05 March 2021

News Flash

‘अनियन’ आख्यान

टोमेटोबद्दल आपण मागच्या एका लेखात जाणून घेतल्यावर अनेकांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळवला. आपण ज्या शब्दाचा अगदी खात्रीपूर्वक उच्चार करतो तो वेगळाच असू शकतो

| August 14, 2015 01:48 am

एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

टोमेटोबद्दल आपण मागच्या एका लेखात जाणून घेतल्यावर अनेकांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळवला. आपण ज्या शब्दाचा अगदी खात्रीपूर्वक उच्चार करतो तो वेगळाच असू शकतो हे एकदा कळले की, मग आपल्या संशयाची सुई आजूबाजूच्या गोष्टींकडे न वळली तर नवलच. टोमेटोमुळे कांद्याचा उच्चार तपासून घेऊ असा काहींनी विचार व्यक्त केला आणि इथेही असंच काहीसं घडलं. आपल्या उच्चारापेक्षा हा उच्चार ब्रिटिश व अमेरिकन दोन्ही इंग्रजीत वेगळाच निघाला.
कांद्यासाठी आपण ओनियन किंवा ओनिअन असा इंग्रजी उच्चार निश्चित केला आहे. पण अचूक उच्चार आहे अनियन. स्पेलिंगमधल्या ‘ओ’ चा ‘अ’ झालाय. फार क्वचित असा अचूक उच्चार आपल्याला ऐकायला मिळतो. बहुतांशी ओनियन असाच उच्चार आपल्या मुखी असतो.
कांदा अगदी हजारो वर्षांपासून आपल्याकडे पिकवला जात असल्याचे दाखले आहेत. ‘अनियन’ हा शब्द मात्र ओल्ड फ्रेंचमधून मिडल इंग्लिशमध्ये आला आहे. या अनियनचे मूळ माहीत नसले तरी खूप आधीपासून हे पीक काढले जाते असे, कारण इतर भाज्यांच्या तुलनेत हा कांदा अधिक टिकतो. इजिप्तमध्ये तर कांद्याची पूजा व्हावी इतका त्याला मानसन्मान आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे circle within circle strcture.
न्यूयॉर्क शहराला गमतीने big onion असे म्हटले जायचे. कारण या big शहराच्या इतर भागातून फिरता फिरता शहराच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहचणे एक दिव्यच.
इंग्रजीत एक म्हण या अनियनशी जोडली गेली आहे.
Onion skin very thin
Mild Winter coming in
Onion skin very tough
Coming Winter very rough कांद्याच्या पापुद्रय़ावरून येणाऱ्या winter विषयी अंदाज बांधला जात असे.
अनियनच्या उच्चाराच्या निमित्ताने हे सारे गमतीशीर दाखले आज प्रकाशात आले. काहींना हा प्रश्न नक्कीच पडेल की, ओनियन, ओनिअन असो वा अनियन, चवीत काही फरक पडणार आहे का? मूळ उच्चार कळल्यावर कांदा कमी तिखट होणार का? नाहीच. पण जे जे आपणासी ठावे.. या भूमिकेतून हा अनियन प्रपंच आपल्यापर्यंत पोहोचवला. सर्वसामान्य माणसांना या उच्चाराने फरक पडणार नाहीच कदाचित, पण खासकरून हॉटेल मॅनेजमेंट किंवा फूड सायन्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र या अचूक उच्चाराचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. आणि उच्चारही या अनियनसारखेच असतात की ! खूप वेगवेगळे पापुद्रे उलगडत जावे तेव्हा अचूक उच्चाराचा गाभा मिळतो. नाही का? त्यामुळे अनियनचे हे उलगडून दाखवलेले पापुद्रे कसे वाटले हे ई-मेलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अवश्य येऊ द्या.
– रश्मी वारंग,  viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:48 am

Web Title: onion how pronounce
Next Stories
1 स्वातंत्र्याचा अर्थ
2 तिरंगी फॅशन
3 इट्स ऑल अबाऊट चॉकलेट
Just Now!
X