News Flash

फॅशनेबल नवरात्र

साडी ट्रॅडिशनल कपडे म्हटलं की साडी ही आलीच. साडीमध्ये जसे अनेक प्रकार आहेत तसेच साडी नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

नवरात्र दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी खास असतात. तरुण वर्ग वाट पाहत असतो तो नवरात्रीचे नऊ दिवस खेळायला मिळणाऱ्या गरबा रासची. नऊ  दिवस विविध रंगांची उधळण सगळीकडे असते. याच रंगांची उधळण यंदा इंडोवेस्टर्न फॅशनेबल कपडय़ातून होताना आपल्याला दिसते आहे. तरुणाईचा कल नेहमीच काहीतरी नवीन आणि हटके करण्याकडे असतो आणि यासाठी तरुणाई नवनवीन ट्रेंड्स, फॅशनवरती लक्ष ठेवून असते. आजकालच्या तरुणाईला तेच ते पारंपरिक हेवी कपडे, काही कार्यक्रम सोडला तर त्यानंतर न वापरता येणारे कपडे जास्त पसंतीस उतरत नाहीत. त्याऐवजी हलके, कम्फर्ट देणारे, नंतर कधीही वापरता येतील आणि कमी किंमत असणारे कपडे जास्त आवडतात. म्हणून आजच्या तरुणाईला इंडोवेस्टर्न, वेस्टर्न, फ्यूजन अशा सगळ्या प्रकारची फॅशन आवडते. त्याचेच प्रतिबिंब यंदाच्या नवरात्रीतही पाहायला मिळणार आहे.

साडी ट्रॅडिशनल कपडे म्हटलं की साडी ही आलीच. साडीमध्ये जसे अनेक प्रकार आहेत तसेच साडी नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. आणि यंदा त्या प्रकारात अनेक वेगवेगळे प्रयोग फॅशनडिझाइनरने केलेले बघायला मिळत आहेत. साडी नेसणं म्हणजे खरंतर एक मोठं कापड अंगाभोवती सुंदररीत्या ड्रेप करणं होय. या ड्रेपिंग स्टाइलमध्ये तुम्ही थोडा जरी बदल केला तरी तुम्हाला नवीन लुक सहज मिळू शकतो. फॅशन सायकल पुन्हा फिरून जुन्या काळातील फॅशनकडे वळतेच. फक्त जुनी फॅशननव्याने येताना त्यात नवीन काहीतरी एलिमेंट नक्की पाहायला मिळतो. अशा प्रकारे साडीमध्येही ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील ट्रेंड पुन्हा आला आहे. त्यामुळे फॅशनच्या बाबतीत ऐंशी-नव्व्दचा काळ पुन्हा परतला आहे,असं नक्कीच म्हणू शकतो. त्या काळातील सिल्कच्या साडय़ांना थोडा नवीन टच देऊन अनेक डिझाइनर्सनी त्या पुन्हा बाजारात आणल्या आहेत. सिल्कची साडी म्हटलं की हेवी आणि शायनी कापड, ब्राइट रंग असं रूप डोळ्यासमोर येतं. पण आता आलेल्या फॅशननुसार थोडी कमी शाइन असलेलं सिल्क आणि स्काय ब्लू, पोपटी रंग, पिंक असे ट्रेंडमध्ये असणारे रंग इन फॅशनआहेत. पूर्ण साडीपेक्षा फक्त साडीच्या पदरावर सिल्कची बॉर्डर केलेल्या साडय़ा या फेस्टिव्ह सिझनमध्ये ट्रेंडमध्ये असणार आहेत.

गरारा म्हणजेच शरारा असा अनेकांचा समज आहे. परंतु गरारा आणि शरारा यांच्या फॅशनस्टाइलमध्ये बराच फरक आहे. शरारा म्हणजे लूज, फ्लेअर्ड आणि रुंद असणारा पायजमा. जो जास्तीतजास्त सरळ कट असणाऱ्या कुर्तीखाली घातला जातो. तर गरारा कमरेपासून ते गुडघ्यापर्यंत पॅन्टप्रमाणे घट्ट असतो आणि गुडघ्यापासून खाली फ्लेअर्ड असतो. ९०च्या दशकात अधिराज्य गाजवलेला गरारा आता गेल्या वर्षीपासून हळू हळू पुन्हा एकदा ट्रेण्डमध्ये आला आहे. पारंपरिक गरारामध्ये मधला जॉइंट लपवण्यासाठी गोल्डन किंवा सिल्व्हर लेस वापरली जाते. आता त्याची जागा फॅन्सी लेसने घेतलेली आहे. पारंपरिक गरारासाठी १२ मीटर कापड वापरलं जायचं, आता कमी फ्लेअर्डचाही गरारा बाजारात उपलब्ध आहे. गरारा तुम्ही शॉर्ट कुर्ती, पेपल्म टॉप, फ्रंट कट शॉर्ट कुर्ती सोबत पेअर करू शकता. सध्या जरी, सिक्वेन्स, स्टोन आणि मण्यांचं वर्क केलेले गरारा आता जास्त ट्रेण्डमध्ये आहेत. नवरात्रीमध्ये कम्फर्टेबल गरबा खेळण्यासाठी  गरारा नक्कीच ट्राय करून बघा.

गाऊन्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळे वेस्टर्न लाँग ड्रेस, रेड कार्पेटवरची फॅशनच येते. पण या वर्षी रोजच्या वापरातही वेस्टर्न साधे वनपीस आणि गाऊन ट्रेंडमध्ये आहेत. मग हे गाऊन्स ट्रॅडिशनल स्वरूपात नसतील असं कसं होईल? बाजारात ट्रॅडिशनल गाऊ न्सही इंडियन गाऊ न्स या नावाने उपलब्ध आहेत. आणि हे गाऊ न्स छोटे ते मोठे असे कोणत्याही वयोगटाच्या पसंतीस उतरतील असे आहेत. गाऊ न्समध्ये कॉटन, ब्रोकेड, शाइनी मटेरियल, नेट  या कापडासोबतच सिल्कचे वेगवेगळे प्रकार, खादी, कांजीवरम आणि अगदी वेल्वेटसारखा लुक देणारे कापडही फॅशनकलेक्शनमध्ये आले आहे. या गाऊ न्सवरती केली जाणारी एम्ब्रॉयडरी हे खास आकर्षण असतं. अशा गाऊ न्सवरती आपल्याला काही खास ज्वेलरी घालयचीही गरज भासत नाही. हे इंडियन गाऊन्स वेगवेगळ्या सिल्हाऊट्स आणि रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.

टॉप आणि स्कर्ट फेस्टिव्हल सीझनमध्ये हमखास स्कर्ट घातले जातात. ट्रॅडिशनल स्कर्टवरती वेस्टर्न टॉप किंवा वेस्टर्न स्कर्टवरती ट्रॅडिशनल टॉप असं कॉम्बिनेशन वापरता येऊ शकतं. ट्रॅडिशनल प्रिंट्स किंवा कापडापासून बनवलेला स्कर्ट  आणि त्यावरती केप, शर्ट, ऑफ शर्ट टॉप, कोल्ड स्लीव्ह टॉप घालू शकता. आणि वेस्टर्न प्लेन स्कर्टवरती फ्रंट कट टॉप, ब्लाऊ ज, टी-शर्ट घालू शकता. या दोन्ही लुकवरती नेकपीस, जॅके ट्स, स्टोल, ओढणी सहज वापरू शकता.

ज्वेलरी यंदा नवरात्रीत ज्वेलरीमध्ये नक्की काय ट्रेण्डमध्ये आहे हे ‘ब्युटी गर्ल’  या ज्वेलरी बॅ्रण्डच्या डिझाइनर प्राची पवार यांच्याकडून जाणून घेतलं.  ‘गेल्या दोन-तीन वर्षांपासून ट्रेण्डमध्ये आलेली ऑक्सिडाइज ज्वेलरीच यंदाच्या वर्षीही ट्रेण्डमध्ये आहे. दिसायला हेवी, परंतु वजनाला हलके  कानातले, मोठय़ा आकाराच्या अंगठय़ा, नथ, कंबरपट्टा आणि कडे यांना जास्त ग्राहकांकडून मागणी आहे.  हेवी नेकपीस आणि नाजूक नेकपीस असे दोन्ही प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही ड्रेस घालणार आहात त्याप्रमाणे तुम्ही नेकपीसची निवड करावी,  असं त्या सांगतात. सध्या ट्रेण्डमध्ये असलेले नोज पिनचेही अनेक प्रकार आहेत. त्याबद्दल त्या सांगतात ‘सध्या नोज आणि इअर अ‍ॅक्सेसरीजचे खूप प्रकार बाजारात आले आहेत. काही बोल्ड अ‍ॅक्सेसरीज क्लिपऑन म्हणजे चापाच्या प्रकारात येतात, तर बऱ्याच अ‍ॅक्सेसरीजसाठी नाक किंवा कान टोचलेलं असणं आवश्यक असतं. कानात घालण्यासाठी इअर कफ्स सध्या खूप ट्रेण्डमध्ये आहेत. कोअरी, मोर, कमळ, रंगीत खडे, भौमितिक आकार, डायमंड शेप, देवीचा चेहरा, चंद्रकोर, गणपती अशा वेगवेगळ्या डिझाइन सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत. सोबतच अँक्लेट्सनाही फे स्टिव्हल सीझनमध्ये खूप डिमांड असते. एकाच पायात घातल्या जाणाऱ्या या दागिन्यात खूप वैविध्य बघायला मिळते. बारीक, जाड, नाजूक कुं दन वर्क , पातळ दोऱ्यांमध्ये मणी ओवून बनवलेले अँक्लेट्स किंवा वेगवेगळे डिझाइन असलेले नाजूक अँक्लेट्स इत्यादी प्रकार अँक्लेट्समध्ये आहेत. रस्ट, सिल्व्हर, गोल्ड, कॉपर यांमध्ये अँक्लेट्स उपलब्ध आहेत’, अशी माहितीही त्यांनी दिली.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 12:11 am

Web Title: navratri fashion trends garba abn 97
Next Stories
1 मिशन फिटनेस
2 क्षण एक पुरे! : सोशल दंतवैद्य
3 टेकजागर : किशोरवयीनांचे ‘सोशल’प्रेम
Just Now!
X