News Flash

‘फिजिटल’ फॅशन वीक

२०२० मध्ये संपूर्ण जगच जवळजवळ व्हच्र्युअल झालं होतं. आता हळूहळू आपण सगळे ‘न्यू नॉर्मल’पासून ‘बॅक टू नॉर्मल’चा प्रवास करतोय.

१६ ते २१ मार्चदरम्यान होणाऱ्या यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये ‘फॅशन डिझाईन काऊन्सिल ऑफ इंडिया’चा सक्रिय सहभाग असणार आहे.

वेदवती चिपळूणकर – viva@expressindia.com

२०२० मध्ये संपूर्ण जगच जवळजवळ व्हच्र्युअल झालं होतं. आता हळूहळू आपण सगळे ‘न्यू नॉर्मल’पासून ‘बॅक टू नॉर्मल’चा प्रवास करतोय. सगळ्याच इंडस्ट्रीजनी पुन्हा आपापल्या मूळ स्वरूपात यायला सुरुवात केली आहे, त्याला फॅशन इंडस्ट्री अपवाद कशी ठरेल? २०२० मध्ये पहिल्यांदाच व्हच्र्युअल फॅशन वीक केल्यानंतर आता या वर्षी हा ‘लॅक्मे फॅशन वीक’ फिजिटल होणार आहे. न्यू नॉर्मल आणि ओल्ड नॉर्मल यांचं कॉम्बिनेशन करत या वेळी काही प्रमाणात रन-वे वॉक्स तर काही व्हच्र्युअल शोज अशा पद्धतीने ‘लॅक्मे फॅशन वीक’चं आयोजन करण्यात आलं आहे. ‘आरआयएसई वल्र्डवाईड’ आणि ‘एफ.डी.सी.आय.’ अर्थात ‘फॅशन डिझाईन काऊ न्सिल ऑफ इंडिया’ हेदेखील यंदा ‘लॅक्मे’सोबत फॅशन वीकमध्ये एकत्र येणार आहेत.

१६ ते २१ मार्चदरम्यान होणाऱ्या यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये ‘फॅशन डिझाईन काऊन्सिल ऑफ इंडिया’चा सक्रिय सहभाग असणार आहे. गेल्या वर्षभरात सर्वच व्यवसायांनी सेटबॅक बघितला. फॅशन इंडस्ट्रीला उभारी देण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन एका उद्देशाने काम करणं आवश्यक आहे. ‘लॅक्मे फॅशन वीक’, ‘आरआयएसई वल्र्डवाईड’ आणि ‘एफ.डी.सी.आय.’ या तिघांचंही लक्ष्य आता एकच असेल आणि त्याच दृष्टीने या फॅशन वीकसाठी एकत्र येताना आम्हाला समाधान वाटतं आहे, असं एफ.डी.सी.आय.चे अध्यक्ष सुनील सेठी यांनी स्पष्ट के लं. ‘लॅक्मे गेल्या वीस वर्षांपासून भारताच्या सौंदर्याचा भाग बनलेलं आहे. आता कॉस्मेटिक आणि फॅशन इंडस्ट्रीला अजून उंचीवर नेण्याच्या दृष्टीने ‘फॅशन डिझाईन काऊन्सिल ऑफ इंडिया’शी केलेलं कोलॅबरेशन नक्कीच सर्वाच्या फायद्याचं ठरेल,’ असा विश्वास लॅक्मेचे हेड ऑफ इनोवेशन अश्वथ स्वामिनाथन आणि ‘आरआयएसई वल्र्डवाईड’चे लाइफस्टाइल बिझनेस हेड जसप्रीत चांडोक यांनी व्यक्त केला आहे.

अनामिका खन्ना या डिझायनरच्या फॅशन शोने या वर्षीच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ची सुरुवात होणार आहे. ‘टाइमलेस द वर्ल्ड’ या कलेक्शनमधून मॉडर्न ट्रेण्डस् आणि जुनं हेरिटेज यांचं मिश्रण पाहायला मिळेल. दरवर्षीप्रमाणे ‘जेन-नेक्स्ट फॅशन शो’साठी यंदाही दोन तरुण डिझायनर्स निवडण्यात आले आहेत. लेबल राहुल दासगुप्ता आणि रफूघर अशा दोन लेबल्सची निवड या वर्षी करण्यात आली आहे. राहुल दासगुप्ता याच्या कलेक्शनमध्ये कॉटन आणि ओरगांजा सिल्क फॅब्रिकवर शिबोरी वापरण्यात आलं आहे. त्याचं संपूर्ण कलेक्शन हे समुद्राच्या कल्पनेवरून प्रेरित झालेलं असल्यामुळे रंगांची निवडही हलक्या ब्लूज आणि ग्रीन्समधली आहे. रफूघरच्या ‘माझी’(maazi) या कलेक्शनमध्ये पारंपरिक फॅब्रिक्सवर क न्टेम्पररी एम्ब्रॉयडरी अशी या कलेक्शनची खासियत आहे. या कलेक्शनमध्ये ब्लॉक प्रिंटिंगचा वापर मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला आहे.

या वर्षीच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’साठी केवळ डिझायनर्स आणि मॉडेल्सच नव्हे तर तांत्रिक एक्स्पर्ट्सही मोठय़ा प्रमाणावर तयारी करताहेत. काही शोज रनवेवर होणार आहेत तर काही शोज केवळ फोटोशूट्स असणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून होणारा यंदाचा हा फॅशन वीक वेगळा ठरणार हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 1:52 am

Web Title: phygital fashion week 2021 dd 70
Next Stories
1 फॅशन, फिटनेस आणि बरंच काही..
2 संशोधनमात्रे : जखमांच्या जगातल्या गोष्टी
3 माझं माध्यम, माझी भाषा
Just Now!
X