सगळ्या कॉलेजेस मध्ये साजरया होणारया कल्चरल फेस्ट वर वेगळा ठरलाय तो नुकताच पोदार महाविद्यालयात पार पडलेला इकॉनॉमिक आणि फाईनन्शियल फेस्टिवल ‘मोनेटा’. ह्या फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं की ह्यात प्रत्यक्षात एनएसई द्वारे स्पॉन्सरशिप मिळालेली असते, आणि बाहेरच्या व्यवहारी जगात लीलया चालू असणारे शेअर मार्केटचे खेळ ह्या फेस्टिवल मध्ये कॉलेजियन्सना खेळता येतात. म्हणजे त्यांच्या भविष्यातल्या करियरबद्दलचं थोडंसं व्यवहारी ज्ञान त्यांना त्या खेळाद्वारे मिळतं. ह्याशिवाय इकॉनॉमिक आणि फाईनन्शियल वर्तमानपत्र कशी वाचावीत, गुंतवणुकीसंबंधीचे काही तंत्र, शेअर मार्केटचे काही फंडे, आणि ह्याशिवाय अनेक दिग्गज तज्ज्ञांची उपस्थिती हे ह्या फेस्टिवलचं वेगळेपण. ह्यावर्षी नरेंद्र जाधव ह्यांच्या अनुभवांचा देखील आस्वाद पोदाराईट्सना अनुभवायला मिळाला. एकूणच व्यवहारी जगात चालत असणाऱ्या गोष्टींच्या समावेशामुळे फाईनान्स जगतात करियर करू इच्छिणारयांसाठी मोनेटा फेस्टिवल नक्कीच एक प्रगल्भ मार्गदर्शक ठरलाय.
संकलन : अमित महाजन, अनघा पाटील