मी कळ मध्ये फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनसह BE कम्प्लिट केलं आहे. पण मला कळ मध्ये जॉब करता येणं शक्य नाही. कारण मला त्यात फार इंटरेस्ट नाही आणि मी प्रोग्रॅमिंगमधे बऱ्यापैकी वीक आहे. शिवाय स्ट्रेसखाली मला काम करता येत नाही. सध्या मी मार्केटिंगचा जॉब करतेय आणि त्यात खूश आहे. मला खरंतर आर्टिकल्स लिहिणे, कविता करणे, सोशल वर्क अशा गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. माझ्या सीनियर्सच्या मते यात माझा परफॉर्मन्सही चांगला असतो. मी काय करू याविषयी मला मार्गदर्शन करा. मी खूप गोंधळून गेलेय. – प्रियांका

– वॉव प्रियांका! मला खूप हेवा वाटतो तुझा. तुझा राइट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, दोन्हीही इक्वली डेव्हलप झालेले दिसतायत. कळ मध्ये डिस्टिंक्शन आणि त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या आर्ट्ससुद्धा!
तुझ्या सध्याच्या जॉबमध्ये तू हॅपी आहेस तरीही तुला या निर्णयाविषयी शंका वाटतेय. म्हणूनच तू ‘व्हिवा’ला अ‍ॅप्रोच झालीस, नाही का? का येत असतील या शंका मनात? याची काही कारणं स्वत:मध्ये, तर काही लोकांच्या कमेंट्समध्ये दडलेली असतात. फॅमिली मेंबर्स, नातेवाईक आणि भेटणारे सगळेच जेव्हा विचारतात की ‘अरे, तू तर कळ इंजिनीयरिंग केलंस ना? मग आता हे काय?’, जॉब इंटरव्ह्य़ूमध्येही जेव्हा असंच काहीसं एक्स्प्लेन करावं लागतं, तेव्हा हळूहळू शंका यायला लागते, ‘अरे, आपण केलं ते बरोबर केलं ना? काही चुकतंय की काय आपलं? आपण इंजिनीयरिंगची एक सीट वाया घालवली की काय?’
लिओनार्दो दा विंची हा एक ग्रेट आर्टिस्ट आणि एक फार मोठय़ा कॅलिबरचा सायंटिस्ट. मोनालिसाच्या चित्रामुळे जगभर फेमस असलेला आणि ‘दा विंची कोड’ या पुस्तक/ सिनेमामुळे नव्यानं माहीत झालेला. त्याची चित्रं जसे लोक अनेक सेंच्युरीज झाल्या तरी विसरत नाहीयेत तसंच त्यानं लावलेले अनेक सायंटिफिक शोध आजही आश्चर्यकारक वाटतात. त्यानं ठरवलं असतं की मी आर्टिस्ट आहे ना, मग मी फक्त चित्रंच काढणार, तर आपण बऱ्याच शोधांना आज मुकलो असतो. तू कळ इंजिनीयर झालीयेस म्हणून तू फक्त तेवढंच करावंस असा कुठे नियम नाही. शिकण्यासाठी घालवलेला तो वेळ वाया गेलाय असंही नाही. तुला लागलेल्या इंजिनीयरच्या शिस्तीचा, थिंकिंगचा उपयोग तुला नक्कीच होत राहणार कुठे ना कुठे. आजच्या हाऊसवाईव्जचंही असंच होतं. बहुतेक सगळ्या शिकलेल्या असतात, पण सगळ्याच या शिक्षणाचा उपयोग नोकरी-व्यवसायासाठी करू शकत नाहीत. निरनिराळ्या कम्पल्शन्समुळे त्यांना घरी राहायला लागतं. पण न शिकलेल्या स्त्रियांपेक्षा त्या याचा यशस्वीपणे घर चालवण्यासाठी जाणीवपूर्वक वापर करतात असं सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे.
बारावीनंतर अ‍ॅडमिशन घेताना आपण काहीसे प्रवाहाबरोबर वाहत गेलेलो असतो. तेव्हा आपल्याला नक्की काय आवडतं याचा प्रोफेशनच्या दृष्टीनं विचारच केलेला नसतो. आता मात्र तुला काय जमतं/ आवडतं आणि काय जमत/ आवडत नाही याविषयी तू अवेअर आहेस. आजच्या जमान्यात प्रोफेशन कॅन बी चेंज्ड एनी टाइम. आजचे इंजिनीयर्स अ‍ॅक्टिंग करतात, आर्टिस्ट्स बिझनेसमन होतात, वकील पॉलिटिक्समध्ये शिरतात आणि डॉक्टर्स टॅक्स-सेव्हिंग्जचे धडे देतात. तुझ्या शिक्षणाचा काही उपयोग होणार नाही की काय अशी भीती बाळगू नकोस, कारण शिकलेलं कधी वाया जात नाही. मे बी, तुझ्या कळ मधल्या स्किल्सचा उपयोग तुला तुझ्या सोशल वर्कमध्ये, लिखाणामध्ये तसंच तुझ्यामधली इतर टॅलेंट्स डेव्हलप करण्यासाठी करता येईल.
सो, तुला ज्या जॉबमध्ये मजा येतेय तो नक्की मनापासून कर. तुझी प्रत्येक आवड प्रोफेशनमध्ये कन्व्हर्ट झाली पाहिजे असा अट्टहास न धरता त्या हॉबी म्हणून, रिलॅक्सेशनसाठी चालू ठेव, तुझा लेख प्रसिद्ध झाला की नक्की आम्हाला कळव!
If you will set the example, you won’t need to set many rules!

विचारा तर खरं…
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.