कुठल्याही रेस्तरॉमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल.

हॉट पिनट चिकन
साहित्य : बोनलेस चिकन तुकडे – २०० ग्रॅम, बारीक चिरलेलं आलं, लसूण – २ ते ३ चमचे, शेंगदाणा भरड कुट (भाजून घेऊन), चिरलेली हिरवी मिरची – १ चमचा, कापलेली रंगीत सिमला मिरची, रेड चिली सॉस, कांदा, अख्खी लाल काश्मिरी मिरची, पिनट बटर – ३ चमचे, कॉर्नफ्लॉवर, मदा – २ चमचे, अंडं – १, मीठ – चवीनुसार, साखर – चिमूटभर, व्हाइट पेपर पावडर – चिमूटभर, सिझनिंग क्युबस् – २, तळण्यासाठी तेल – १ लिटर
कृती : एका बाऊलमध्ये चिकन, अंडं, सिझनिंग क्युबस्, मीठ, व्हाइट पेपर, साखर, चिली सॉस, कॉर्नफ्लॉवर, मदा टाकून एकत्र मिक्स करून घ्या. नंतर हे चिकन गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्या. एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, काश्मिरी मिरची, बटर पिनट आणि पाच ते सहा चमचे पाणी टाका. थोडं मीठ आणि व्हाइट पेपर टाका. तयार मिश्रणाला एक उकळी द्या. आता या मिश्रणामध्ये तळलेले चिकनचे तुकडे टाका कॉर्नफ्लॉवर टाकून नीट टॉस करून घ्या. आता भरड शेंगदाणा कूट टाकून गरमागरम सव्‍‌र्ह करा.

मशरुम चिली स्प्रिंग ओनियन
साहित्य : मशरुम (एका मशरुमचे चार भाग करून) – १ बाऊल, बारीक चिरलेले लसूण – २ चमचे, लांब चिरलेले आले – १ चमचा, चिरलेली हिरवी मिरची – १ चमचा, सोया सॉस – २ चमचे, बारीक चिरलेली कांदापात, मीठ – चवीनुसार, साखर – चिमूटभर, व्हाइट पेपर पावडर – चिमूटभर, तेल – २ ते ३ चमचे
कृती : एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची परतून घ्या. नंतर सोया सॉस, मीठ, व्हाइट पेपर, साखर टाका. नंतर त्यामध्ये मशरुमचे तुकडे टाकून मोठय़ा आचेवर टॉस करून घ्या. वरून चिरलेला पातीचा कांदा टाकून नीट टॉस करून गरमागरम सव्‍‌र्ह करा.

थ्रेड प्रॉन्स
साहित्य : किंग प्रॉन्स  – ५ नग, अंडं – १, बॉइल नुडल्स, सिझनिंग क्युबस् – २, रेड चिली सॉस – ३ टीस्पून, कॉर्नफ्लॉवर – ३ ते ४ चमचे, मीठ – चवीनुसार, साखर – चिमूटभर, व्हाइट पेपर पावडर – चिमूटभर, बांबू स्टिकस् – ५ नग, तळण्यासाठी तेल – १ लिटर.
कृती : एका बाऊलमध्ये अंडं, सिझनिंग क्युबस्, मीठ, व्हाइट पेपर, साखर, चिली सॉस कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर बांबू स्टिक्समध्ये प्रॉन्स खोचून घ्या व वर दिलेल्या मिश्रणामध्ये प्रॉन्स घोळवून घ्या.
आता लांब नुडल्स दोऱ्याप्रमाणे प्रॉन्स स्टिक्स वर गुंडाळून घ्या. आता या प्रॉन्स स्टिक्स तेलामध्ये डीप फ्राय करा. सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.

नटी टोस्टस्
साहित्य : ब्रेड  – २ नग, उकडलेले बटाटे – ३, काजूचे तुकडे, बारीक चिरलेलं आलं – १ चमचा, चिरलेले लसूण – १ चमचा, चिरलेली हिरवी मिरची – १ चमचा, कांदा पात, रेड चिली सॉस – १ चमचा, कॉर्नफ्लॉवर – २ चमचे, मैदा – १ चमचा, मीठ – चवीनुसार, साखर – चिमूटभर, व्हाइट पेपर पावडर – चिमूटभर, तळण्यासाठी तेल – १ लिटर, चिरलेली कोथिंबीर – २ चमचे.  
कृती : एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या. त्यामध्ये आलं, लसूण, कांदापात, कॉर्नफ्लॉवर, मैदा, साखर, व्हाइट पेपर पावडर, रेड चिली सॉस, मीठ, चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घ्या. मिश्रण ब्रेडला लावून त्यावर काजू तुकडे लावा. नंतर हे ब्रेड डीप फ्राय करून त्याचे चार तुकडे करून सॉससोबत गरमागरम सव्‍‌र्ह करा.