News Flash

खावे त्यांच्या देशा : मंगोलिन ब्लूज (मंगोलिया ३)

शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल.

| February 28, 2014 01:06 am

शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. या सफरीत सध्या आपण मंगोलियात हॉल्ट घेतलाय.
तुम्हाला माहिती आहे का, ‘मंगोलियन बाब्रेक्यू’ हा प्रकार इंटरनॅशनली मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये आजकाल खूप पॉप्युलर होत चालला आहे (खुद्द मंगोलियातली हॉटेल्स सोडून). असा कुठला प्रकार खरं तर मंगोलियामध्ये बनवला जात नाही, पण याची सुरुवात अमेरिकेच्या कुठल्याशा रेस्टॉरंटमधून झाली. एक खूप मोठय़ा गोलाकार तव्यावर हा प्रकार बनवतात. गेस्टच्या आवडीप्रमाणे भाज्या, चिकन, मटण, मासे आणि सॉसेस एकत्र करून या तव्यावर शिजवले जातात. एकाच वेळी पंधरा ते वीस ऑर्डर्स या तव्यावर बनवता येतात, एवढा मोठा हा तवा असतो.
आता बघा, आपलं इंडियन चायनीज आणि चायनामध्ये मिळणारं चायनीज यात खूप फरक आहे. तसाच काहीसा प्रकार मला या मंगोलियन बाब्रेक्यूबद्दल वाटतो.
मंगोलियाबद्दल आणखी थोडी इंटरेस्टिंग माहिती सांगतो.. मंगोलियातून दिसणारं आभाळाचं निळेशार क्षितिज, यावरूनच मंगोलियाला फार पूर्वीपासून ‘निळेशार मंगोलिया’ असं संबोधलं जातं. मला इथल्या खाद्य संस्कृती आणि जीवनपद्धतीचं नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. मंगोलियामध्ये एक म्हण आहे. त्याचा अर्थ असा, ‘नाष्टा स्वत:साठी ठेवा, दुपारच्या जेवणाला मित्राला बोलवा आणि रात्रीचं जेवण शत्रूबरोबर घ्या.’ मला वाटतं, शत्रूबरोबर म्हणजे, सावध सतर्कपणे, मोजकंच असं रात्री जेवण जेवावं असा अर्थ असावा.
मंगोलियामध्ये आजही, वाहतुकीसाठी बऱ्याच ठिकाणी घोडय़ांचा वापर केला जातो. असं म्हणतात की, लहान मुलं बसायला लागताच त्याच्या घोडेस्वारीच शिक्षण सुरू होतं. त्यामुळे मंगोलियाचा राष्ट्रीय खेळ घोडेस्वारी आहे हे आणि त्यांचं राष्ट्रीय पेय ‘ऐरक’ (घोडीच्या दुधाचं पेय) आहे, हे ऐकून नवल वाटणार नाही!
www.devwratjategaonkar.com 

मंगोलियन बार्बेक्यू
साहित्य : आवडीप्रमाणे उकडून घेतलेल्या भाज्या- ब्रोकोली, बेबीकॉर्न, पोकचोही, झुकनी, गाजर, फरसबी, कांदा, कोबी, मशरुम, पातीचा कांदा, आवडीप्रमाणे उकडून चिकन, मटण किंवा सीफूड (१ वाटी वापरू शकता).
इतर साहित्य : कांदा, पातीचा कांदा, उकडून घेतलेला भात / नूडल्स.
सॉस : स्वीट अँड हॉट चिली सॉस, सोया सॉस, तिळाचे तेल, मिरचीचे तेल, िलबाचा रस, लसणाचे तेल, बारीक चिरलेले आले, केचप.
कृती : या रेसिपीची अशी ठरलेली कृती नाही. वर दिलेले साहित्य प्रत्येक बाऊलमध्ये लावून ठेवलेले असते. हॉटेलमध्ये ही डिश करताना पाहुण्यांच्या आवडीप्रमाणे भाज्या, चिकन एका बाऊलमध्ये घेतो. नंतर त्याच्यात आवडीप्रमाणे सॉस, नुडल्स, राईस इत्यादी टाकून एका मोठय़ा तव्यावर शिजवून गेस्टला सव्‍‌र्ह करतो. स्पेशल ऑकेजनला घरीसुद्धा पाहुण्यांसाठी ही रेसिपी करता येईल. मोठा तवा नसेल तर लहान तव्यावर करावी.

तळलेले बटर कुकीज
साहित्य : मदा २०० ग्रॅम, बटर २ टी स्पून, दूध आवश्यकतेनुसार साखर ४ टी स्पून, मीठ चिमूटभर, तेल तळण्यासाठी.
कृती : कोमट पाण्यात साखर आणि मीठ टाकून एकजीव करून घ्या. त्या पाण्यात बटर आणि मदा टाकून पीठ मळून घ्या. त्या पिठाला मुरत ठेवा. पीठ मुरल्यानंतर परत त्या पिठाला मळून घ्या. नंतर त्याचे छोटे गोळे करून त्यांना गोल आकार देऊन लाटून घ्या. नंतर ते गरम तेलात तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या. तयार झालेल्या कुकीजला मधाबरोबर सव्‍‌र्ह करा.आजची सजावट : टोमॅटोचे फूल

साहित्य : टोमॅटो; कृती : टोमॅटोला वरून एक स्लाइस कट करा व त्या स्लाइसखालून टोमॅटोला थोडा जाडसर कट द्या व खालपर्यंत हे जाडसर कापून घ्या. कट केलेला भाग गोल करीत त्याचे फूल करा. तयार आहे टोमॅटोचे फूल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2014 1:06 am

Web Title: mongolian food
Next Stories
1 इंडियन बार्बेक्यूची मैफल!
2 व्हिवा दिवा
3 स्लॅम बुक : श्रेयस तळपदे
Just Now!
X