रुबाबदार हे वैशिष्टय़ मुख्यत्वे पुरुषांना उद्देशून वापरलं जातं, पण आता मुलींमध्ये पॉवर ड्रेसिंगचं महत्त्व वाढल्यानं रुबाबदार स्टायिलग ही आजच्या काळाची गरज झालीय. कसा साधायचा हा रुबाब?
‘पॉवर ड्रेसिंग’ नाव ऐकूनच याचा प्रभाव लक्षात येतो. हा ड्रेसिंगचा प्रकार कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना गरजेचा वाटू लागलाय. पण नेमकं काय केलं म्हणजे पॉवर ड्रेसिंगचा प्रभाव साधता येईल हे कळत नाही. या ड्रेसिंगबद्दल बाऊ करण्यापेक्षा छोटय़ाशा युक्त्या वापरल्यास पॉवर ड्रेसिंगमधून मिळणारा रुबाब सहज मिळू शकेल.
पॉवर ड्रेसिंगमध्ये कपडय़ांची निवड सर्वात महत्त्वाची असते. शर्ट, ट्राऊझर, स्ट्रेट फिट स्कर्ट किंवा वन पीस ड्रेस यांचा समावेश यात होतो. शक्यतो काळा आणि सफेद रंगाचा वापर अधिक केला जातो. पण याशिवाय इतर रंगांचा वापर करण्यास हरकत नाही. पण तुमचं ड्रेसिंग बोल्ड असायला हवं. िपट्र्सचा वापरसुद्धा करू शकता. पण त्यात प्रमाणबद्धता हवी. भौमितिक िपट्र्स, स्ट्राइप्स वापरणं कधीही उत्तम.

बेल्ट, जॅकेट्स, कफिलग्स यासारख्या छोटय़ा पण महत्त्वाच्या अ‍ॅक्सेसरीज पॉवर ड्रेसिंगमध्ये महत्त्वाच्या असतात. शर्ट ट्राऊझर किंवा स्कर्टमध्ये व्यवस्थित खोचून छानसा बेल्ट लावावा. हातात चांगलं घडय़ाळ (शक्यतो ब्रॅण्डेड) असणं महत्त्वाचं आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

दरवेळी थ्री पीस सूट घालणं शक्य होतंच असं नाही. पण काळा, नेव्ही रंगातील तुम्हाला फिट होईल असं एक जॅकेट वॉडरोबमध्ये असणं गरजेचं आहे. स्कर्ट, ड्रेसवरसुद्धा हे जॅकेट सहज घालता येतं.

तुमच्या हॅण्डबॅगचा आकार जितका छोटा आणि आटोपशीर असेल तितका उत्तम. तुम्हाला गरजेचं असेल तितकंच सामान बॅगेत असू द्या.   अतिसामानाने फुगलेली बॅग अजिबात चांगली दिसत नाही. तुमच्या बॉडीशेपनुसार कपडय़ांची निवड करा. कित्येकदा कमरेचा घेरा जास्त असतानाही स्ट्रेट फिट ड्रेस घालण्याचा हट्ट केला जातो. अशा वेळी दिसणारा पोटाचा घेरा वाईट ड्रेसिंगचं लक्षण आहे. जॅकेट, कोटचा वापर अशा वेळी करता येऊ शकतो.

ज्वेलरी जितकी कमी तितकी उत्तम. पण मोत्याचं, खडय़ांचं कानातलं, एखादं छोटंसं पेंडंट किंवा नाजूक ब्रेसलेट नक्कीच वापरू शकता. नाव किंवा ‘कूल’ असे शब्द, आक्रमक चिन्हं ज्वेलरीमध्ये नसतील याची काळजी घ्या.

फुटवेअर आरामदायी असणं महत्त्वाचं आहे. अति हिल्स आणि चालताना बुटांचा होणारा आवाज टाळला पाहिजे. शक्यतो काळे शूज सगळ्यावर जातात. बेल्ट घातलेला असल्यास त्या रंगाचे शूज घालावेत. प्लॅटफॉर्म हिल्स किंवा प्लम्स पॉवर ड्रेसिंगमध्ये वापरले तरी चालतात. कमी हिल्स हवे असल्यास कीटन हिल्स किंवा बॅलरिनासुद्धा वापरता येतील.

मेक-अप मिनिमल किंवा न्यूट्रल असावा. भडक रंगाचा वापर टाळलेलाच बरा. तुमच्या वर्णाला सूट होतील अशाच शेडचं लिपस्टिक वापरायला हवं. ग्लॉसी किंवा ग्लिटरी मेकअप अजिबात नको.

viva.loksatta@gmail.com