News Flash

सौंदर्यसखी

‘फूल टाइम यू टय़ूबर’ असं स्वतचं प्रोफेशन सांगणारी शेरी श्रॉफ मुलींची सौंदर्यसखी झाली आहे. ब्यूटी आणि फॅशनविषयक तिचे व्हिडिओ यू टय़ूबवर चांगलेच लोकप्रिय आहेत.

| January 2, 2015 01:15 am

‘फूल टाइम यू टय़ूबर’ असं स्वतचं प्रोफेशन सांगणारी शेरी श्रॉफ मुलींची सौंदर्यसखी झाली आहे. ब्यूटी आणि फॅशनविषयक तिचे व्हिडिओ यू टय़ूबवर चांगलेच लोकप्रिय आहेत.
‘हाय गाइज्..’ अशा उत्साहपूर्ण आवाजाने आणि हसतमुख चेहऱ्याने प्रत्येक व्हिडियोची सुरुवात, ही जणू आता तिची ओळख झालीये. तिची पॉझिटिव्ह एनर्जी आणि आत्मविश्वास तिच्या डोळ्यांतूनच झळकत असतो. व्हिडियोच्या माध्यमातून ती कॅमेऱ्या पलीकडे असणाऱ्या व्यक्तीशी बोलत असते, तरी ती बघणाऱ्याला जवळची वाटतेय. अनेकजणी तिच्या फॅन झाल्यात. तिचा फॅशनसेन्स अप्रीशिएट होतोय आणि तिने दिलेल्या टिप्समुळे ती शेकडो मुलींची सौंदर्यसखी झालीये.. हे सगळं वर्णन आहे मुलींमध्ये पॉप्युलर असणाऱ्या यू ट्यूब चॅनल क्रिएटर शेरेजाद श्रॉफ ऊर्फ शेरी हिचं. सोशल मिडियावर शेअर होणाऱ्या व्हिडिओजच्या माध्यमातून ती मुलींची ब्यूटी आणि फॅशन गाइड म्हणून फेमस झाली आहे.
सौंदर्य आणि फॅशनविषयी सर्च दिल्यावर गुगलसारख्या कुठल्याही सर्च इंडिनवर सर्वसाधारणपणे परदेशी ब्रॅण्ड आणि पाश्चिमात्य संकल्पनांचीच चलती दिसते. सौंदर्यविषयक शंका खरं तर प्रांतोप्रांती वेगळ्या असतात. आपलं हवामान, संस्कृती, स्किन टाइप यामुळे आपल्या देशातल्या मुलींना काही वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. परदेशातल्या अनेक गोष्टी आपल्या देशात उपलब्धही होत नाहीत. पण याविषयी ऑनलाइन प्रेझेन्स फारसा नव्हता. भारतीय मुलींना ब्यूटी टिप्स देणारे क्रिएटर फार नव्हतेच. ‘सौंदर्य क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन गोष्टींचा शोध घेऊन आणि त्याची आपल्या इथल्या परिस्थितीशी सांगड घालता यावी यासाठी हे चॅनल सुरू केलं. मार्गदर्शकांची कमतरता हीच हे यू टय़ूब चॅनेल सुरू करण्यामागची प्रेरणा होती’, शेरी सांगते.
‘यू ट्यूब एक असं माध्यम आहे ज्यातून अनेकांपर्यंत पोचता येतं आणि त्यांच्यासमोर जाऊन बोलल्याची भावना मिळते. माध्यम इंटरॅक्टिव्ह असल्याने लोकांच्या प्रतिसादातून त्यांच्या प्रतिक्रियाही लगेच समजतात. प्रेक्षकांशी थेट कनेक्ट होता येतं.’, शेरी या नवीन माध्यमाची ताकद सांगते. यू ट्यूबमुळे स्वतची एक ओळख निर्माण होते आणि चेहरा लोकांसमोर येतो. व्यक्त होण्याचं आणि प्रसिद्ध होण्याचंही हे प्रभावी माध्यम ठरताना दिसतंय. शेरीची लोकप्रियता एखाद्या सेलिब्रिटीसारखी आहे. त्याबद्दल विचारताच शेरी हसते. ‘कोणतीही गोष्ट करण्यासाठी पॅशन महत्त्वाचं असतं. त्यामुळे कामातलं आणि त्याच्या क्वालिटीचं सातत्य कायम राहतं. फॅशन क्षेत्रातील पॅशनमुळेच मी हे यू ट्यूब चॅनल सुरू करू शकले.’
ब्यूटी, फॅशन, मेकअप, हेअरस्टाइल याविषयीचे व्हिडियो तिच्या यू ट्यूब चॅनलवर दर सोमवारी आणि शुक्रवारी उपलोड करते. अंडरआर्म व्हाइटिनगपासून ते तिच्या एंगेजमेंट मीटअपपर्यंत सगळ्या गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मेकअप आणि हेअरस्टाइल टय़ुटोरियल या व्हिडियोतून ती देत असते. तिच्या चॅनेलचे हजारो सबस्क्रायबर्स आहेत. तिच्या प्रत्येक व्हिडीयोवर किमान ३००- ४०० कमेंट्स असतात. ‘चाहत्यांना व्हिडियो आवडतात का याची खात्री करून घेण्यासाठी या कमेंट्सचा उपयोग होतो. त्या प्रत्येक कमेंटला आणि ट्विटर, फेसबुक, गुगल प्लस, इन्स्टाग्राम वर विचारल्या गेलेल्या प्रश्नांना, शंकांना मी स्वत: रिप्लाय देते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं काही व्हिडियोच्या माध्यमातूनही देत असते,’ शेरी सांगते.
‘वर्ण, बॉडी टाइप याविषयी भ्रामक संकल्पना  घेऊन मुली जगतात. त्यातून येणाऱ्या न्यूनगंडानं खचून जातात. प्रत्येकीकडे काहीतरी खासियत असते ज्यामुळे ती सुंदर होत असते. तुम्ही जसे आहात ते तुम्ही स्वीकारायला हवं. स्वतवर प्रेम करता आलं पाहिजे. कुणीच व्यक्ती २४ तास मेकअप करून राहू शकत नाही. त्यामुळे मेकअप फ्री असलो तरी आपण आनंदी राहायला हवं’, शेरेजाद आपला फंडा सांगते – ‘देअर आर नो रुल्स टू फॅशन..!’ नवीन माध्यमांच्या प्रभावी वापराचं आणि त्याच्या यशाचंही हेच सूत्र असावं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:15 am

Web Title: sherry shroff video about fashion on youtube
Next Stories
1 चक चक चकली
2 प्ले लिस्ट – नॉस्टॅल्जिया
3 नवीन वर्षांचं स्वागत आणि सिनेमांचं ट्रेण्डिंग
Just Now!
X