13 July 2020

News Flash

बेकसेल!

डिसेंबर महिना आता खरोखर शॉपिंग मंथ म्हणावा अशी परिस्थिती आहे. सगळीकडे मेगासेल, न्यू इअर ऑफरचे बोर्ड लागले आहेत.

| December 19, 2014 01:04 am

डिसेंबर महिना आता खरोखर शॉपिंग मंथ म्हणावा अशी परिस्थिती आहे. सगळीकडे मेगासेल, न्यू इअर ऑफरचे बोर्ड लागले आहेत. त्यातही हल्ली ऑनलाइन शॉपिंग साइट्समुळे सेल आणि ऑफर्स यांचा आपल्यावर अक्षरश: पाऊस पडत असतो. या माहोलमध्ये केकच्या सेलची कल्पना सुचली पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पियूषा जेरेला. पियूषाला बेकिंगची आवड. त्याचा उपयोग करून थोडी डोकॅलिटी तिने लढवली आणि बेक सेलची भन्नाट आयडिया केली. होममेड केक्स-पेस्ट्रीज-ब्राऊनीजवर डिस्काऊंट जाहीर करत तिने स्वत: बनवलेले हे पदार्थ उपलब्ध करून दिले. फग्र्युसन रोडवरच्या एका कॅफेत तिने हा बेक सेल मांडला होता आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला. तुम्हालाही येत्या ख्रिसमस किंवा न्यू इअर सेलिब्रेशनसाठी काही हटके करायचे असेल, तर पियूषासारखी आयडिया प्लॅन करायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2014 1:04 am

Web Title: shopping month december
Next Stories
1 व्हिवा दिवा : सायली लोंढे
2 क्लिक : गौरव ठाकूर,
3 बदलते सोहळे, बदलते विचार
Just Now!
X