12 July 2020

News Flash

चमकणारे तारे

आजच्या आधुनिक (टेक्नोलॉजीच्या) युगात फॅशन आज एक, तर उद्या एक अशी पाहायला मिळते.

(संग्रहित छायाचित्र)

|| गायत्री हसबनीस

एखादी फॅशन रुजायला आज अंशत: कमी वेळ लागतो. त्यानंतर गंमत अशी होते की, ती फॅशनलगेच कुठे तरी गायब होते आणि मग अचानक तीच परत ट्रेण्डमध्ये दिसायला लागते. पुन्हा आल्यानंतर तर ती इतकी गाजते की अरेच्चा! ही फॅशन परत का एवढी ट्रेण्डमध्ये आली आहे? या प्रश्नाबद्दलचं कुतूहल वाढत जातं. पूर्वी एखादी फॅशन रुजायची आणि तिथल्या तिथे लोकप्रिय व्हायची. विशेष म्हणजे त्यानंतरही त्याची महती सांगणारे आणि जपणारेही अनेक होते, आजही आहेत.

आजच्या आधुनिक (टेक्नोलॉजीच्या) युगात फॅशन आज एक, तर उद्या एक अशी पाहायला मिळते. एके काळी गाजल्यावरही परत अमुकतमुक कारणाने ट्रेण्डमध्ये आलेल्या फॅशनची किमयाच वेगळी! साधारणपणे आजूबाजूला पाहिले तर फॅशन परत येण्याची आणि परत येऊनही गाजण्याची कारणं आणि त्याबद्दलची निरीक्षणंही वेगवेगळी आहेत. पण यात प्रामुख्याने जाणवलेला बदल म्हणजे परत परत तीच फॅशन आणून तिला नवाकोरा ‘टच’ देणे हा. याचे पुरावे म्हणजे रेट्रो, विंटेज, हिपहॉप, डेनिम यांची नावं घेता येतील. यांना तर आज वेगवेगळ्या पद्धतीने कलात्मकरीत्या बदलून त्याचा एक स्वतंत्र ट्रेण्ड सेट केला जातो आहे. हे सर्व प्रकार आपल्याकडे जागतिकीकरणाच्या रेटय़ातून आलेले. त्यात आपल्याकडे प्रथम पॅटर्न्‍स आले. त्यानंतर जीन्स, डेनिम, स्कर्ट््स, बेल्ट, कोट्स, केप्री, शर्ट, थ्री फोर्थ वगैरे वगैरे. यानंतर एकापाठोपाठ येणाऱ्या नवनवीन फॅशनच्या दुनियेत मध्येच कुठे तरी प्रवेश केला तो शिमर, ग्लिटर अशा चमकदार आऊ टफिट्सनी. हे आऊटफिट्सही जेव्हा आले तेव्हा गाजले, मध्येच गायब झाले आणि आज ते परत आले आहेत, तेही नव्या ‘टच’सह. अर्थात त्यांना परिसस्पर्श झाला आहे तो बॉलीवूड अभिनेत्रींचा.. आता पुन्हा मुद्दा हाच आहे की, हे नवेकोरे चमकदार ड्रेसेस गाजतायेत की नाही? काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने फॉईलचा मल्टिकलर सूट घालून इन्टाग्रामवर फोटो पोस्ट केला. त्यावर चांगल्या-वाईट प्रतिक्रियांचा पाऊसही पडला, पण बॉलीवूड अभिनेत्रींनी आणलेला हा चमकदार आऊटफिट्सचा ट्रेण्ड गाजतो आहे यात शंका नाही.

बॉलीवूडकडून येणारी कुठलीही फॅशन गाजण्यामागचं महत्त्वाचं कारण आणि माध्यम आहे ते सोशल मीडियाचं. सोशल मीडियाच्या जगभर पसरलेल्या जाळ्यामुळे पूर्वी ट्रेण्डसेटर ठरलेल्या फॅशन्स पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आणणं सोपं होऊन जातं. शिमरच्या फॅशनचा विचार करताना ती आज लोकप्रिय झालेली नाही, हेही लक्षात येतं. मात्र, सोशल मीडियावर त्याचे झळकणारे फोटो पाहिले की, ती फॅशननावालाही जुनी वाटत नाही. आजच्याच काळातील वाटते. असं का? याचा विचार केला तर आपण ज्या टेक्नोसॅव्ही जगात वावरतो आहोत, त्यात आपलं राहणीमान हे खूप श्रीमंती थाटाचं आहे. किंवा तसं बनत जातं आहे. त्याचं प्रतिबिंब कपडय़ांवरही उमटत असल्याने हे ग्लॅमरस, चमचमणारे कपडे पुन्हा एकदा लाईफस्टाईलचा भाग बनू पाहतायेत.

बॉलीवूड अभिनेत्रींनी शिमरचा ट्रेण्ड उचलून धरला असल्याने यंदा वर्षांखेरीस किंवा नववर्षांच्या स्वागतासाठी शिमर, ग्लिटर, फॉईल अशाच पद्धतीचे कपडे डिझाईन करून मार्केटमध्ये आणण्याचा विचार फॅशन डिझायनर्स करत आहेत. बॉलीवूडच्या अभिनेत्रींनी आपली शरीरयष्टी लक्षात घेत या प्रकारातील वेगवेगळे रंग, पॅटर्न्‍स, टाईप्स आपलेसे केले आहेत. प्रत्येकीची शरीरयष्टी निराळी असली तरीही प्रत्येकीला बॉडी लँग्वेज, बॉडी अ‍ॅटिटय़ूडची उत्तमरीत्या जाण आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या स्टाईलने शिमर, ग्लिटर व फॉईल पद्धतीचे कपडे अजमावले आहेत. राधिका आपटे, रकुल प्रीत, सोनाक्षी सिन्हा, अनन्या पांडे, क्रिती खरबंदा, करिना कपूर, तारा सुतारिया, जान्हवी कपूर, सोनाली बेंद्रे, जॅकलीन फर्नाडिस, डायना पेन्टी, मानूषी छिल्लर, शाहिन नथानी, तमन्ना भाटिया, आलिया भट्ट आणि श्वेता त्रिपाठी अशा अनेक लोकप्रिय नायिकांनी सुंदर व उत्तमोत्तम शिमर, ग्लिटरचे आऊटफिट्स व्यवस्थित कॅरी केले आहेत. प्रत्येकीचा आऊटफिट हा निराळा होता. उदाहरणार्थ, राधिका आपटेने क्रिस्टल एम्ब्रॉयडरी कम शिमरचा सुंदर वनपीस घातला होता. त्या ड्रेसची रचना अशी की, शॉर्ट ब्लॅक स्कर्टवर तिने घातलेल्या वनपीसचा लुक लॉन्ग सिमेट्रिकल टॉपसारखा वाटत होता. फुटवेअरमध्येही तिने ट्रान्सपरन्ट हिल्सना पसंती दिली आणि कुठल्याही ज्वेलरीचा वापर केला नाही. फक्त एकच डायमंड रिंग घालून तिने तिचा लुक पूर्ण केला. हा आऊटफिट राहुल खन्ना व रोहित गांधी यांनी डिझाईन केला होता. मुळात तुम्ही शिमरचा फक्त वनपीस किंवा मिडी घालता तेव्हा कुठल्याही इतर अ‍ॅक्सेसरीजची गरज नाही. बोटात घातलेली साधी रिंगही तुमचा लुक पूर्ण करते, हे लक्षात घेतलं पाहिजे.

अनन्या पांडेच्या बाबतीत बोलायचं तर तिची उंची जास्त आहे, त्यामुळे तिने घातलेल्या आऊटफिटनुसार तिला तिची उंची खुलवण्याची चांगली संधी मिळाली होती. क्लोज नेक, फुल हॅण्ड आणि लाइट स्किन-ब्राऊन रंगाची छटा असलेल्या मिडीसोबत तिने त्याच रंगाच्या पेन्सिल हिल्स घातल्या. कुठल्याही हेअरस्टाईलशिवाय नैसर्गिकरीत्याच ती शिमर मिडीमध्ये सुंदर वाटली. तिचा आऊटफिट हा गोल्डन वाटतो, पण तो पूर्णत: सोनेरी रंगाचा नव्हता. रकुल प्रीतचीही उंची चांगली आहे. तिने मरून पिंक रंगाचा आऊटफिट वापरला. मुळात शिमरचे डिझाईनच असे आहे की, ते एकटेही खुलून दिसते आणि त्यासोबत अजून एक गार्मेट वापरले तरीही ते उठावदार दिसते. रकुलने परिधान केलेला टॉप हा पूर्णपणे शिमरचा होता आणि त्यासोबत तिने पलाझोचं कॉम्बिनेशन मॅच केलं होतं. टॉपचे हातही फुलहॅन्ड आणि मनगटाला बंद असे सिमेट्रिकल रचनेचे होते; पण त्याची रचना ओपन व कट्समध्ये होती. हाताचे कट्स हे कव्‍‌र्ह शेपमध्ये असल्याने आतील शिमरच्या टॉपचा काही भागही त्या कट्समधून दिसत होता. छान उंची आणि लांब पाय असतील तर रकुलने वापरलेला हा पलाझो आणि शिमर टॉपचा फंडा कूल ठरेल. क्रिती खरबंदा या अभिनेत्रीनेही काहीसा असाच प्रकार ट्राय के ला होता. तिचा पूर्ण ड्रेस ग्रिनीश ब्ल्यू शिमरमध्ये होता. तिने पॅन्ट आणि कोटचा वापर केला होता. थोडा समर लुक म्हणून याकडे पाहता येईल. कारण ब्रा टॉप आणि पॅन्टवर तिने ब्लेझर कोट वापरला. करीना कपूरचा ड्रेस हा सिल्व्हर ग्लिटरचा होता. तिने केशरचनाही अंबाडय़ाची ठेवली. लो बॅक असल्याने फूल मेगा बेल हॅण्डसचा लुक वाखाणण्याजोगा आहे.

जान्हवी कपूरने परिधान केलेला ड्रेस हा चमकदार फॉईलचा होता. त्याची रचना प्लिडेड होती. वी नेक असणाऱ्या गाऊनला वन लेग कट होता, त्यामुळे तिनेसुद्धा पेन्सिल हिल्स वापरले. तिच्या कुरळ्या केसांच्या स्टाईलमुळे तिचा लुक प्रिन्सेस लुक ठरला. श्वेता त्रिपाठीने गोल्ड रोझ रंगाचा फॉईल पर्का ड्रेस परिधान केला होता. हा जास्त करून ऑफिसवेअरही होऊ  शकतो. ऑफिसमधील पार्टीला हा घालण्याजोगा आहे. ज्यांचे केस छोटे आहेत त्यांच्यावर हा जास्त खुलेल. फॉईलचा उत्तम वापर शाहिन नथानी यांनी केला. तिचा ड्रेस हा बेल हाफ हॅण्डचा आणि ग्रीन – रेड कॉन्ट्रास्ट फॉईलचा होता. त्यामुळे तिने त्यावर ग्रीन क्रिस्टल आयताकृती इअररिंग्ज आणि केशरचना पोनीप्रमाणे ठेवली. तिचा ड्रेस पूर्ण फॉईलचा असूनही तो कुठे कमी पडला नाही. सोनाली बेंद्रेचा लुकही फार वेगळा होता. फुल हॅण्ड आणि ऑफ शोल्डर अशी तिची ड्रेसरचना होती. ही हातांची रचना असल्याने क्लोज नेक पॅटर्नची आयडिया योग्य ठरली. डार्क सिल्व्हर शिमर आऊटफिट असल्याने त्यावर मोती आणि डायमंडची एम्ब्रॉयडरी रॉयल वाटली. असे ड्रेस हे वेडिंग रिसेप्शनचे आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि मानुषी छिल्लर यांनी मॅचिंग लुक केला होता. दोघींनी शिमर आऊटफिट्स हे सिंपल ठेवून तसा मॅचिंग मेकअप आणि अ‍ॅक्सेसरीज वापरले. जॅकलीन फर्नाडिस व डायना पेन्टी यांनी मर्मेड शिमर गाऊ न्स वापरले. डायनाने वर्सेसच्या घडय़ाळाचे प्रोमेशन करताना रेड वॉचला अनुसरून ब्लॅक शिमर मर्मेड गाऊन घातला होता. तिने नेल्सही ऑरेंज रंगात रंगवले होते.

डिझायनर्स मनीष मल्होत्रा आणि अमित अग्रवाल यांनी या फे स्टिव्हल सीझनला शिमर, ग्लिटर व क्रिस्टल आऊटफिट्स आणले होते आणि त्यात त्यांनी याच प्रकारच्या साडय़ाही डिझाईन केल्या. ब्लाऊज आणि साडीचा योग्य समतोल त्यांनी लुक डिझाईन करताना राखला. तारा सुतारियाने मनीष मल्होत्राची सिल्वर शिमर साडी आणि त्यावर प्लेन सिल्वर ब्रा टॉप घातला होता. त्यावर मोत्यांचे लेअर्ड नेकलेस घालत तिने लुक पूर्ण केला. जॅकलिननेही मॅन्गो कलरच्या शिमर साडीवर सिल्वर शिमर ब्रा टॉप घातला. त्यामुळे वुमन्सवेअरमध्ये सध्या शिमरच्या बाबतीत असंख्य पर्याय उपलब्ध आहेत हे वारंवार दिसून आले आहे. अर्थात, हा चमकदारपणा मेन्सवेअरमध्ये अजून हवा तसा शिरलेला नाही. नाही म्हणायला मेन्सवेअरचं प्रतिनिधित्व म्हणून करण जोहरने ब्लॅक शिमर ब्लेझर घातला खरा.. पण अजून त्याला तितकीशी दाद मिळालेली नाही; किंबहुना मेन्सवेअरमध्ये शिमर खुलवायला अजूनही वाव असल्याचेच यातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे चमकदार कपडय़ांची चकाकी सध्या तरी वुमेन्सवेअरनाच लाभली आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 2:10 am

Web Title: old fashion trend till popular abn 97
Next Stories
1 बदलती लग्न‘पत्रिका’
2 क्षण एक पुरे! : होय, तो शेतकरी!
3 टेकजागर : ‘लाइक’चं असणं-नसणं!
Just Now!
X