News Flash

डिझायनर मंत्रा : रिसायकलचीराणी

गेल्या २९ वर्षांपासून टेक्स्टाइल आणि फॅशनडिझायनर म्हणून काम करणाऱ्या भवानी पारीख या आता ‘बंकोजंको’ ब्रॅण्डच्या ओनर आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

भवानी पारीख

तेजश्री गायकवाड

‘द इंडियन वुमेन एक्सेलन्स अ‍ॅण्ड लीडरशिप २०१९’, ‘मिस क्लायमेट क्रूझर २०१९’, ‘भारतीय महिला उत्कृष्टता आणि नेतृत्व २०१९’, ‘इनोवेशन फॅ शन डिझायनर ऑफ द इअर २०१९’, ‘हस्ताक्षर इनोवेशन डिझायनर २०१९’, ‘वॉक फॉर कॉझ अ‍ॅवॉर्ड’, ‘प्रॉडक्ट ऑफ द मन्थ’ असे अनेक पुरस्कार यंदाच्या वर्षी आपल्या नावे करणारी ही अनोखी फॅ शन डिझायनर. आपल्या कामातूनच पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणारी आणि फॅ शनइंडस्ट्रीमध्ये सध्या ‘रिसायकलची राणी’ म्हणून मानाने मिरवणारी फॅशनडिझायनर म्हणजे भवानी पारीख.

गेल्या २९ वर्षांपासून टेक्स्टाइल आणि फॅशनडिझायनर म्हणून काम करणाऱ्या भवानी पारीख या आता ‘बंकोजंको’ ब्रॅण्डच्या ओनर आहेत. फॅशन डिझायनिंग क्षेत्रातीलत्यांच्या या २९ वर्षांच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना त्या म्हणतात, ‘‘१९८७ साली मी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या होम आणि रिसोर्स मॅनेजमेंट ग्रॅज्युएटच्या ‘एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्स’मधून पदवी शिक्षण घेतलं, पण त्यानंतर मी लगेच या क्षेत्राकडे वळले नाही. १९९१ पासून मी कामाला सुरुवात केली.’’ भवानी पारीख यांच्या कारकीर्दीची सुरुवातच मुळी वेगळ्या क्षेत्रांतून झाली. पहिले मी खेळण्यांची लायब्ररी, स्वयंपाक वर्ग आणि शिक्षण वर्ग सुरू केले. नॅपकिन फॉलिंग, आइस्क्रीमच्या स्टिकपासून वस्तू किंवा त्यापासून बनवल्या जाणाऱ्या इतर  गोष्टी बनवतही होते आणि अशाच अनेक क्रिएटिव्ह विषयावर टीव्हीवर ‘घेर बेठा’सारखे गुजराती कार्यक्रमही मी केले. या सगळ्या गोष्टी सुरू होत्याच, पण सतत सर्जनशील काही तरी करण्याची इच्छा माझा मनात होती, त्यातून खऱ्या अर्थाने मी टेक्स्टाइलमध्ये पाऊल ठेवलं, असं त्या सांगतात.

टेक्सटाइल सरफेस ऑरनमेन्टेशन, लीला लेस, टेक्सपोर्ट सिंडिकेट, ट्रायकमदास अँड ब्रोस, शागुफाटा वस्त्र, विरा एंटरप्रायझेस, शॉपर्स स्टॉप आणि डिझाईन इत्यादी ब्रँडसाठी मी पहिल्यांदा भरतकाम सुरू केलं. हे काम करताना मी १००० महिलांना काम मिळवून दिलं. त्यांना शिकवलं, असं त्यांनी सांगितलं. एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीलाही काम मिळावं. त्यांनी कधीही मागे राहू नये हा विचार कायम मनात ठेवून भवानी पारीख आजवर काम करत आहेत. फॅशन इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीने डिझायनिंगमध्ये न शिरता कारीगरीवर भर देत अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला, पण तो ब्रॅण्ड सुरू करण्यामागेही काही कारण होतं, असं त्या म्हणतात. ‘‘टेक्स्टाइलच्या रोजच्या उत्पादनामुळे दर वर्षी कचऱ्याची वाढ होते आहे. आर्थिक आणि पर्यावरणात्मक कारणांमुळे पुन:पुन्हा तेच कपडे वापरणे किंवा कपडे रिसायकल करण्याची काही एक प्रक्रिया असणं गरजेचं आहे, हे लक्षात आल्याचं त्यांनी सांगितलं. फॅ शनइंडस्ट्रीतील या सर्वात मोठय़ा समस्येविरुद्ध लढणं हे माझं ध्येय आहे. मी माझी स्वत:ची क्लोदिंग लाइन सुरू केली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, किती तरी पटीने टेक्स्टाइल वेस्ट निर्माण होत आहे. या वापरल्या न जाणाऱ्या कापडापासूनच काही तरी करायलाच हवं हे मनाने घेतलं आणि तिथूनच ‘बंकोजंको’ या ब्रॅण्डची सुरुवात झाली,’’ असं त्या म्हणतात.

टेक्स्टाइल ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची प्रदूषण करणारी इंडस्ट्री आहे, परंतु आपणच आपल्यापरीने प्रयत्न केले तर पर्यावरणाला होणारा त्रास थोडा तरी निश्चितच कमी होऊ  शकतो. आपल्याकडे फक्त एकच ग्रह आहे आणि त्याला अजून चांगलं कसं बनवता येईल हे आपल्याच हातात आहे, असं त्या म्हणतात. उरलेल्या, न वापरात आलेल्या कपडय़ापासून आम्ही प्रॉडक्ट्स बनवतो. त्यामुळे सोशल आणि आर्थिक दोन्ही समीकरणं साधली जातात, असं त्यांनी सांगितलं. भवानी पारीख यांचा ‘बंकोजंको’ हा ब्रॅण्ड वेस्ट असलेल्या कापडापासून ड्रेस, कुर्ता, फॅ शन अ‍ॅक्सेसरीज, बॉटम्स, शर्ट, दुपट्टा अशा अनेक गोष्टी तयार करतो. आयबीआय मुंबईच्या ३० महिला उद्योजकांना ट्रेनिंग देण्यासाठी, अनेक महिला उद्योजिकांच्या प्रोग्रॅमसाठी, कॉलेजेसमध्ये आयसीटी (रासायनिक तंत्रज्ञान संस्थान) एमसीसाठी प्रीसोज्यूम टेक्स्टाइल कचऱ्यावरील भाषणासाठी त्यांना नेहमीच बोलावलं जातं. नागपूरमधील व्हीएनआयआयटी (विश्वेश्वर राष्ट्रीय संस्था तंत्रज्ञान) यांनी ‘स्टार्टअप कॉन्क्लेव्ह कॉन्सेरटियम २०१८’मधील टॉप ५० स्त्रियांची निवड केली होती, त्यातही भवानी पारीख यांचा समावेश होता.

इतकी वर्ष या फॅशनइंडस्ट्रीमध्ये काम के ल्यानंतर अनुभव आणि ज्ञानाची भलीमोठी शिदोरी त्यांच्याकडे जमा झाली आहे, यात शंका नाही. त्यांच्या आजवरच्या प्रवासात फॅ शन क्षेत्रातील बदल अनुभवलेल्या भवानी म्हणतात, या प्रवासात दररोज नवीन कल्पना, नवीन मार्ग, आव्हानात्मकता होतीच आणि पुढेही असणारच आहे; परंतु मी या आव्हानाला आजही विसरले नाही. इतकी वर्ष मी समोर येणाऱ्या प्रत्येक  आव्हानाच्या अगदी मुळाशी गेले आणि कधीही त्यातून काहीच साध्य न करता परत आले असं झालेलं नाही. फॅ शनडिझायनर म्हणून अनेक डिझायनर्सचा कामाचा एक आवडता भाग असतो त्याबद्दल त्या सांगतात. ‘‘डिझायनर म्हणून मी पर्यावरण सर्जनशीलता आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने काम करून माझे स्वप्न आणि माझी उत्कट इच्छा पूर्ण करते आहे. हाच माझा कामाचा डिझायनर म्हणून आवडता भाग आहे. या क्षेत्रात येणाऱ्यांना त्या सर्वोत्तम काम करण्याचं धाडस करा, असं जाणीवपूर्वक  सांगतात. सर्जनशील स्वप्नं पाहा, कठोर परिश्रम करा आणि एखाद्या सामाजिक किंवा अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करा, असा कानमंत्रही त्यांनी या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांना दिला.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 1:19 am

Web Title: recycle product bhavani parikh fashion abn 97
Next Stories
1 योगा‘योग’
2 फॅशन इनिंग
3 सर्जनशील वाट
Just Now!
X