06 March 2021

News Flash

शॉपिंग फॉर समर

कडक उन्हाळा सुरू झाल्यावर आपल्या नेहमीच्या आऊटफिटमध्येही बदल होणं स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात काय खावं आणि काय खाऊ नये’ इथून ते ‘कोणते कपडे घालावेत, कोणते

| May 10, 2013 12:54 pm

कडक उन्हाळा सुरू झाल्यावर आपल्या नेहमीच्या आऊटफिटमध्येही बदल होणं स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात  काय खावं आणि काय खाऊ नये’ इथून ते ‘कोणते कपडे घालावेत, कोणते रंग उन्हाळ्यात वापरावेत या अशा अनेक प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्वचेसाठी कोणतं क्रीम लावावं इथपासून ते बॉडीलोशन कुठलं उत्तम या अनेक गोष्टींच्या शोधात आपण बाहेर पडतो. या सर्व गोष्टींची तयारी करणंही हे ऋतुबदलांचं स्वागत करणंच नाही का?
ऋतुबदलानंतर सर्वात महत्त्वाचा फरक पडतो तो म्हणजे आपल्या कपडय़ांमध्ये. एरवी आपण थंडी म्हटल्यावर थर्मल वेअरच्या कलेक्शनमध्ये स्वत:ला गुंडाळून घेतो. आता उन्हाळा म्हटल्यावर कॉटनच्या राज्यात डोकवायला हवंच. या कॉटनमयी रंगीबेरंगी दुनियेच्या बरोबरीने आपण थोडं स्टाइल स्टेटमेंटही जपण्याचा प्रयत्न करायला हवा. केवळ कॉटनचे तेच ते टॉप्स वापरण्यापेक्षा थोडय़ा वेगळ्या पद्धतीने आपण उन्हाळा साजरा करायला हरकत नाही.
उन्हाळ्यासाठी सुती कापडाचा वापर जास्त केला जातो त्यामुळे फॅशन स्ट्रीटवर, बांद्रय़ाच्या िलकिंग रोडवर सध्या सुती कपडय़ांची चलती दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या गरम हवेमध्ये घाम त्याचबरोबर चिक-चिक या साऱ्यातून जरासं फ्रेश व्हायचं असेल तर वेगवेगळ्या रंगांचे कपडे वापरायला हरकत नाही. गुलाबी, निळे, पांढरे असे डोळ्यांना सुखद आणि ब्राइट फ्रेश रंगाचा वापर खूपच आरामदायी ठरतो. ब्राइट कलर्स इज ऑलवेज बेस्ट ऑप्शन फॉर समर.
सध्या फ्लोरल िपट्र्सचे टॉप्स मुली हल्ली वापरताना दिसत आहेत. या फ्लोरल प्रिंटबरोबरीने ट्रॅंगल आणि सर्कल अशा वेगवेगळ्या िपट्र्सच्या कपडय़ांचा ट्रेण्ड मुलींमध्ये आहे. अशा ट्रेण्डचे कपडे लिकिंग रोडवर सहज मिळू शकतील. तसेच सुती चेक्सचे शर्ट्स, कुत्रे या साऱ्या कपडय़ांचा हळूहळू बाजारात समावेश होऊ लागला आहे. मोठमोठाल्या फॅशन डिझायनर्सनी समर कलेक्शन बाजारात केव्हाच दाखल केले आहे. त्यामुळे त्यांच्या आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीचा संगम साधुन एक अनोखं डिझाइन तुम्ही घडवू शकता.  याबरोबरीने शॉर्ट-कुर्ता हा पर्याय खूप उत्तम आहे. वेगवेगळ्या रंगांचे कॉटनचे कुत्रे घातल्याने तुम्हाला एक पारंपरिक लुक मिळेल आणि कुत्रे घालण्यास खूप सोईस्कर असल्याने हा पर्याय निवडण्यास काही हरकत नाही. कॉटनच्या जीन्स घालाव्यात. त्यामुळे वेगळा ‘गेट उप’ मिळतो आणि उन्हाळ्याचा त्रासही होत नाही. सध्या जीन्समध्येही लाल, नीळा असे व्हायब्रंट रंग आलेले आहेत. या जीन्सवर टॉप कुठला घालावा हे ठरवून या जीन्स घातल्यास उत्तम.
उन्हाळ्यात खासकरून सिल्क तसेच घाम न शोषणाऱ्या कपडय़ांचा वापर टाळावा. जास्तीत जास्त सुती कपडय़ांवर भर द्यावा. तसेच काळ्या रंगाचे कपडे टाळावेत. याचबरोबर हॉट पॅन्ट्सचा वापर पूर्णपणे टाळावा. जेणेकरून उन्हाळ्यामध्ये उन्हाचे तीव्र चटके लागणार नाहीत. बाहेर पडताना सुती ओवर कोट तसेच सुती स्कार्फ असल्यास बेस्ट..  
उन्हापासून रक्षण होण्यासाठी पुण्यामध्ये हा ट्रेण्ड खूप वर्षांपासून आहे. सगळ्या ऋतूंपकी सगळ्यात जास्त कंटाळवाणा आणि नको असणारा उन्हाळा ऋतू खूप त्रासदायक असतो. याच काळात त्वचेची, आरोग्याची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. पण त्यातूनही मार्ग काढत, वेगवेगळ्या युक्त्या लढवत जो तो या उन्हाशी लढण्यासाठी प्रयत्न करत असतो.

ट्रेण्डी स्कार्फ
स्कार्फमध्ये असणारे रंग आणि त्यांचे मटेरियल या गोष्टींचा विचार व्हायला हवा. हा विचार करताना आपण त्याच्याच जोडीला इतर अनेक गोष्टींचा विचार करू शकतो. स्कार्फमध्येही विविध प्रकार आहेत. जीन्स व टॉपवर स्टोल घेणं फॅशन स्टेटमेंटचा भाग झालेला आहे. हा स्टोल घेताना अनेकदा आपण विविध पर्याय वापरू शकतो. स्टोल हा केवळ जीन्स किंवा टॉप्सवर घेता येत नाही. तर एखाद्या चुडीदारवरही आपण स्टोल घेऊ शकतो. खासकरून शॉर्ट कुर्ती असलेल्या ड्रेसेसवर स्टोल अधिक खुलून दिसतो. स्टोलमध्येही प्लेन पिंट्रेड असे विविध पर्याय आहेत. प्लेन ड्रेसवर पिंट्रेड स्टोल अधिक खुलून दिसतो. तसेच पिंट्रेड टॉप किंवा कुर्तीवर प्लेन स्टोल हा अधिक उठून दिसतो.
स्कार्फमध्येही आपल्यासाठी अनेक पर्याय आहेत. यामध्ये पिंट्रेड स्कार्फ, फ्लोरल प्रिंट असे अनेक पर्याय आपल्याकडे आहेत. या पर्यायांचा विचार करताना आपण इतर बाटिक प्रिंट्सचाही विचार करायला हवा. हे प्रिंट आपण आपल्या ड्रेसच्या जोडीलाही मॅचिंग करू शकतो. ड्रेस आणि स्टोल यांचं एक अनोखं कलेक्शन आपण जमा करू शकतो. त्याचबरोबर चप्पल आणि त्यांच्यासोबत असलेले वेस्टर्न आऊटफिट. वेस्टर्न आऊटफिट आणि उन्हाळी कपडे यांचं खूप जवळचं नातं आहे. हे कपडे निवडताना डांगरी स्टाइलमध्येही आपण कपडे निवडू शकतो. हे कपडे निवडताना त्याच्याबरोबर एखादी हॅटही सुंदर दिसू शकेल. तसेच हे कपडे आणि त्याच्यासोबत येणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज हा एक उत्तम पर्याय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 12:54 pm

Web Title: shopping for summer
टॅग : Summer,Viva
Next Stories
1 वेगे वेगे
2 लर्न अ‍ॅण्ड अर्न : लिटिल चँम्प..
3 बुक शेल्फ : आयुष्याला पडणारे यक्षप्रश्न..
Just Now!
X