|| प्रियांका वाघुले

एखादी गोष्ट हवी असेल तर त्याच्या पूर्तीकरता सगळ्यात जास्त आवश्यक असते ती म्हणजे त्यामागची जिद्द, असं म्हणणारा अभिनेता सिद्धार्थ मेनन स्वत:साठीसुद्धा हाच मंत्र वापरतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी मनाची तयारी असणं गरजेचं असतं, पण बऱ्याचदा आपण इतर काय करतात याचा विचार करत राहतो आणि द्विधा मन:स्थितीत अडकतो.

prarthana behere tie knot of pooja sawant and siddhesh chavan
प्रार्थना बेहेरेने पतीसह बांधली पूजा-सिद्धेशची लग्नगाठ! लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री झालेली भावुक, म्हणाली…
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
sankashti ganesh chaturthi 2024 shubh muhurat puja vidhi and mantra dwipriya falgun ganesha chaturthi
सर्वार्थ सिद्धी योगातील संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, शुभ योग आणि चंद्रोदय वेळ
Indian Institute of Science Education and Research
विज्ञान दिनी विज्ञानप्रेमींना मेजवानी! खुला दिवस, शास्त्रज्ञ संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन

आपल्याला काय करायचं आहे आणि इतर काय करतात यात अडकण्यापेक्षा मला काय हवंय हे महत्त्वाचं, असं सिद्धार्थ म्हणतो. फिट राहण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे, त्यासाठी ‘कॅलेस्थेनिक्स’ हा प्रकार करत असल्याचे तो सांगतो. मुळात बंद जागेत व्यायाम करणं आपल्याला कधीच आवडत नाही, असं सिद्धार्थ सांगतो.

इतर कलाकारांप्रमाणे जिममध्ये जाऊन व्यायाम करणं मनाला कधीच पटत नाही. त्यामुळे जिमचा मार्ग हा इतर नसल्यावरच वापरला जातो. पण म्हणून व्यायाम करणं टाळणं हा मार्ग सोपा असला तरी तो चुकीचा ठरतो, हेही सांगायला सिद्धार्थ विसरत नाही.

कॅलिस्थेनिक्स हा प्रकार आपल्याला ठरलेल्या चौकटीच्या बाहेर काढतो. आणि स्वत:च्या शरीराचा योग्य आणि पुरेपूर वापर करून घेऊन शरीराला फिट राहण्यासाठी मदत करतो. शरीराची लवचीकता वाढवण्यासाठी, बळ वाढवण्यासाठी हा प्रकार खूप उपयोगाचा ठरतो. आणि आपल्या प्रयत्नांत सातत्य टिकवता आलं की फिट राहण्यासाठी त्याचा अधिक उपयोग होतो, असं तो सांगतो.

कारण कोणतीही गोष्ट सातत्याने केली तर नेटकी होते. कॅलिस्थेनिक्ससाठी वेळेची, जागेची अडचण भासत नाही. फक्त आपलं शरीर आणि जिद्द महत्वाची असल्याचं सिद्धार्थ सांगतो

कॅलिस्थेनिक्स प्रकाराने व्यायाम करताना अनेक गमतीदार किस्से होतात, असेही त्याने सांगितले. असंच एकदा एके ठिकाणी गेलो असताना तिथे झाडाला लटकून मी व्यायाम करत होतो. मला अशा पद्धतीने व्यायाम करताना पाहून लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या ते पाहून स्वत:च स्वत:चे हसायला आले होते, पण नंतर त्यातीलच काहींनी सोशल मीडियावर कौतुक के ल्याची आठवण सिद्धार्थने सांगितली.

viva@expressindia.com