऊया मीनाक्षी नायडूविषयी!
प्रयोगशाळेतला एक किस्सा ‘तिला’ आठवतोय.. डाफनिया या अतिसूक्ष्म जिवाचे हार्टबिट्स विद्यार्थ्यांना मोजायचे होते. हा अतिसूक्ष्म जीव कंपाऊंड मायक्रोस्कोपखालीही नीट दिसत नाही. त्याचे हार्टबिट्स कसे काय मोजणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मग त्यांच्या प्रोफेसर मदतीला पुढं सरसावल्या. त्यांनी नेमकेपणानं काय काय करायचं ते सांगितलं. मुलांनी ते तंतोतंत फॉलो केलं.. आणि येस्स.. विद्यार्थ्यांना डाफनियाचे हार्टबिट्स मोजता आले. हा प्रयोग केल्यानंतर ‘तिला’ खूपच बरं वाटलं होतं. ही आहे मीनाक्षी नायडू, प्रत्येक गोष्ट मन लावून, जीव ओतून करणारी!
ती डी. जी. रुपारेल कॉलेजमध्ये एस.वाय. बी.एस्सी.ला आहे. प्राणिशास्त्रामध्ये तिला अधिक रस असून ती टी.वाय.ला तोच मुख्य विषय घेणारेय. तिला शाळेपासूनच विज्ञान विषयाची आवड आहे. प्राण्यांविषयी तिला क्रेझ आहे. कॉम्प्युटरसारख्या नॉन-लििव्हग गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा लििव्हग िथग्जचा अभ्यास करणं ती पसंत करते. कारण लििव्हग िथग्जची खूप माहिती मिळवता येऊ शकते. मीनाक्षी म्हणते की, ‘झुऑलॉजीमध्ये आपल्याला बारीकसारीक माहितीही मिळते. फॅक्चुअली आपण त्याचं ऑब्झव्‍‌र्हेशन करून त्याअनुषंगाने विचार करू शकतो.’ मध्यंतरी ती कॉलेजच्या झूऑलॉजी एक्सकर्शनला दापोलीला गेली होती. तिथं करिअरच्या दृष्टीनं आणि तिथल्या फििशगविषयी मिळालेली माहिती तिला खूप इंटरेिस्टग वाटली होती.      
पुढं तिला फॉरेन्सिकमध्ये करिअर करायचंय. त्यासाठीच्या अ‍ॅडव्हान्स कोर्सची फी नि हॉस्टेलचा खर्च भरमसाट असून हा कोर्स फक्त दिल्ली नि अहमदाबादमध्येच उपलब्ध आहे. ते शक्य न झाल्यास एम.एस्सी. करून तिला शिक्षकी पेशात जायचंय. ती सध्या ‘डॉमिनोज्’मध्ये जॉब करत्येय. एफ.वाय.नंतरच्या सुट्टीत तिनं दोन महिने ‘डॉमिनोज्’मध्ये काम केलं होतं. तिथं ती दोन दिवसांचं ट्रेिनग घेऊन ‘कस्टमर सíव्हस एक्झिक्युटिव्ह’ म्हणून जॉइन झाली. कॉलेज-प्रॅक्टिकल्समुळं फक्त वीकेण्ड्सनाच तिथं जाते.
लोकांशी संवाद साधण्यातल्या प्रावीण्यामुळं तिनं डॉमिनोज्मध्ये कस्टमर रिलेशन चांगले मेन्टेन केल्येत. कस्टमर्सचे कॉल्स अटेंड करून त्यांच्या ऑर्डर्स ती घेते. बोलता बोलता ती एक किस्सा सांगते. ‘एका कस्टमरचा कॉल आला. त्यांनी एका माणसासाठी किती पिझ्झा लागेल, असं विचारलं. तिनं ते सांगितल्यावर मग तुला माझी माहिती कशी कळली वगरे गप्पाटप्पा ते मारायला लागले. इकडे माझी घरी जायची वेळ झाली होती. तेवढय़ात त्यांनी ऑर्डर देऊन ती रिपिट करायला सांगितली. ती रिपिट केल्यावर त्यांनी मी असं सांगितलेलंच नाही, असा घोळ घालायला सुरुवात केली. मग मी त्यांना स्पष्टपणं असं करण्यामागचं कारण विचारलं. त्यांनी सांगितलं की ‘मी आत्ताच जॉब करून आलो असून मला खूप भूक लागल्येय. मला तुझा आवाज आवडला. नंतरही मी तुलाच ऑर्डर देणार.’ मी त्यांना दरवेळी असं होऊ शकणार नाही, असं समजावलं. मग त्यांनी नीट ऑर्डर दिली. आता ते दर आठवडय़ाला ऑर्डरसाठी कॉल करतात. आता तो कॉल मीच अटेन्ड करावा, अशा इन्स्ट्रक्शन्स मॅनेजरनी दिल्यात. आणखी एक किस्सा आहे- मध्यंतरी पडलेल्या धुवाधार पावसातही आमची सíव्हस सुरू होती. एका मॅडमनी ऑर्डर दिली नि त्यांच्या नेहमीच्या पत्त्यावर पाठवण्यापेक्षा अमुक पत्त्यावर पाठव असं सांगितलं. मात्र डिलिव्हरी बॉय नेहमीच्याच ठिकाणी गेला. लगेच त्यांचा कॉल आम्हाला आला की, चुकीच्या ठिकाणी ऑर्डर दिलीत म्हणून. मग आम्ही पावसामुळं नीट ऐकू आलं नाही, अशी दिलगिरी व्यक्त करून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी सíव्हस दिली. शेवटी कस्टमर इज किंग. आमच्या ब्रँचमध्ये मॅनेजरसह सगळे जणच खूप सपोर्टव्हि नि समजूतदार आहेत.
या वर्षीपासूनच ती पहिली ते पाचवी ते आठवीच्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची टय़ूशन घेत्येय. टीचरनं सांगितलेलं बरोबरच आहे, पण मी सांगितलेलंही लक्षात ठेवा, असं तिला मुलांना समजवावं लागतं. या दीदीशी मुलांची गट्टी जमल्येय. मत्रिणीच्या ज्युनिअर केजीमधल्या चिमुरडीची टय़ूशन घ्यायला मीनाक्षीनं सुरुवात केली, ती मदत म्हणून. नंतर इतर मुलंही येऊ लागली. त्या हट्टी चिमुरडीला टेस्टमध्ये आऊट ऑफ बॉक्स मार्कस् मिळाल्येत. चिमुरडीच्या शाळेत मीनाक्षीचं खूप कौतुक होतंय. दिवसभर कॉलेज-प्रॅक्टिकल्स असतात. घरी आल्यावर टय़ूशन्स असतात. रात्री जागून ती स्वत:चा अभ्यास करते. मग पहाटे उठून घरकामात मदत करून ती कॉलेज गाठते.
तिच्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज्ना घरच्यांचा खूपच पािठबा आहे. आईच्या हातचे पदार्थ खायला तिला खूपच आवडतं. दर रविवारी आईच्या श्रद्धेखातर तिच्यासोबत ती देवळातही जाते. ती सांगते की, ‘क्वचित कधी लेक्चर मिस झाल्यास टीचर तो भाग पुन्हा समजावतात. फर्स्ट बेन्चवर बसून मस्ती करणारा आमचा ग्रूप फेमस आहे. माझ्या फ्रेण्ड्स खूप हेल्पफुल नि सपोर्टव्हि आहेत. त्यांच्याबरोबर पाहिलेला पहिलाच मराठी चित्रपट ‘दुनियादारी’ मला फार आवडलाय. आमच्याकडे पाच दिवसांचा गणेशोत्सव असतो. आम्ही इथल्या संस्कृतीत अलगदपणे मिसळून गेलो आहोत. तमिळ असूनही आम्ही छान मराठी बोलतो.’ एवढं बोलून ती दिलखुलास हसते. ‘यह हैं रिश्तों का टाइम’ ही आहे ‘डॉमिनोज्’ची टॅगलाइन. तिथं जॉइन व्हायच्या आधीपासून मीनाक्षी जणू काही ही टॅगलाइन फॉलो करत्येय. कुटुंबीयांची काळजी घेत्येय. फ्रेण्ड्स-ऑफिसमधल्यांशी संवाद साधत्येय. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची जबाबदारीही मन:पूर्वक सांभाळत्येय. तिचं आवडतं गाणंच मुळी आहे- ‘तेरा मुझ से हैं पहले का नाता कोई..’  

‘लर्न अँड अर्न’चे प्रयोग आम्हाला कळवा
शिकता शिकता आपला छंद जोपासणारे आणि त्यातून पैसे कमावणारे काही विद्यार्थी आपल्या आसपास असतील, आपल्या परिचयाचे असतील तर आम्हाला नक्की कळवा. त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती viva.loksatta@gmail.com या पत्त्यावर पाठवा. सब्जेक्ट लाईनमध्ये लर्न अ‍ॅण्ड अर्न  असा उल्लेख नक्की करा.