प्रसिद्ध शेफ आणि आघाडीच्या चॉकलेटियरने केलेले हे चॉकलेटी रसग्रहण. आजच्या लेखात मिल्क चॉकलेट या लोकप्रिय प्रकारामधल्या वैविध्याविषयी..

असंख्य चवी चाखण्याचं जिभेला दिलेलं वरदान आहे म्हणून तर जीवन किती आनंदमयी होऊन गेलं आहे. हा आनंद पुढे अमीट आठवणीच्या पायावर पुढे महिनोन् महिने टिकून राहतो. मिल्क चॉकलेटची लहानपणी चाखलेली चव अजूनही माझ्या जिभेवर थुईथुई नृत्य करते आहे. तेच मिल्क चॉकलेट पुढे कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या स्वादात माझ्या जिभेवर आलं. याच चवीच्या प्रेमात पडून माझं अख्खं करिअर घडलं. मिल्क चॉकलेटमधल्या कारागिरीवर अर्थात आर्टिसनल पॅन्ड् चॉकलेटवर याच स्तंभातून मी काही महिन्यांपूर्वीच लिहिलं होतं. तुम्हाला कदाचित ते  आठवत असेल. भारतातील चॉकलेट कॅन्डीविषयीचा तो विषय होता.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ
Prithviraj Sukumaran on mother Mallika life
“तिचं पहिलं लग्न अपयशी ठरलं अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्याचं आईच्या घटस्फोटाबद्दल विधान; म्हणाला, “तिची बाजू…”

तर या मिल्क चॉकलेटशी माझे सख्य फार जुने आहे. म्हणजे ते जुळवले जाण्यामागे माझ्या आजीचा हात आहे. छोटय़ा ‘प्रिन्स’ला (अर्थातच मला) मिल्क चॉकलेटची बक्षिसी दिली जायची. म्हणजे मी वर्गात दिलेला अभ्यास घरी नीट केला वा चांगली ग्रेड मिळवली की जाहीर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडायचा. ‘किस्मी बार’ असायचा तो. वेलची  आणि मिल्क चॉकलेटचा अप्रतिम मिलाफ या टॉफी बारमध्ये होता. आजीने बरणीत दडवून ठेवलेले चॉकलेट्स काही वेळाने ती माझ्याकडे सूपूर्द करणार हे नक्की असायचं. म्हणूनच मी जीव तोडून अभ्यास पूर्ण करायचो. किस्मीच्या जोडीला मग अमूल मिल्क चॉकलेटचा उल्लेख करावा लागेल. ९० च्या दशकात भारतीयांच्या जिभांवर अधिराज्य गाजवणारा पहिला ब्रँड अमूलच होता. त्यानंतरही काळाच्या कसोटीवर दर्जाशी कोणतीही तडजोड न करता अमूलने सातत्याने मिल्क चॉकलेटच्या रूपांत नावीन्यपूर्ण बदल केले. पुढे जाऊन त्यांनी ट्रॉपिकल ऑरेंज मिल्क चॉकलेट, फळे आणि नट्सचा त्यांच्या चॉकलेट बारमध्ये वापर केला. आणि आता तर त्यांचा डार्क चॉकलेट बारच्या निर्मितीतही अमूलचा आपला वेगळा असा ठसा आहे. अर्थात माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. एक अस्सल देसी ब्रॅण्ड अशा प्रकारे चॉकलेटच्या जगातल्या दिग्गजांशी स्पर्धा करत आहे.

बालपण, पौगंडावस्था, तारुण्य आणि प्रौढावस्था ही मानवी जीवनाची चढण आहे, तशीच चॉकलेटच्या बाबतीतही म्हणता येईल. भारतातील मिल्क चॉकलेट बारची निर्मिती ही पुढे टप्प्याटप्प्याने परिपक्व होत गेलेली आहे. आता एक चॉकलेट क्रिटिक म्हणून मी डार्क चॉकलेटच्या प्रेमात जास्त असलो तरीही अमूल मिल्क चॉकलेट आणि कॅडबरी डेअरी मिल्कचा मी निस्सीम भक्त आहेच. काळ, अनुभव आणि कोकोच्या प्रांतातल्या माझ्या आजवरच्या कार्याला स्मरून मी इतकंच सांगू इच्छितो की, माझा प्रवास डार्क चॉकलेटसोबत झाला असला तरी मिल्क चॉकलेटने हृदयात खास अशी जागा निर्माण केली. याला कारण म्हणजे मिल्क चॉकलेटमधलं अष्टपैलुत्व. तुम्हाला कुणाला सामावून घेता येत नसेल तर तुम्ही त्याच्यात सामावून जा, असंच काहीसं मिल्क चॉकलेटबाबत म्हणावं लागेल. वेफर्स, नट्स, फ्रुट वा अनेक नानाविध स्वादाच्या रूपात याची घडण झाली आहे.

अगदी हेच वैशिष्टय़ ‘कॅडबरी डेअरी मिल्क’जपत आलंय. विविध फळांचे अर्क, नट्स्, सिल्क, कॅ्रकल, बॉर्नविली आणि इतर खूप काही. कॅडबरीचा डंका असा दिगंतात गाजत असताना भारतातील चॉकलेट निर्मितीच्या क्षितिजावर ‘नेस्ले’ नावाचा ब्रँड उगवत होता. ‘नेस्ले’ची खासियत मिल्क चॉकलेटमध्येच होती. मग हळूहळू त्यांनीही निर्मितीतील वैविध्य ठेवत चॉकलेटमधला खजिनाच ग्राहकांसमोर रिता केला. म्हणजे ‘किटकॅट’, ‘आल्पिनो’ आणि ‘मंच’ असा प्रवास उल्लेखनीयच. भारतीय ग्राहकांच्या चॉकलेटच्या चवीला मग आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी जणू आव्हानच देण्यास सुरुवात केली. यात सर्वात जास्त वाटा मिल्क चॉकलेट्सचा होता.

‘मार्स ग्रुप’च्या कुकी क्रम्बल, फ्रुट आणि पुन्हा नट्स. ‘मॉन्देलेझ इंटरनॅशनल’चे टॉब्लेरोनची निर्मिती आमंड, न्योगट आणि मधाच्या संगमातून झालेली. त्रिकोणी आणि कुरकुरीत टॉफीची गंमत असलेले टॉब्लेरोन म्हणूनच फेमस झालं. ‘घिरारडेली’चं ‘टॉफी क्रंच स्क्वेअर’ हे कमालीचं यशस्वी ठरलेलं मिल्क चॉकलेट आहे. ज्याच्यातही कुरकुरीत टॉफीचा समावेश केलेला असतो. भरपूर क्रीमने भरलेलं ‘लिण्डट्’चं मिल्क चॉकलेट. म्हणजे हे अगदी सरळसाधं चॉकलेट. पण क्लासी! म्हणजे अशा अर्थाने की याची चव घेताना मिल्क चॉकलेटचा अस्सलपणा जाणवतो. व्हाइट चॉकलेटची खरी चव चाखायची असेल तर लिण्ड क्लासिकला पर्याय नाही, हे मी नेहमी सांगतो.

आता परदेशात घडलेला एक अस्सल ‘देशी’ किस्सा सांगतो. व्हिएतनाममध्ये भरलेल्या जागतिक कोको परिषदेत (कोको रिव्वोल्यूशन कॉन्फरन्स) मी भारताचे प्रतिनिधित्व करीत होतो. मी एकटाच भारतीय या परिषदेला उपस्थित होतो. सध्या भारतात चॉकलेटच्या जगात काय सुरू आहे, हे विचारल्यावर मी सांगितलं की ‘फेरेरो रॉशर’ आमच्याकडे फॉर्मात आहे. फेरेरो रॉशर खरं त्र मिल्क चॉकलेटच. पण आतमध्ये हेजलनट  असलेलं. भारतासाठी ही चव नवीन. तरीही भारतात या चॉकलेटचा मोठा गाजावाजा असल्याचं मी उपस्थितांना सांगितलं. कारण विचारल्यावर मी चक्क आपल्या मोतीचूराशी याच तुलना केली. ‘फेरेरो रॉशर’चे मिल्क चॉकलेट चक्क आपल्या मोतीचूर लाडूसारखं गोल असतं. वर सोनेरी वर्खात गुंडाळलेलं. हे सोनेरी लाडू गिफ्ट द्यायच्या दृष्टीने एकदम परफेक्ट. त्याच्या मोतिचूर लाडूशी असलेल्या साधम्र्यामुळे कदाचित त्याची भुरळ नव्या पिढीला आणि जुन्याजाणत्यांवरही पडली असावी. थोडक्यात काय, तर चॉकलेटच्या दुनियेत आंतरराष्ट्रीय मार्केटचा विचार करता कुणाला काय भावेल हे सांगता येत नाही. कुणाला चव, कुणाला सोनेरी पॅकेजिंग तर कुणाला आणखी काही. कुछ भी पॉसिबल है यहाँ! (अनुवाद : गोविंद डेगवेकर)  ल्ल

वरुण इनामदार

अनुवाद-वरुण गोविंद डेगवेकर