shabda-logoएखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

आजच्या शब्दाचा उच्चार वाचताच क्षणी लॉन्ड्री या शब्दाविषयी काही अधिक माहिती मिळावी असा कयास कुणीही बांधणं स्वाभाविक आहे. मात्र हा शब्द एक चकवा आहे. तळेगाव दाभाडे असं नाव असलेल्या गावाचा वडगाव बुद्रुक असा उच्चार केल्यावर जितका गोंधळ उडावा तसाच गोंधळ उडण्याची शक्यता आहे. लॉन्जरी हा उच्चार आहे त्या शब्दाचा, ज्याचा आपण सरसकट लिंगरी असा उच्चार करतो. इथे आपण असं म्हणताना दोन मिनिटं बिचकायला होईल. कारण हा शब्द पूर्णत: स्त्री विश्वाशी जोडला गेला आहे. Lingerie असे स्पेलिंग स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांच्या दुकानाबाहेर अनेकदा नजरेला पडते आणि त्याचा लिंगरी असाच उच्चार केला जातो. तोदेखील मनातल्या मनात. कारण आजही आपल्यासाठी हा प्रांत अवघडलेपणाच्या कॅटेगरीत येतो.

Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

मुळात स्त्रीच्या अंतर्वस्त्रांचा विचार फॅशनचा भाग म्हणून गेल्या काही दशकांपूर्वीच होऊ लागला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे स्त्री देहाच्या शरीरयष्टीविषयी, फिगरविषयी निर्माण होऊ लागलेली जागरूकता. त्या अनुषंगाने तशा प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिराती वर्तमानपत्रात झळकू लागल्या आणि हा शब्द आपल्याला परिचित झाला. पूर्वी केवळ स्त्रियांसाठी असलेल्या या खरेदीचा भाग असा उघड झाल्यावर या शब्दाचा उच्चारही अपरिचित राहिलेला नाही. त्यामुळे या शब्दाचा बहुतांश वेळा चुकीचाच होणारा उच्चार दुरुस्त करून समोर आणावासा वाटला.

१९ व्या शतकापासून मूळ फ्रेंच शब्द linge पासून या शब्दाची निर्मिती झालेली दिसते. पाश्चात्त्य देशात स्त्रियांसाठी विशिष्ट प्रकारच्या अंतर्वस्त्रांचा वापर ही त्या काळातील क्रांतिकारक गोष्ट होती. स्त्रियांनी कोणते कपडे वापरावेत वा वापरू नयेत याचे दंडक खूपच पक्के होते. अशा काळात काही फॅशन डिझायनर्सनी परंपरेचा भाग बाजूला ठेवून प्रमाणबद्ध फिगरचा विचार करत अंतर्वस्त्रं निर्माण केलीत. त्याचा प्रचार, प्रसार झाला आणि त्यातूनच हा शब्द रोजच्या वापरात आला.

आजच्या स्त्रीचा विचार करता ती खूपच सजगपणे लॉन्जरीचा विचार करते. तरीही या शब्दाचा वारंवार उच्चार व्हावा अशी परिस्थिती आजही नाही. हळू आवाजात, दबकत का होईना केला जाणारा हा उच्चार परफेक्ट असावा असं मात्र अवश्य वाटतं. Lingerie मधल्या li चा ला किंवा लॉ का व्हावा हे मात्र काही केल्या कळत नाही. तो लिंगरी नाही हे मात्र निश्चित. काही ठिकाणी लान्जरी तर काही वेळा लॉन्जरी असाच उच्चार होताना दिसतो.

कॉर्पोरेट विश्वात रमणारी असो वा गृहिणी असो, आजची स्त्री विश्वासाने दुकानात वा मॉलमध्ये खरेदी करताना दिसते.आपल्या वाचकांच्या पत्रातील शब्दांच्या उच्चाराविषयीच्या शंकेवरून प्रेरित आजचा हा शब्दप्रपंच खासकरून त्या समस्त स्त्रीवर्गासाठी.

रश्मी वारंग