News Flash

‘व्हिवा लाऊंज’मध्ये सौम्या स्वामीनाथन

बुद्धिचा कल लागणाऱ्या बुद्धिबळ खेळात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्हिवा लाऊंजमध्ये महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथन हिला बोलावण्यात आले आहे.

| April 19, 2013 01:07 am

‘व्हिवा लाऊंज’मध्ये सौम्या स्वामीनाथन

बुद्धिचा कल लागणाऱ्या बुद्धिबळ खेळात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्हिवा लाऊंजमध्ये महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथन हिला बोलावण्यात आले आहे.
वयाच्या १९व्या वर्षी ग्रँडमास्टर किताबाला गवसणी घालणाऱ्या सौम्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदांवर नाव कोरले आहे. अर्जेटिना येथे नोव्हेंबर २००९मध्ये झालेल्या जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेवर मोहोर उमटवून सौम्याने आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली होती. २०११मध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावल्यानंतर अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या गटात अजिंक्यपद पटकावण्याचा मान तिने मिळवला होता. जागतिक सांघिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व करताना कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तिची कारकीर्द, ग्रँडमास्टर किताबापर्यंतचा प्रवास, परदेशी खेळाडूंविरुद्ध खेळताना आलेले अनुभव ती कथन करणार आहे. या कार्यक्रमात तिच्याशी संवाद साधणार आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
तारीख : २२ एप्रिल २०१३
वेळ : दुपारी ३. ३०
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,
२५२, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प)   
प्रवेश सर्वासाठी खुला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2013 1:07 am

Web Title: saumya swaminathan in viva lounge
टॅग : Chess,Viva Lounge
Next Stories
1 बुक शेल्फ : स्त्री-पुरुष सुसंवादासाठी…
2 मिकीज् फिटनेस फंडा : आहाराबद्दलचे वास्तव आणि गैरसमज
3 विष्णूज् मेन्यू कार्ड : ग्रीन ग्रेव्ही
Just Now!
X