04 December 2020

News Flash

सर्जनाच्या नव्या वाटा

अध्र्या तासाच्या स्टँडअपची जागा सध्या मिनिटभराच्या इन्स्टाग्राम रील्सने घेतली आहे.

विपाली पदे

गरज ही बदलाची जननी असते आणि कुठल्याही बदलासाठी माध्यम ही फार महत्त्वाची गोष्ट ठरते. टेक्नॉलॉजी दर वेळी नवनवीन माध्यमं उपलब्ध करून देते. लॉकडाऊनच्या काळात तर माध्यमांच्या नवनव्या प्रयोगांमुळे तरुणाईला सर्जनाच्या नव्या वाटा गवसल्या आहेत. अभिवाचन आणि अभिनयाचे ऑनलाइन सादरीकरण असो, एका क्लिकवर घरबसल्या उपलब्ध होणारी पुस्तकं  असोत वा भाषा, विषय, साहित्याच्या जोडीने तरुण पिढीने के लेले अनेक ऑनलाइन प्रयोग असोत.. माध्यमांच्या मदतीने हे सर्जनशील प्रयोग दिवसेंदिवस रंगू लागले आहेत.

युटय़ूब, इन्स्टाग्राम, फेसबुक या माध्यमांचा वापर आता पहिल्यापेक्षा अधिक वेगवेगळ्या पद्धतीने होऊ लागला आहे. आधी या तिन्ही माध्यमांवर अध्र्या तासाचे व्हिडिओ टाकणे शक्य होते. आता मात्र वेळेची मर्यादा कमी होत पाच मिनिटांपासून ते अवघ्या काही सेकं दांच्या व्हिडिओपर्यंत येऊन ठेपली आहे. त्यामुळे अगदी कमी वेळात आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी तरुणाईचा कस लागतो आहे. अध्र्या तासाच्या स्टँडअपची जागा सध्या मिनिटभराच्या इन्स्टाग्राम रील्सने घेतली आहे. इतक्या कमी वेळात काही चांगलं सांगायची संधी ब्लॉगर्सनीही सोडली नाही. अनेक सर्जनशील कलाकार आणि त्यांचे चॅनेल्स, ब्लॉग्ज या माध्यमांच्या मदतीने नावारूपाला आले आहेत.

सुशांत घाडगे हे नाव ‘भाडिपा’च्या मंचावर अनेकांनी ऐकलं असेल. त्याची सुरुवात तिथे झाली खरी, पण तो स्वत:ला नव्या माध्यमांचा वापर करत तरुणाईसमोर आला. सुशांतसमोर युटय़ूब, फेसबुक अशी अनेक माध्यमं होती जी त्याने लॉकडाउनच्या काळात वापरायला सुरुवात केली. त्या वेळेस घडणाऱ्या बिअर्ड चॅलेंज, डॅल्गोना कॉफी चॅलेंजसारख्या घटनांवर त्याने मिनिटामिनिटांचे विनोदी व्हिडिओ बनवायला सुरुवात के ली. इन्स्टाग्रामवर त्याला लोकांचा जास्त प्रतिसाद मिळाला. तरुणाईची हे व्हिडिओ बघण्याची क्षमता साधारण एका मिनिटाची असते हे ओळखून त्याने पुढे पंधरा सेकंदांचे छोटे रील्स तयार केले. ज्याला एका दिवसात काही हजारो व्हयूज मिळू लागले. या माध्यमातून आत्तापर्यंत विनोदी अंगाने विषय मांडणाऱ्या सुशांतला गंभीर विषयांवरचेही असेच पंधरा सेकं दाचे व्हिडिओ बनवायचे आहेत. यासाठी तो नेटाने काम करतो आहे.

लोकांची आवड, आजूबाजूच्या घडामोडी आणि बदलत्या टेक्नॉलॉजीशी सांगड घालत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम त्याच्यातील कलाकार करतो आहे.

यूटय़ूबवर जीवन कदमनेही आपल्या भटकं तीच्या कथांना या नवनव्या माध्यमांतून लोकांसमोर आणलं. व्हिडिओ बनवण्यासाठी पहिल्यांदा के वळ यूटय़ूबचाच विचार होत असे, आता यूटय़ूब चॅनेल्सचाही वेगवेगळ्या पद्धतीने तरुणाई वापर करते आहे. जीवननेही या माध्यमातून खास लॉकडाउनच्या काळात केलेली भटकंती  प्रेक्षकांना कशी दाखवता येईल याचा विचार केला आणि तो प्रत्यक्ष लोकांसमोर यूटय़ूबवर आणलाही. सुरुवातीला स्वत:च्या घरी असलेल्या सेटअपमधून ‘गोष्टी भटक्यांच्या’ या सीरिजच्या माध्यमातून त्याने जुने भटकंतीचे किस्से सांगितले. त्यानंतर गावाकडे गेल्यावर त्याचे गांव कसे आहे, तिथले राहणीमान कसे आहे इतकंच नाही तर लॉकडाउनमध्ये त्या भागात झालेले बदलही त्याने प्रेक्षकांना दाखवले. प्रत्येक व्हिडिओमधून कथाकथन आणि चित्रीकरण यांची योग्य ती सांगड घालत के लेला हा प्रकार लोकांनाही आवडला.

‘ऑफ बीट भटकंती’ या संकल्पनेतून त्यांनी मुळशी, गडगुफा, कमळगड, कल्याणगड अशी लोकांच्या फारशा परिचयाची नसलेली ठिकाणे लॉकडाऊन नंतरच्या काळात दाखवायला सुरुवात के ली. इतकंच नाही तर  त्यांनी ‘डीजेडी’ असा एक स्वत:चा हशटॅग सुरू केला ज्याला लोकांनी मनापासून प्रतिसाद दिला. हा लोकांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद बघून येत्या काळात आणखी काही प्रयोग या नव्या माध्यमांच्या मदतीने करायचे त्याने ठरवले आहे. जीवन आणि सुशांतप्रमाणेच अनेक तरुणांनी पारंपरिक नृत्य, मिम्स याशिवाय बास्के टबॉल-क्रिके टसारख्या खेळांविषयी काही सांगू पाहणारे इन्स्टा रील्स लोकप्रिय के ले आहेत. तर मुलींमध्येही मेकअपपासून कु किं गपर्यंत सगळं काही सांगणारे व्हिडिओज यूटय़ूब, फे सबुक, इन्स्टा रील्ससारख्या माध्यमांतून लोकप्रिय के ले आहेत. तरुणाईसाठी कल्पकतेला आता काही मर्यादा राहिलेली नाही. तंत्रज्ञान आणि माध्यमांच्या नव्या आविष्कारामुळे तरुणाईच्या सर्जनाला नवनव्या वाटा फु टल्या आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:04 am

Web Title: marathi stand up comedian sushant ghadge zws 70
Next Stories
1 सदा सर्वदा स्टार्टअप : तयार संकल्पनांची किमया!
2 रास ना रंग
3 वस्त्रांकित : लेवु लेणं चंद्रकळेचं!
Just Now!
X