29 May 2020

News Flash

फुटबॉल, क्रिकेट आणि ‘व्हिलन’

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या?

| January 23, 2015 01:08 am

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट सोशल साइट्सवरच्या ट्रेण्डना विषयाचं बंधन असं नाहीच नि ते नसावंही. म्हणूनच आजच्या या ट्रेण्ड्समध्ये फुटबॉल, पुरस्कार, संक्रांत आदी ट्रेण्ड्स दिसताहेत.
बॅलॉन डी ऑर
vv23फुटबॉलप्रेमींमुळं या खबरीनं ट्विटर ट्रेण्डमध्ये रँक मिळवलेय. एक सो एक गोल करण्याची क्षमता नि त्यातल्या सातत्याच्या जोरावर ख्रिस्तियानो रोनाल्डोचं नाव सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ‘बॅलॉन डी ऑर’ या प्रतिष्ठित पुरस्कारावर कोरलं गेलंय. हा पुरस्कार त्यानं तिसऱ्यांदा पटकावलाय.
फेसबुकची मक्तेदारी
अमेरिकेतील ‘प्यु रिसर्च संस्थे’तर्फे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात सोशल नेटवìकग साइट्सवर अद्याप फेसबुकचीच मक्तेदारी असल्याचं आढळलंय. आपल्याकडं या साइटचे एक कोटीहून अधिक युजर्स आहेत. ही साइट लोकप्रिय ठरली असली तरी तिची वाढ मंदावत असून इतर साइटच्या युजर्सच्या संख्येत वाढ होताना दिसतेय.  
‘एबीडी’ डिलिव्हर्स सेंच्युरी..
‘ट्विटर’वरच्या ट्रेण्डिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर झळकलेले नि फेसबुकवरच्या ट्रेण्डिंगमध्येही समाविष्ट असणारे काही परवलीचे शब्द आहेत— ABDEvillier.. त्यावर क्लिक केल्यावर क्षणार्धात दिसतोय वेगवान शतकाचा जागतिक विक्रम करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डी’व्हिलियर्सचा फोटो. त्यानं वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३१ चेंडूंत शतक झळकाविण्याचा जागतिक विक्रम केला. ही खेळी उभारताना त्यानं कोरे अँडरसनचा विश्वविक्रम मोडीत काढला. तसंच १६ चेंडूंत वेगवान अर्धशतक झळकावून सनथ जयसूर्याचा विक्रमही मोडला. रोहित शर्माच्या सर्वाधिक षटकारांच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी डी व्हिलर्सनं साधली. त्याचं अभिनंदन करणारे नि या विक्रमांची आकडेवाडी दर्शवणारे अनेक ट्विटस रविवारपासून झळकत होते.
Breaking # AB De Villiers to change his name to AB Delivers !! रवींद्र जडेजानं असं ट्विट केलं होतं. तर काहींनी युरेन बोल्टच्या पुढे गेलेल्या डी’व्हिलियर्सचं छायाचित्र पोस्ट केलं  होतं.
संक्रांतीतला गोडवा
‘‘पुणेकर – आम्ही नेहमीच गोड बोलतो. त्यामुळं उगीच संक्रांतीचे मेसेज, तिळगुळाचे फोटो वगरे व्हॉट्स अ‍ॅपवर पोस्ट करू नये. अगदीच वाटल्यास प्रत्यक्ष भेटून दुपारी १ ते ४ सोडून) तिळगूळ द्यायला हरकत नाही,’ अशा पुणेरी बाण्यापासून ते ‘तिळगुळाच्या फोटोंमुळं माझ्या मोबाइलला मुंग्या चिकटल्या’ अशा संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जाताहेत. बार्बी डॉल, फुलं अशी शुभेच्छांची व्हिज्युअल्सही थोडी हटके आहेत. (फोटो सोबत जोडलेत) मात्र संक्रांत १४ जानेवारीऐवजी १५ ला का आली, याचा उलगडा असा की, इंग्रजी कालगणनेनुसार शतकी वर्षांला ४०० नं भागलं जात असेल तर ते लीप र्वष होतं. त्यामुळं ४०० वर्षांच्या काळात संक्रांतीची तारीख एकूण तीन दिवस पुढं सरकते. १९७२ पासून संक्रांत १४ ऐवजी १५ ला येतेय. २०८५ नंतर  १५ जानेवारीआधी कधी संक्रांत येणार नाही. शतक र्वष लीप नसल्यानं १५७ वर्षांच्या चक्रामुळं संक्रांतीची तारीख पुढं सरकणारेय.
जिनी का जादू
‘धीस इज रियली अमेिझग.. यू विल लव्ह इट.. िथक एनी फेमस पर्सन इन युवर माइंड अ‍ॅण्ड क्लिक थिस िलक’-   
http://en.akinator.mobi/personnages/jeu या िलकवरचा जिनी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काही प्रश्न विचारतो. त्यांची हो-नाही अशी उत्तरं द्यायची नि आपल्या मनातल्या व्यक्तीचं नाव मोबाइल स्क्रीनवर झळकलेलं असतं. कसं.. ते तुम्हीच शोधा.
कमल नि रहमान फॅन्ससाठी
 vv24प्रसिद्ध अभिनेते कमल हसनच्या ‘उत्तम व्हिलन’ या तामिळ चित्रपटाचा ट्रेलर यू टय़ूबवर रिलिज झालाय. दोन दिवसांत या व्हिडीओला ८० हजारांवर लाइक्स मिळालेत. आपल्याला तामिळ कळत नसली तरी कमलच्या अभिनयाचा आस्वाद नक्कीच घेता येईल. https://www.youtube.com/watch?v=mwOFWJUOpv8
यूथचा लाडका संगीतकार ए. आर. रहमानच्या ‘तू चले’ या व्हिडीओ सॉँगलाही रसिकांनी अशीच भरभरून दाद दिल्येय. अर्जतिसिंग नि श्रेया घोषालच्या स्वरांना सात हजारांवर व्हय़ूज मिळालेत.
https://www.youtube.com/watch?v=PNQ0k8k_Eec

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2015 1:08 am

Web Title: news trend on social media
Next Stories
1 क्लिक : आदित्य हजारे
2 लिटिल शिल्पाची गोष्ट..
3 उंच तिचा झोका
Just Now!
X