12 August 2020

News Flash

जिंकणं आणि कल्पनाविष्कार

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे?

| August 28, 2015 01:10 am

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
योऽऽऽ मुंबाऽऽऽ
‘ले पंगा, ले पंगा..’ म्हणत सुरू झालेल्या ‘प्रो कबड्डी लीग २०१५’च्या अंतिम सामन्यात विजयी संघ ठरला तो ‘यु मुंबा’चा. या संघावर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून आभिनंदनाचा वर्षांव केला. यू मुंबाच्या संघासह प्रो कबड्डी लीगमध्ये सहभागी झालेल्या सर्व कबड्डीपटूंचं अभिनंदन! महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डी हा खेळ. प्रो कबड्डी लीगमुळं कबड्डी या खेळाला प्रसिद्धी मिळाली असून महाराष्ट्राची मान उंचावली आहे, अशा अर्थाचे मेसेजेस शेअर केले जात होते. ‘ऑसम प्लेड बाय यू मुंबा’. किंवा ‘टीम यू मुंबा फायनली ले पंगा. चिअर्स कॅप्टन कुल अनुपकुमार. यू रॉक्स.’ किंवा ‘एक्सायटिंग मॅच. डिफेन्स अमेझिंग नि टेक्निकली सुपर्ब गेम’, असं म्हणत या चाहत्यांनी प्रतिस्पर्धी संघ बंगळुरू बुल्सच्या संघाचंही कौतुक केलेलं दिसलं. #फायनल पंगा, #प्रो कबड्डी लीग फायनल या हॅशटॅग ट्रेण्ड टॉपमध्ये होता.
वाह उसेन वाह..
‘स्पीड किंग’ उसेन बोल्टनं जागतिक मैदानी स्पर्धेत १०० मीटरच्या शर्यतीत पुन्हा एकदा आपण स्पीड किंग अर्थात सर्वात वेगवान धावपटू असल्याचं सिद्ध केलंय. ९.७९ सेकंदांची वेळ नोंदवत त्यानं अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिनचं आव्हान लीलया पेललं. त्याच्या या कामगिरीची सोशल मीडियावर तितक्याच वेगानं दखल घेण्यात आली नि त्याच्या अभिनंदाच्या पोस्ट शेअर केल्या गेल्या. ट्विटरसह सगळीकडं #उसेन बोल्ट हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डवर होता.
मी येतोय..
‘पासपोर्ट नि तिकीट रेडी.. लॅण्डिंग ऑन १७ सप्टेंबर.’ एवढीच माहिती नि सोबत पासपोर्ट नि तिकिटाचा नमुना असणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा ‘मी’ दुसरा-तिसरा कुणी नसून तो आहे आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा. कंट्री कोडपासून ते जन्मस्थानापर्यंत नि फॅमिलीच्या माहितीपासून ते फाइलनेमपर्यंतचे बाप्पाचे सगळे डिटेल्स यात दिलेत. ही नामी शक्कल लढवणाऱ्या अनामिकाला नेटकरांनी हे फोटो भरभरून शेअर करत दाद दिली.
नया हैं यह.. की अँण्ड का
अमिताभ बच्चन, जया बच्चन नि अर्जुन कपूरचा फोटो शेअर केला गेला नि सोशल मीडियावर ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. ‘आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात मी आणि जया पाहुणे कलाकार आहोत,’ असं अमिताभ यांनी ट्विट केलंय. तब्बल १४ वर्षांनी अमिताभ-जयाची जोडी एकत्र काम करणारेय. त्यामुळं त्यांच्या याआधीच्या चित्रपटांच्या आठवणी जागवत चाहत्यांनी या आगमी चित्रपटाविषयी आपली उत्सुकता शेअर केली.
पुली
बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘बाहुबली’पाठोपाठ सोशल मीडियावर चर्चा रंगलेय ती ‘पुली’ची. त्याचा टीझर लॉन्च झालाय. अ‍ॅक्शन नि फॅण्टसीचं कॉम्बिनेशन असणाऱ्या या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय आहे. शिवाय श्रीदेवी एका वेगळ्याच लुकमध्ये दिसतेय. बाहुबलीसारखे स्पेशल इफेक्ट्स यात असतील असं चिन्हं दिसताहेत.
रक्षाबंधनाची धूम इन अ‍ॅडव्हान्स
vn13नेटकरांना सगळ्या गोष्टी कशा सुपरफास्ट नि कल्पकतेनं करायची सवय असते. त्यामुळं काही हौशी नेटकरांनी रक्षाबंधनानिमित्तच्या गोष्टी ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर शेअर करायला केव्हाचीच सुरुवात केलीय. रक्षाबंधनाच्या माहितीपासून सुरू होणारे हे मेसेजेस रक्षाबंधनाच्या निमित्तानं काढायच्या मेंदीच्या डिझाईनपर्यंत येऊन थांबतात. तरुणाईत टॅटूजइतकंच महत्त्व मेंदीला दिलं जातं, हे लक्षात घेऊन रक्षाबंधनाच्या सणाचंच प्रतिबिंब असणारा हा मेंदीचा फोटो सध्या व्हायरल होतोय.
तलवार
दिल्लीत घडलेल्या आरुषी हत्या प्रकरणावर आधारित ‘तलवार’चं पोस्टर रिलीज ट्विटरवर करण्यात आलं. कोंकणा सेननं हे पोस्टर ट्विटरवर शेअर केलं असून मेघना गुलजार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. कोंकणा सेन-शर्मा, इरफान खान नि तब्बू यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
वेडिंग पुलाव
‘वेडिंग पुलाव’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आलिया भट आवर्जून उपस्थित होती. आलियाची बालमैत्रिण अनुष्का रंजन या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून तिच्यासोबत दिगंत मनचलची भूमिका आहे. बिग बी अमिताभनी या जोडीला प्रोत्साहन नि शुभेच्छा देणारं ट्विट केलंय.
लग्नाची बेडी
सध्या भारतीय क्रिकेटपटूंच्या हातात लग्नाची बेडी पडण्याची साथ आलेय बहुधा. एकापाठोपाठ एक क्रिकेटपटूंचे विवाह होण्याच्या या मंगल प्रसंगांत आता विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या लग्नाची भर पडलेय. स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलशी त्याची लगीनगाठ बांधली गेलेय. या हिंदू-ख्रिश्चन धर्मानुसार झालेल्या दोन विवाहसोहळ्यांची, कार्तिकच्या या दुसऱ्या लग्नाची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये झाल्यानं हा टॉपिक ट्रेण्डमध्ये होता. दिनेशच्या विवाहापाठोपाठ आता बॉलर हरभजनसिंगच्या लग्नाची चर्चा सुरू झालेय. गीता बस्त्रने भज्जीपाजीला क्लीन बोल्ड केलं असून त्याचं लग्न ऑक्टोबरमध्ये होईल, अशी बातमी आहे. त्यामुळं सोशल मीडियावरील क्रिकेटप्रेमीच्या चर्चेला आणखी एक विषय मिळालाय, ‘दुसरा’ काय?
आलिया नि गौरी
vn12एरवी सोशल मीडियाकरांच्या जोक्सचा विषय ठरणारी आलिया भट पुन्हा एकदा चर्चेत आली ती गौरी शिंदेमुळं. गौरीच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान आणि आलिया भूमिका करणार आहेत. ‘ट्विटर’वर या संदर्भात उलटसुलट चर्चा झाल्यानं #आलिया भट आणि #गौरी शिंदे हे टॉपिक ट्रेण्डमध्ये होते.
दिल से रे..
आजही भुरळ घालणाऱ्या ‘चल छय्या छय्या’पासून ते ‘दिल से रे’ पर्यंत दिलों-दिमागपर छा जानेवाले गाने, ए. आर. रहमानचं सूरमयी संगीत नि शाहरुख खान, मनीषा कोईराला, प्रीती झिंटा यांचा सशक्त अभिनय आणि मणिरत्नम यांचं दिग्दर्शन यामुळं ‘दिल से’ हा चित्रपट सुपरडुपर हीट ठरला होता. त्याही गोष्टीला सतरा र्वष झाल्याच्या निमत्तानं ‘ट्विटर’वर या चित्रपटाच्या आठवणी, किस्से-कहाण्या जागवल्या गेल्या. गाणी-फोटोज नि संवाद अपलोड केले गेले.
vn11डान्स अ‍ॅण्ड ज्वेलरी
एरवी नृत्य आणि दागिन्यांचा संबंध असतो तो नृत्यप्रकार सादर करताना वेशभूषेसह घालण्याइतका. पण डान्स अ‍ॅण्ड ज्वेलरीचं एक वेगळंच इमॅजिनेशन आपल्या समोर आलं तर.. वेगवेगळ्या नृत्यशैली आणि त्यातील हावभावांनुसार त्यांना दिलेली दागिन्यांची जोड ही कल्पना ‘व्हॉट्स अ‍ॅप’करांना फारच नामी वाटली नि हे फोटो मोठय़ा कौतुकानं शेअर केले गेले.
राधिका कुंटे- viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2015 1:10 am

Web Title: popular news on social media
Next Stories
1 आम्ही सहय़ाद्रीच्या लेकी!
2 उंची पसंद
3 हटके साडी ड्रेपिंग
Just Now!
X