रुबाबदार हे वैशिष्टय़ मुख्यत्वे पुरुषांना उद्देशून वापरलं जातं, पण आता मुलींमध्ये पॉवर ड्रेसिंगचं महत्त्व वाढल्यानं रुबाबदार स्टायिलग ही आजच्या काळाची गरज झालीय. कसा साधायचा हा रुबाब?
‘पॉवर ड्रेसिंग’ नाव ऐकूनच याचा प्रभाव लक्षात येतो. हा ड्रेसिंगचा प्रकार कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना गरजेचा वाटू लागलाय. पण नेमकं काय केलं म्हणजे पॉवर ड्रेसिंगचा प्रभाव साधता येईल हे कळत नाही. या ड्रेसिंगबद्दल बाऊ करण्यापेक्षा छोटय़ाशा युक्त्या वापरल्यास पॉवर ड्रेसिंगमधून मिळणारा रुबाब सहज मिळू शकेल.
पॉवर ड्रेसिंगमध्ये कपडय़ांची निवड सर्वात महत्त्वाची असते. शर्ट, ट्राऊझर, स्ट्रेट फिट स्कर्ट किंवा वन पीस ड्रेस यांचा समावेश यात होतो. शक्यतो काळा आणि सफेद रंगाचा वापर अधिक केला जातो. पण याशिवाय इतर रंगांचा वापर करण्यास हरकत नाही. पण तुमचं ड्रेसिंग बोल्ड असायला हवं. िपट्र्सचा वापरसुद्धा करू शकता. पण त्यात प्रमाणबद्धता हवी. भौमितिक िपट्र्स, स्ट्राइप्स वापरणं कधीही उत्तम.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेल्ट, जॅकेट्स, कफिलग्स यासारख्या छोटय़ा पण महत्त्वाच्या अ‍ॅक्सेसरीज पॉवर ड्रेसिंगमध्ये महत्त्वाच्या असतात. शर्ट ट्राऊझर किंवा स्कर्टमध्ये व्यवस्थित खोचून छानसा बेल्ट लावावा. हातात चांगलं घडय़ाळ (शक्यतो ब्रॅण्डेड) असणं महत्त्वाचं आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New dressing sense
First published on: 21-08-2015 at 01:03 IST