06 July 2020

News Flash

‘ग्लॅमर गर्ल’शी बातचीत

मराठी चित्रपटसृष्टीचा ग्लॅमर कोशंट वाढवणारी अभिनेत्री म्हणून नि:संशय जिचं नाव घेता येईल अशा सई ताम्हणकरशी थेट गप्पा मारण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाउंज’मधून मिळणार आहे.

| February 27, 2015 02:01 am

व्हिवा लाउंजमध्ये सई ताम्हणकर
मराठी चित्रपटसृष्टीचा ग्लॅमर कोशंट वाढवणारी अभिनेत्री म्हणून नि:संशय जिचं नाव घेता येईल अशा सई ताम्हणकरशी थेट गप्पा मारण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाउंज’मधून मिळणार आहे. व्हिवा लाउंजमधून आतापर्यंत विविध क्षेत्रांत धडाडीनं काम करणाऱ्या महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी स्त्रिया वाचकांना भेटल्या आहेत. लाउंजच्या या नव्या पर्वात मराठी चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकरला आमंत्रित करण्यात आलं आहे.
सईच्या चित्रपटांनी गेल्या काही वर्षांत बॉक्स ऑफिसवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. कुठलाही हिट मराठी चित्रपट तिच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही की काय, असा प्रश्न पडावा एवढी ती यशस्वी आहे. तिचा आत्मविश्वास, तिची स्टाइल, तिची फॅशन तरुणाईला भुरळ घालते. हल्लीच्या प्रत्येक मराठी निर्मात्याला आपल्या चित्रपटात सई ताम्हणकर हवी असते, कारण सई म्हणजे बॉक्स ऑफिसवरचं यश हे गणित गेल्या काही वर्षांत जमून गेलेलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील खूप कमी अभिनेत्रींना त्यांच्या फॅशन आणि स्टाइलसाठी नावाजलं गेलंय. सई ताम्हणकर याला अपवाद आहे. तिची ग्लॅमरस ओळख मराठी चित्रपटसृष्टीच्या बाहेरही पोचली आहे. म्हणूनच आघाडीचा फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे सईला त्याच्या डिझाइन्सची प्रेरणा मानतो.
या नव्या जमान्याच्या, बेधडक आणि ग्लॅमरस अभिनेत्रीला भेटायची, तिच्याशी संवाद साधायची संधी येत्या मंगळवारी व्हिवा लाउंजच्या माध्यमातून मिळणार आहे.  केसरी प्रस्तुत व्हिवा लाउंज हा कार्यक्रम दिशा डायरेक्टच्या सहकार्यानं होत असून झी २४ तास या वृत्तवाहिनीवर कार्यक्रमाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका आजपासून सावरकर स्मारक सभागृहात उपलब्ध आहेत.

कधी : मंगळवार, ३ मार्च
कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प)
वेळ : दुपारी ३.३०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 2:01 am

Web Title: sai tamhankar in viva lounge 2
Next Stories
1 ‘कॉलेज गेट’मागची गोष्ट
2 पुस्तक नव्हे – ‘मोबाईल अ‍ॅप’
3 तरुण पिढी मराठी वाचते?
Just Now!
X