02 June 2020

News Flash

फिट-नट

डेली सोपचं चित्रीकरण असल्याने दिवसभर शूटिंगमध्येच किंबहुना सेटवरच जास्त वेळ जातो.

|| प्रियांका वाघुले

 जाच करणाऱ्या सासूची गोष्ट खरं तर इतकी जुनी झाली आहे की, सध्या मालिकांमध्ये त्यांची जागा चक्क जाऊ बाईंनी घेतली आहे. सध्या मराठी मालिकांमधून तरी या कडक जाऊबाई जोरात आहेत. अशीच कडक, आपल्या भूमिकेला पुरेपूर न्याय देत त्यात उतरू पाहणारी ‘तुझ्यात जीव रंगला’मधील अंजलीची जाऊ बाई म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या लोकप्रिय ठरली आहे. भूमिकेसाठीचा हा आवश्यक असलेला कडकपणा पुरेपूर उतरवायचा तर त्यासाठी आपल्या फिटनेसकडेदेखील तितक्याच कडकपणे लक्ष केंद्रित करावं लागतं आहे, असं धनश्री स्पष्ट करते.

या मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने सध्या कोल्हापुरात काही काळापुरती शिफ्ट झालेली धनश्री मुळातच फिटनेसप्रेमी आहे. त्यामुळे तिथंदेखील फिट राहण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत असल्याचं सांगते.

पुण्यात असताना फिटनेससाठी वेगवेगळ्या पद्धतीचा आपण अवलंब करत होतो, अशी माहिती तिने दिली. इकडे कोल्हापूरमध्ये मात्र त्यासाठी पूर्णपणे जिमवरच लक्ष केंद्रित केलं असल्याची माहिती तिने दिली.

डेली सोपचं चित्रीकरण असल्याने दिवसभर शूटिंगमध्येच किंबहुना सेटवरच जास्त वेळ जातो. त्यामुळे सेटवर असताना उगीचच काही तरी खात राहण्यापेक्षा स्वत:च्या जिभेवर ताबा ठेवणं गरजेचं असतं. खरं तर प्रत्येकानेच जिभेवर ताबा मिळवला पाहिजे. कारण आज आपण कसे आहोत, यापेक्षा आपल्या आजच्या जीवनपद्धतीचा परिणाम आपल्या उद्याच्या जीवनावर होणार असल्याने त्याची काळजी आतापासून करणं प्रत्येकाला जमलंच पाहिजे, असं ती आग्रहाने सांगते.

धनश्री जिममध्ये नियमितपणे व्यायाम करते. व्यायाम करताना एक दिवस कार्डिओ ज्यामध्ये सायकलिंग, रनिंग, दोरीच्या उडय़ा तर एक दिवस बायसेप- ट्रायसेप तर एक दिवस पूर्णपणे लेग्ससाठी व्यायाम करत असल्याची माहिती धनश्रीने दिली.

रोजचा व्यायाम करताना त्यात साधारण कमीत कमी १५ ते २० मिनिटे सायकलिंग, तेवढंच रनिंग करण्यावर ती भर देते. याशिवाय, वजन आणि आपली क्षमता यानुसार प्रत्येक प्रकाराचे किती सेट करायचे हे ठरवू त्याप्रमाणे ती करते. सेट पूर्ण तर झाले पाहिजेतच, मात्र ते बरोबर पद्धतीने होत आहेत की नाही, याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं तिने सांगितलं.

आपल्या शरीराला आवश्यक असेल तितकाच व्यायाम करावा असं ती म्हणते. कोण, किती आणि कसं व्यायम करतं, याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या शरीराची गरज काय, हे समजून घेऊन त्या पद्धतीनेच व्यायाम केला पाहिजे. आपल्या विचारानेच आपला फिटनेस आखला पाहिजे, असेही धनश्रीने सांगितलं.

 ||धनश्री काडगावकर viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 3:14 am

Web Title: serial shooting tuzyat jiv rangala akp 94
Next Stories
1 ‘बेक’गुरू
2 कंटाळा ते संधीशी मैत्रीचा प्रवास
3 सतत बदलता सेवा उद्योग
Just Now!
X