20 September 2020

News Flash

पीयूष रानडे

फिट-नट

|| प्रियांका वाघुले

माणसाने फिट राहण्यासाठी जे आवश्यक आहे ते प्रयत्न करायलाच हवेत, असे पीयूष रानडे म्हणतो. बऱ्याचदा तरुण वय निघून गेल्यावर मग पुढे अनेकांना कंबरदुखी, पाठदुखीसारखे त्रास होऊ  लागतात. त्याचे कारण शरीराचा सगळा व्यापार सांभाळणाऱ्या आपल्या अवयवांना मजबूत करण्याचा प्रयत्नच आपण केलेला नसतो. त्यामुळे मग अशा अवयवांच्या दुखण्यांना सामोरे जावे लागते, असे पीयूष म्हणतो. अर्थात, कलाकार म्हणून त्याच्या दैनंदिनीत फिटनेसला जास्त वेळ मिळत असला तरी प्रत्येकालाच रोजच्या रोज व्यायाम करणे सोपे जाते असे नाही, असे तो सांगतो.

मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आलेल्या पीयूषच्या मते सर्वसाधारणपणे लोक उशिरा का होईना सुरुवात करू या असं म्हणत व्यायाम करायला लागतात. त्यासाठी आपल्या आहारावर नियंत्रण आणण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. मात्र संयमाचे गणितच अवघड. ज्या गोष्टीकडे पाहायचे नाही असे आपण ठरवतो त्याचकडे आपले मन जास्त ओढले जाते. त्यामुळे जोपर्यंत आजारपण किंवा दुखणे मागे लागत नाही तोवर फिटनेसकडे लक्ष देण्याचा प्रयत्नच कोणी करत नाही. मात्र व्यायाम, आहारनियंत्रण याचा समतोल साधून फिटनेस सांभाळणे सोपे नसले तरी ते अशक्य नाही हे लक्षात घेऊन वेळीच त्यासाठी योग्य ती मेहनत घ्यायला हवी, असे तो स्पष्ट करतो.

एकदा फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं की हळूहळू आपण ते एंजॉय करू लागतो. त्यामुळे आपल्या शरीरात आणि मनातही जे बदल होतात ते निश्चितच सुखावणारे असल्याने आपण फ्रेशही राहतो. तो स्वत: या अनुभवातून गेला असून त्यामुळेच फिटनेसला त्याच्या मते अतोनात महत्त्व आहे. फिटनेस सांभाळण्यासाठी कार्डिओ करत असताना ट्रम्म्डमिलवर धावण्यापेक्षा तो मोकळ्या जागेवर धावण्याला जास्त प्राधान्य देतो. ट्रेडमिलवरील तांत्रिक धावण्यामुळे फॅट बìनग होते मात्र त्यापेक्षा मोकळ्या हवेत धावल्याने फॅट बìनगबरोबरच ताजी हवा आणि प्रसन्न वातावरणाचा खुराक शरीराला आणि मनालाही मिळतो. आजूबाजूची हिरवाई डोळ्यांनाही शांत करते, ताजंतवानं होण्यास मदत करते.

रोजच्या व्यायामामध्ये तो फ्री हॅन्ड एक्सरसाइझला महत्त्व देत असल्याचे सांगतो. कारण शूटिंगच्या वेळा आणि त्यातून उरलेल्या वेळेत जिममध्ये जाऊन पुरेसा व्यायाम करणे कित्येकदा जमत नाही. अशा वेळी फ्री हॅन्ड एक्सरसाइझची सवय असल्यामुळे साइड बेंड, लेग लिफ्ट, पुश अप्ससारखे व्यायाम कोणत्याही ठिकाणी सहज करता येतात. त्यासाठी जिमवर अवलंबून रहावे लागत नाही.

बाहेर कुठे चित्रीकरण असेल तर अनेकदा व्यायाम करणं शक्य होत नाही. अशा ठिकाणी कित्येकदा चित्रीकरणाच्या जागी लाइट्स हलू नयेत म्हणून त्यांच्या जवळ आधारासाठी सॅन्ड बॅग ठेवल्या जातात. त्याच सॅन्ड बॅगचा वापर करून शरीरातील अवयवांची हालचाल करून ते मोकळे करत असल्याचे पीयूष सांगतो. व्यायामासाठी आवश्यक असलेले वजन म्हणून डंबेल्सऐवजी सहज या सॅन्ड बॅगचाही वापर करता येतो. अशा पद्धतीने फ्री हॅन्ड एक्सरसाइजची सवय ठेवली तर फिटनेस सांभाळणे फारसे अवघड होत नाही, असे पीयूष विश्वासाने सांगतो.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 12:06 am

Web Title: piyush ranade
Next Stories
1 आरोग्यक्षेत्रातील सहकारी
2 जरा खोलात जाऊ..
3 ओळख न्यू यॉर्क फॅशन वीकची!
Just Now!
X