शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. लेबनॉनच्या स्टॉपओव्हरचा हा दुसरा भाग.
अरबी संस्कृतीचा प्रभाव असणाऱ्या लेबनॉन या देशातली खाद्यसंस्कृती आपण गेल्या भागापासून पाहात आहोत. भारतात लेबनीज फूड आता नवं राहिलेलं नाही. फलाफल, हम्मस तर आपल्याकडे आणि संपूर्ण युरोप- अमेरिकेत खूपच प्रसिद्ध झालंय. लोकांना हा अरबी जायका अगदी आवडायला लागलाय.
लेबनॉनला सेदार वृक्षाची देणगी आहे. या सेदार वृक्षाचा उल्लेख बायबलमध्ये खूप ठिकाणी केला आहे. लेबनॉनच्या झेंडय़ामध्ये पण सेदार वृक्षाचं चित्र आहे. माझ्या वाचण्यात हे पण आलं की, किंग सोलोमन या यहुदी राजाचं मंदिर याच वृक्षापासून बनवण्यात आल होतं.
लेबनॉनच्या ‘जेझीन’ या गावी सोनं, चांदी, प्रेशियस स्टोनस् वापरून कटलरी बनविली जाते. त्याला हस्तीदंती हँडलस्नी सजवलं जातं. शिवाय ब्राँझ आणि तांब्याची ठोकून ठोकून निरनिराळी भांडी बनवली जातात. अशी मौल्यवान भांडीकुंडी घराघरांत एखाद्या स्पेशल ऑकेजनला किंवा लग्नसमारंभाला बाहेर काढली जातात. आपण आपल्या आजीची नथ किंवा ठुशी कशी पिढय़ान्पिढय़ा जपून ठेवतो, तशीच ही भांडी, कटलरी त्यांना प्रिय असते. ते त्यांचं पिढीजात ठेव असते.
लेबनॉनची नॅशनल डिश आहे – ‘किब्बे’. ही डिश मटण आणि गव्हाच्या तुकडय़ांपासून बनवली जाते. दुसरा पदार्थ म्हणजे -‘ताबुले’ सॅलड. हे सॅलड गहू, पार्सले, पुदिना, ऑलिव्ह ऑइल आदी वापरून केलं जातं. हे खूप पॉप्युलर आहे. लेबनॉनचा जगभरांत प्रसिद्ध असलेला गोड पदार्थ म्हणजे ‘बकलावा’. हा पदार्थ तसा मूळचा ग्रीसमधला. पण लेबनॉनमध्ये जास्त पॉप्युलर झाला. पिस्ते, बदाम आणि फ्लेकी पेस्ट्री (जसे आपल्याकडच्या खारीला पातळ लेयर्स असतात) पासून हे स्वीट बनवलं जातं. माझी तर ही एक खूप फेव्हरेट डिश आहे. लेबनॉनहून खूप मोठय़ा प्रमाणात ‘बकलावा’ जगभरात एक्सपोर्ट होतो.

फलाफल
साहित्य : पिता ब्रेड – २ (एकाचे दोन भाग करून), लाबने (घट्ट दही – १ वाटी, ठेचलेला लसूण – २ पाकळ्या, काळी मिरीपूड – १ चिमूट, मीठ एकत्र करून घेतलेले मिश्रण), हम्मस, लांबट चिरलेले टोमॅटो, काकडी – प्रत्येकी १, लांबट चिरलेला कांदा – १ (मध्यम), सॅलड पान – २ ते ३,

फलाफल टिक्की : (उकडून घेतलेले चणे (ठेचून घेतलेले) – १ वाटी, कांदा चिरलेला – अर्धी वाटी,  जिरा पूड – अर्धा टीस्पून,  धणे पूड – १ टीस्पून, मीठ – अर्धा टीस्पून, काळी मिरी पूड – २ चिमूट, तिखट – अर्धा टीस्पून, तेल -२ चमचे मरेहल म्हणून, कोथिंबीर –  अर्धी वाटी, बारीक चिरलेल लसूण – ३ पाकळ्या, पार्सले – २ चमचे (असल्यास), मदा – २ चमचे, सगळं एकत्र करून टिक्क्या करून तळून घ्यायच्या. रेड लेबनीज सॉस – (काश्मिरी लाल मिरची – अर्धी वाटी उकडून, लसूण पाकळ्या – २ ते ३, जिरे – अर्धा टीस्पून,  मीठ, सर्व साहित्य मिक्सरमधून वाटून घेऊन त्यात – अर्धा टीस्पून िलबाचा रस घालायचा.)

कृती : पिता पॅकेटमध्ये सॅलड पान, काकडी, टोमॅटो, कांदा, लांबने, हम्मस, फलाफल टिक्की टाका. थोडा रेड लेबनीज सॉस लावा व सव्‍‌र्ह करा.

हम्मस
साहित्य: उकडून घेतलेले काबुली चणे – दीड वाटी, लिंबाचा रस – १ चमचा, लसूण पाकळ्या – ४, ऑलिव्ह ऑइल – २ टेबलस्पून, मीठ – अर्धा टीस्पून, ताहिना पेस्ट – १ टीस्पून (ही तिळापासून तयार केलेली पेस्ट असते. सुपर मार्केटमध्ये उपलब्ध असते. ही नसल्यास १ चमचा पांढरे तीळ वापरा), काळी मिरीपूड – २ चिमूट.
कृती :  मिक्सरच्या भांडय़ात सगळं साहित्य टाका व पेस्ट बनवून घ्या. आता या हम्मसबरोबर पिता ब्रेडचे तुकडे सव्‍‌र्ह करा. हम्मसवर सजावटीसाठी उकडलेले काबुली चणे, ऑलिव्ह ऑइल व पॅपरिका टाकून सव्‍‌र्ह करा.
पिता ब्रेडसाठी साहित्य : मदा – २ वाटी, ऑइल – १ टीस्पून, मीठ – अर्धा टीस्पून, साखर – दीड टीस्पून, ड्राय यीस्ट – १ टीस्पून, कोमट पाणी आवश्यकतेनुसार.

कृती :
मद्याच्या मध्यभागात जागा करून मीठ, साखर व यीस्ट टाका. मग थोडं कोमट पाणी टाका. १० मिनिटे ठेवा. म्हणजे यीस्ट अ‍ॅक्टिव्हेट होईल. मग ऑइल टाका. सगळं एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी टाकून कणीक मळून घ्या. कणकेचे छोटे गोळे करा. १० मिनिटांनी लांबट लाटून घ्या. १८० डिगरीवर १० ते १५ मिनिटे बेक करून घ्या.

आजची सजावट : कांद्याचे फूल
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..

साहित्य : मध्यम साइझचा कांदा, टूथपिक, थंड पाणी

कृती :

१.    
प्रथम कांदा सोलून घ्यावा.
२.
मग कांद्याचे दोन तुकडे करावे. ज्या बाजूला मूळ असेल त्या अध्र्या कांद्यावर इंग्रजी व्ही आकाराचे कट द्यावे.
३.
आता सगळीकडे हे व्ही शेप कट दिल्यावर हा अर्धा भाग थंड पाण्यात टाका. १० मिनिटांनंतर काढून हाताने पाकळ्या मोकळ्या करून घ्या.
४.
आता आपलं हे फुल टूथपिकला लावून त्याची सजावट करा.