vv19सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
हाय फ्रेण्डस्! व्हॉट्स अप? सध्या आपल्या व्हेरी बिझी लाइफमध्ये सोशल नेटवìकग साइट्सनी कमाल महत्त्वाचं स्थान पटकावलंय. मोबाइल के स्क्रिन को टच करो, जो चाहे सोशल साइट खोलो और लॉग इन कर के शुरू हो जाओ.. खरंच, कित्ती इझिली होतंय हे सगळं.. त्यातही आपल्यासारख्या यंगस्टर्सच्या हाती ही टेक्नॉलॉजी आल्यावर ‘खुल जा सिम सिम’ म्हणायचा अवकाश साऱ्या सोशल साइटस् आपापल्या अलिबाबाची गुहा आपल्यासाठी उघडायला अतिशय तत्पर नि तय्यारीत असतात. त्या खंडीभर सोशल साइट्सवर काय बघावं नि काय वाचावं असं होऊन जातं. प्रत्येकाची आवडनिवड अर्थातच वेगवेगळी असते. तरीही यंगस्टर्सच्या आवडीचा लसावी काढून आम्ही इथं ‘सोशल नेटवìकग ट्रेिण्डग’चा लेखाजोखा तुमच्यापाशी मांडायचं ठरवलंय.  
तुम्हीही तुमच्या आवडीच्या पोस्ट किंवा व्हिडिओज आमच्याशी नक्की इमेलवर शेअर करा. Viva.loksatt@ gmail.com वर ईमेल करताना सब्जेक्ट लाइनमध्ये ‘सोशल न्यूज डायजेस्ट’ असं नक्की लिहा.
रिवाइंड लिंक
यू टय़ूबनं नव्या वर्षांच्या स्वागतासाठी ही यूटय़ूब रिवाइंड लिंक आहे. त्यात गेल्या वर्षभरातल्या लक्षणीय मोमेंटस््, पिपल्स वगैरेंच्या व्हिडिओजचा समावेश करण्यात आलाय. त्यात टॉप ट्रेडिंग व्हिडिओज इंडिया नि ग्लोबल असे ऑप्शन्स आहेत.
https://www.youtube.com/user/theyearinreviewIN?feature=etp—tw—rew—rz3
वेलकम अ हॅप्पीवाला २०१५
abcd’s year… . असं म्हणत फेसबुक युजर्सनी काही फोटोज शेअर केलेले दिसताहेत. आपण फेसबुकवर वर्षभरात शेअर केलेल्या फोटोंपकी काही सिलेक्टेड फोटो या ‘फोटो शेअिरग’मध्ये दिसतात नि आठवणींचा दर महिन्याचा मस्तसा फ्लॅशबॅक आपल्याला रमवून जातो. फोटो शेअिरगच्या शेवटी ओळ असते- ‘लेटस् वेलकम अ हॅप्पीवाला २०१५’..  
दहशतवादाचा निषेध
पेशावरमधील शाळेवरचा दहशतवादी हल्ल्याच्या निमित्तानं ‘पाकिस्तान’, ‘तालिबान’ हे ट्रेण्डस् ट्विटरवर अपडाऊन होत होते. या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला गेला. सगळ्याच सोशल साइटसवर शोक संतप्त शब्दांत पोस्ट, ट्विटस् केल्या गेल्या.
‘रॉय’चं ‘राज’ काय?
रोमँटिक अ‍ॅक्शन थ्रिलर म्हणून प्रसिद्धी करण्यात आलेल्या ‘रॉय’च्या ट्रेलरला यू ट्यूबवर पाच दिवसांत ३८ लाखांवर ‘व्ह्य़ूज’ मिळाले. रणबीर कपूर नि अर्जुन रामपालच्या चेहऱ्यांचं रहस्यमयी पोस्टर नि जॅकलिन फर्नाडिसच्या डबल रोलबद्दलच्या कथेमुळं अनेकजणांना हा ट्रेलर पाहावासा वाटला असेल.     
वादग्रस्त
प्रदर्शनाआधीपासूनच पोस्टरमुळं वादग्रस्त ठरलेल्या आमिर खानच्या ‘पीके’च्या रिलिजनंतर आणखी एका वादाला तोंड फुटलंय. भारतीय देव-देवतांची खिल्ली उडवणं, भारतीय मुलगी नि पाकिस्तानी मुलातील प्रेमकहाणीला आक्षेप घेत ‘बॉयकॉटपीके’ म्हणणारे आणि ही गोष्ट मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून बघा असा ‘वुईसपोर्टपीके’ अशी पीकेची बाजू घेणारे यांच्यात ट्विटरवर जोरदार जुगलबंदी रंगलेली दिसली. व्हॉटस अ‍ॅपवरूनही अशा आशयाचे मेसेजेस फिरत होते.
कुछ हटके
ट्विटरवर ‘केजरीवाल टॉट मी’ या हॅशटॅगखाली अरिवद केजरीवाल यांच्या वर्तन-निर्णयाबद्दलच्या ट्विटस् नि फोटोज अपलोड करण्यात आले आहेत. ‘बिग बी’ नि ‘कोलावेरी डी’फेम धनुषच्या ‘शमिताभ’चं ऑडिओ पोस्टर रिलिज झालं. अमिताभ बच्चन या चित्रपटाबद्दल उत्सुक असून त्यांनी हे ऑडिओ पोस्टच ट्विट केलीय. बऱ्याच साइटसवर जम्मू-काश्मीर, झारखंडमधल्या निवडणुकांवर मतमतांतरांच्या फैरी झडल्या होत्या. नवीन वर्षांत फेसबुकच्या सेटिंग्जमध्ये बदल होणारेत, हे लक्षात ठेवा.
vv21‘लोकमान्य’च्या ट्रेलरला दीड लाख हिटस्
नेटिझन्समध्ये पहिल्या टिझरपासून उत्सुकता वाढवणाऱ्या ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ या आजच रिलिज होणाऱ्या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरला दीड दिवसांत दीड लाखांवर हिटस् मिळाल्यात. अनेकांनी हा ट्रेलर ट्विटर नि फेसबुकवरही शेअर केलाय. व्हॉटस् अपच्या माध्यमातूनही हा ट्रेलर सगळ्यांपर्यंत पोचतोय.
वर्षांरंभाची सुरुवात
vv22नवीन वर्षांचा आज दुसराच दिवस उजाडतोय.. नवीन वर्षांतले नवनवे संकल्प मात्र काही दिवस आधीपासून ट्विट केले जातायत. ‘मेबीनेक्स्टइयर’ या हॅशटॅगखाली त्यात खूप अभ्यास करण्यापासून ते वजन घटव्यापर्यंतचे अनेक संकल्प ट्विट केले गेले. या संकल्पांसोबतच ‘हॅकसॅण्टासॅक’ या हॅशटॅगखाली आपली विश अनेकांनी सांताकडं ओपनअप केली होती. ‘2014 इन ५ वर्ड्स’ या हॅशटॅगखाली २०१४ हे वर्ष कसं गेलं, तेही ट्विट करण्यात आलंय. या ट्विटसमध्ये अनेकजण हळवे होताना दिसले. आणि आता लास्ट बट नॉट द लीस्ट.. या नवीन वर्षांच्या नव्या कोवळेपणाइतकाच कोवळेपणा असलेल्या ‘कनफ्युज्ड बेबी मिटस् ट्विन्स’ हा धम्माल व्हिडिओ पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याला हजारांवर व्ह्य़ूज मिळालेत. https://www.youtube.com/watch?v=CBO1m4Hr-xA