जसा प्रत्येक दुकानाचा तो तो ग्राहक ठरलेला असतो तसंच काहीसं अनेकदा ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत घडतं. प्रत्येक ग्राहकाची विशिष्ट शॉपिंग साइट बहुतेकदा ठरलेलीच असते आणि तो त्याच साइटवरून खरेदी करतो. आणखी काय सांगतात ऑनलाईन शॉपिंगचे ट्रेंड्स?
ऑनलाइन शॉिपग हा शब्द आता तसा काही नवीन नाही. आजकाल ऑनलाइन शॉिपगची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली बदलती लाईफस्टाईल त्याला कारणीभूत आहे. प्रत्येक वीकेण्डच्या सुरुवातीला आपण दोन दिवसांच्या सुट्टीचा प्लॅन आखत असतो आणि त्या प्लॅनमध्ये हमखास एक गोष्ट ठरलेली असते ती म्हणजे ‘शॉिपग’!! वीकेण्डच्या सुट्टीमध्ये आठवडाभराची सगळीच कामं उरकायची असतात आणि मग नाईलाजाने का होईना पण शॉिपगसाठी बाजारात जायला फुरसतच मिळत नाही. मग घरबसल्या शॉपिंगचा पर्याय असतो ऑनलाइन शॉपिंगमधून.
जसा प्रत्येक दुकानाचा तो तो ग्राहक ठरलेला असतो तसंच काहीसं अनेकदा ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत घडतं. प्रत्येक ग्राहकाची विशिष्ट शॉपिंग साईट बहुतेकदा ठरलेलीच असते आणि तो त्याच साईटवरून खरेदी करतो. इतकंच काय तर काहींच्या ऑनलाइन खरेदी करण्याच्या वस्तूदेखील ठरलेल्या असतात. एरवी साध्या दुकानात स्त्रियांना बरंच काही पाहून, तासन्तास त्यात घालवून हवी ती वस्तू घ्यायची सवय असते, मग ती ब्रॅण्डेड असो व नसो. आवडली की घ्यायची अशी स्त्रियांची पॉलिसी असते. ती ऑनलाइन शॉिपग करतानाही दिसून येते. अनेक दुकानांप्रमाणे येथे अनेक साइट्स धुंडाळून त्यांची ऑनलाइन खरेदी होते; पुरुष मात्र जास्त ब्रॅण्ड कॉन्शन्स असतात. ज्या ब्रॅण्डची वस्तू हवी असेल त्याच ब्रॅण्डच्या साइटवर जाऊन ते झटपट आपली खरेदी उरकतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एरवी स्त्रियांचं समजलं जाणारं शॉिपग डिपार्टमेंट ऑनलाइन शॉिपगच्या बाबतीत मात्र पुरुषांकडे गेलंय. म्हणजेच एका सर्वेक्षणानुसार भारतीय पुरुषांची ऑनलाइन शॉिपग करण्याची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे! पुरुष अधिक नेटसॅव्ही आहेत, हेही त्यामागचं कारण असू शकतं.
ऑनलाइन शॉपर्सच्या एका सर्वेक्षणानुसार, जवळपास ४५ टक्के लोक कपडे खरेदीसाठी ऑनलाइन शॉिपग करतात. सगळ्यात जास्त ऑनलाइन परचेसिंग सिनेमा तिकीट, मोबाइल अ‍ॅप्स आणि हवाई तिकीट यांचे होते. आज आपल्याकडे जे स्मार्ट फोन्स किंवा टॅबलेट्स आले आहेत, याचाही उपयोग ऑनलाइन शॉिपगसाठी करणारे अनेकजण आहेत. खरं तर ऑनलाइन शॉिपग या संकल्पनेने एक मोठी क्रांतीच घडवून आणली आहे. पुस्तकांपासून कपडे, भांडी, बूट, दागिने, मेकअपचे सामान ऑनलाइन मागविण्यात येतात. सध्या बेबी प्रॉडक्ट्स तसेच न्यूट्रिशन-फूड ऑनलाइन ऑर्डर करण्याचा ट्रेण्ड काही सर्वेक्षणातून दिसतो.

कसं कराल ऑनलाइन शॉिपग?
ऑनलाइन शॉिपग करायचं असल्यास वेगवेगळ्या साईट्स उपलब्ध आहेत. त्याद्वारे तुम्ही शॉिपग करू शकता. उदा. होम शॉप १८, फ्लिपकार्ट आदी साइट्सवर तुम्ही गेलात की, कॅटलॉगवरून आपल्या पसंतीची गोष्ट निवडू शकता.

* ऑनलाइन शॉिपग करताना पशाचे व्यवहार तुम्ही कसे करणार आहात ते ठरवून घ्या. एक तर तुमचं प्रॉडक्ट घरी आल्यावर तुम्ही प्रत्यक्ष पसे देऊ शकता (याला कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडावा लागतो) किंवा काही साइट्स तुम्हाला ऑनलाइन पेमेंटचाही पर्याय देतात. त्यामुळे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही बिलाची चुकवणी करू शकता.
* ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट कार्डवरून तुम्ही पैसे भरू शकता.
* काही साइट्स तर याच्याही पुढे जाऊन तुम्हाला प्रॉडक्ट घरी आणून दाखवतात, त्यामुळे ती वस्तू प्रत्यक्ष पाहून घ्यायची की नाही याचा पर्याय तुमच्या हाती असतो; पण काही साइट्सवर एकदा तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट केलंत की तेच फायनल होऊन जातं.

आता तुम्हीसुद्धा घरबसल्या या माध्यमातून मनपसंत शॉिपग करू शकता. ऑनलाइन शॉिपगचा नवा आणि सोयीस्कर ट्रेण्ड सध्या अनेकांना शॉिपगसाठी मदत करतोय. जिनेसिस या कंपनीने केलेल्या अभ्यासातून भारतातील अनेक व्यापारी आता ई-कॉमर्सकडे वळताहेत असे दिसून आले आहे. बाजारपेठा आता ई-जगताचा ताबा घेताहेत. ‘रिपोर्ट ऑन ई-कॉमर्स अ‍ॅडॉप्शन बाय अ‍ॅपरल रिटेलर्स २०१३’ यांनी केलेल्या अभ्यासातून २७.५ टक्के व्यापाऱ्यांनी आता ई-कॉमर्सकडे आपलं मार्केट वळवलंय; तर २०.१ टक्के व्यापारी आता प्रत्यक्ष ऑनलाइनच्या व्यासपीठावर आले आहेत. त्यामुळे ऑनलाइन शॉिपग आता सहजपणे उपलब्ध झाले आहे. प्युमा, नायके, आदिदास, डब्लूसारखे ब्रॅण्ड याअगोदरच ग्राहकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देत आहे. आता इतरही अनेक ब्रॅण्ड्स आणि मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स ऑनलाइन शॉपिंगचे नवे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर आहेत.
ऑनलाइन खरेदीला मिळणारी ग्राहकांची पसंती आणि ई-शॉिपगच वाढतं प्रस्थ यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे टाइट शेडय़ुल. ई-शॉिपगमुळे कुठूनही आपण अगदी आपल्या मनासारखी आणि कमीत कमी वेळात खरेदी करू शकतो. सुरुवातीला अनेकजण ऑनलाइन शॉिपगबाबतीत फारसे जागरूक नव्हते. मालाची गुणवत्ता, पैशाचे व्यवहार याबाबत अनेक शंका असायच्या. पण गेल्या काही काळात ऑनलाइन शॉिपग साइट्सचा युझर फ्रेंडली अ‍ॅप्रोच ग्राहकांनाही आवडत आहे.