‘एलजीबीटी’ समुदायातील लोकांबद्दल, त्यांच्या हक्कांबद्दल बरंच काही बोललं गेलं. आपलाच एखादा मित्र किंवा मत्रीण ही ‘गे’ किंवा ‘लेस्बियन’ आहे हे समजल्यावर हीच तरुणाई कशा प्रकारे व्यक्त होते. हे पाहण्यासाठी आम्ही काही मुलांना त्यांचे स्वत:चे अनुभव विचारले.
काव्या शिर्पे म्हणाली, ‘गेल्या दहा वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. एकाच सोसायटीमध्ये राहतो. पहिल्यापासून आम्हा मुलीच्या ग्रुपमध्ये तो एकटाच मुलगा असायचा. पण आम्हाला त्याबद्दल काही गर वाटले नाही. पण काही वर्षांपूर्वी जेव्हा त्याने तो ‘गे’ असल्याचं सांगितलं तेव्हा आम्हांला धक्का नक्कीच बसला, पण नंतर आम्ही सगळय़ांनी ही गोष्ट मान्य केली, कारण त्याने ‘गे’ असणं किंवा नसणे हे त्याला माणूस म्हणून बदलणार नव्हतं. आम्ही सगळे मित्रमत्रिणी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि तोही आता आपल्या लैंगिकत्वाबद्दल लाज वगरे अजिबात बाळगत नाही. मी माझ्या मित्राला आम्हा सगळय़ांपासून वेगळं वगरे अजिबात समजत नाही आणि चांगला मित्र म्हणून घेण्यासारखे सगळे गुण त्याच्याकडे आहेत. तो ‘गे’ आहे या वास्तवामुळे आमच्या मत्रीमध्ये काहीएक फरक पडला नाहीये.
इच्छिता भागवत आपल्या मित्राबद्दल सांगताना म्हणाली, ‘एका आंतर महाविद्यालयीन स्पर्धेच्या निमित्ताने आमची ओळख झाली. तो ट्रांसजेंडर आहे याची त्याला अजिबात खंत वाटत नव्हती. मुळात तो उत्कृष्ट नृत्य करतो याचं कौतुक आहे आणि तो माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे.’ अनन्या सिंग सांगते, ‘माझा एक दादा अमेरिकेहून एका फॅमिली गेट टुगेदरसाठी आला, तेव्हा त्याला सगळे लग्नाच्या विषयावरून सतावू लागले. सुरुवातीला त्याने, मला लग्न नाही करायचं म्हणून वेळ मारून नेली. नंतर आम्हाला कळलं की तो ‘गे’ आहे. हे कळल्यानंतर धक्का नक्कीच बसला, पण नंतर मात्र आम्ही सगळय़ा भावंडांनी मिळून त्याच्याशी बोलायचं ठरवलं. आम्हा सगळय़ा भावंडांचा त्याला पािठबा आहे. त्याच्या आई-बाबांच्या ही गोष्ट पचनी पडणं अवघड आहे, पण आम्ही त्याच्या पाठीशी ठाम उभे आहोत.
रोहन झुनझुनवाला त्याची आठवण सांगतो, ‘शाळेत आम्ही खूप चांगले मित्र होतो. एकदा त्याने आम्हा सर्व जवळच्या मित्रांना सांगितलं की तो आम्हा बाकीच्यांसारखा नाहीये. तो ‘गे’ असल्याचं त्याने आम्हाला सांगितलं तेव्हा धक्का तर बसलाच आणि या विषयाबद्दल जास्त काही माहीत नसल्यामुळे पुढे करायचं काय हेही कळत नव्हतं. पण मग जसजसं या विषयाबद्दल कळत गेलं आणि हे ‘गे’ असणं किंवा नसणं ही चॉइस नसून ही एक नसíगक बाब आहे, हे कळल्यावर मग मनातल्या शंका कमी होऊ लागल्या. आता आम्ही अगदी पूर्वी सारखेच वागतो. मी उलट बाकीच्या लोकांनाही सांगेन की तुमचे मित्र-मत्रीण कोणीही एलजीबीटी समुदायातील असतील तर त्यात घाबरण्याचे कारण नाही. तीही आपल्यासारखी हाडामासाची माणसं आहेत. कोणाच्या तरी लैंगिककत्वावरून कोणाला तरी ‘बाकीच्यांपासून वेगळं ठरवणं ही बाब चुकीची आहे. धक्का बसण्याची काही एक गरज नाहीये.

शांभवी मोरे
( संकलन साहाय्य : सम्जुक्ता मोकाशी )
– viva.loksatta@gmail.com