open-upतरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.

मला सध्या इंटरनेटची फार सवय लागली आहे. त्यातही त्यावरच्या काही साइट्स बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही. मित्राच्या सांगण्यावरून पहिल्यांदा मी व्हिजिट केलं आणि आता रोज बघतो. मी असं ऐकलंय की, जवळजवळ सगळेच या साइट्स पाहतात. माझे आई-वडील नोकरी करतात, त्यामुळे मला लहानपणापासून घरीर एकटं राहायची, टीव्ही, कॉम्प्युटरवर वेळ घालवायची सवय आहे. माझ्या वडिलांनी एकदा पाहिलं आणि ते माझ्यावर चांगलेच भडकले, पण मला असं वाटलं की, मी माझ्या फावल्या वेळेत काय बघावं हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना कळणार नाही, अशा बेतानं मी बघतो.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

मला तुम्हाला असं विचारायचंय की यात काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे त्याचा काही साइड इफेक्ट तर होत नाही ना? कारण कधी कधी मला शंका येते आणि हे अॅडिक्शन आहे का? मी थांबवायला हवंय का हे? असेल तर कसं?- मनोज
हॅलो मनोज,
मला वाटतं, ‘सगळे जण पोर्नोग्राफी बघतात’ हेही तुला इंटरनेटवर सर्च मारल्यावरच कळलं असेल. आपण जे करतोय ते नॉर्मल आहे की, अॅबनॉर्मल हे शोधायचा तू प्रयत्न केलास हे चांगलंच झालं. तुझी माहिती अगदी खरी आहे. ‘सेक्स’ हा नेटवर सगळ्यात जास्त सर्च केलेला शब्द आहे असं प्रूव्ह झालेलं आहे आणि या साइट्स बघणाऱ्यांचं प्रमाण झपाटय़ानं वाढतंय. सध्या आपण ज्या इलेक्ट्रॉनिक रिव्होल्युशनमधून जातोय त्याच्या निरनिराळ्या इफेक्ट्सपैकी हा एक. तुझं म्हणणं हे सगळं हार्मलेस असेल तर काय हरकत आहे? हे हार्मलेस नक्की नाही. पोर्नोग्राफीचे अतिशय गंभीर परिणाम आपल्यावर, आपल्या रिलेशनशिप्सवर होतात असं सिद्ध झालंय. इन फॅक्ट डिव्होर्सचं एक महत्त्वाचं कारण ठरतंय हे. स्त्री-पुरुषांमधल्या फिजिकल रिलेशन्सच्या कल्पना यामुळे पूर्णत: बदलतायत, मुख्यत: पुरुषांच्या. या साइट्सवर जे संबंध दाखविले जातात, ते साधे सरळ नक्कीच नसतात. नेहमीच्या रूटीन गोष्टी दाखविल्या तर कुणी बघेल तरी का? त्यामुळे काही तरी सनसनाटी, स्पाइस्ड-अप असंच दाखवावं लागतं त्यांना. बघणारे मात्र हेच नॉर्मल आहे असं धरून बसतात. स्त्री-पुरुषांच्या शरीराविषयीही भलत्याच कल्पना बनतात आणि प्रत्यक्ष पार्टनरला पाहिल्यावर भ्रमनिरास होतो, कारण यातच दाखवलेली शरीरं एअरब्रश केलेली असल्यामुळे चित्रातल्यासारखी परफेक्ट दिसतात. या फिल्म्समध्ये स्त्रीचं शरीर अतिशय हीनपणे आणि एखादं खेळणं असल्यासारखं वापरलं जातं. प्रत्यक्षातले संबंध याहून किती तरी हळुवार आणि फक्त शारीरिक नव्हे तर इमोशनलही असतात.
तुझा शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुला असं का वाटू लागलं की, हे अॅडिक्शन आहे का? काही गोष्टी पडताळून पाहिल्यास तर तुझं तुलाच ते लक्षात येईल. तुम्ही किती वेळ यावर घालविता याचं काही ठरावीक माप नाही याला अॅडिक्शन म्हणायला. जर तुझ्या मनात सतत हेच विचार येत असतील, कॉम्प्युटरवर बसलेला नसतानाही तू आता काय बघायचं असं प्लॅन करीत असशील, कॉम्प्युटर ओपन केल्याकेल्या तू पहिल्यांदा या साइट्सवर जात असशील, त्याशिवाय तुला चैन पडत नसेल आणि त्यामुळे तुझ्या नॉर्मल डेली रूटीनवर परिणाम होत असेल तर तू पोर्नोग्राफीला अॅडिक्ट झाला आहेस असं म्हणता येईल.
या चेकलिस्टवरून तू अॅडिक्ट झाला आहेस का हे कन्फर्म कर. तसं असेल तर यातून बाहेर पडण्यासाठी काही स्टेप्स घ्यायला सुरुवात करायला हवी. या साइट्स बघणं वडिलांना आवडत नाही किंवा हे समाजमान्य नाही अशा काही कारणांनी बघणं बंद करण्यापेक्षा यामुळे तुझ्या रूटीनवर आणि मनावर त्याचा कितपत परिणाम होतोय याचा अंदाज घे. चक्क कागद-पेन्सिल घेऊन लिहून काढ की, तू दिवसातले किती तास यात घालवतोस, तुझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना भेटणं खूप कमी झालंय का, तुझा आहार, व्यायाम व्यवस्थित चालू आहे का, बायको, लग्न यावरचे तुझे विचार बदलले आहेत का, इ. नेटचा अॅक्सेस सहजपणे मिळणार नाही, अशी तजवीज कर.
एकटय़ानं करण्यापेक्षा शक्यतो इतरांच्या समोर तुझी नेटवरची कामं कर. पॉर्न ब्लॉकरसारखी काही गॅजेट्स इन्स्टॉल करता आली तर बघ. दुरावलेल्या मित्रमैत्रिणीशी पुन्हा कॉन्टॅक्ट कर. व्यायाम, हॉबीज, काम, अभ्यास यात गुंतवून घे. हे सगळं केल्यानंतर तुझ्या लक्षात येईल आपला किती ताबा घेतला होता पोर्नोग्राफीनं ते.

Freedom is not procured by a full enjoyment of what is desired but controlling the desire.