News Flash

जुन्या पद्धती नवा ट्रेण्ड

काही ट्रेण्डिंग स्कीन केअर, हेअर केअर बद्दल जाणून घेऊ या.

तेजश्री गायकवाड viva@expressindia.com

स्कीन केअर, हेअर केअर अर्थात त्वचेची आणि केसांची काळजी घ्यायला कोणाला आवडत नाही. भारतातच नाही तर संपूर्ण जगात यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. एकंदरीत खूप मोठी इंडस्ट्री या ‘काळजी’वर उभी आहे. या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक पद्धतीच्या स्कीन आणि हेअर टाईपच्या प्रकारावर अनेक प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. त्यातही सतत नवनवीन ट्रेण्ड येत असतात. सध्या जुन्या पारंपरिक पद्धती नवीन ढंगात बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. हा नवीन ट्रेण्ड सगळीकडेच चर्चिला जातो आहे. अशाच काही ट्रेण्डिंग स्कीन केअर, हेअर केअर बद्दल जाणून घेऊ या.

फेस मास्क : अचानक गेल्या दोन वर्षांंत हे फेस मास्क भलतेच ट्रेण्डमध्ये आले आहेत. वापरायला अतिशय सोपे आणि पटकन रिझल्ट्स देणारे असल्यामुळे अनेकांनी याला पसंती दिली. आपल्या पारंपरिक पद्धतीने वेगवेगळी पावडर मिक्स करून बनवल्या जाणाऱ्या फेस पॅकची अपडेटेड आवृत्ती म्हणजे हे मास्क आहेत असं म्हणायला हरकत नाही. या मास्कमध्येही वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ते पर्यायही स्कीन केअरसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक साहित्याचेच आहेत. उदारणार्थ हळद, गुलाब जल, दही, दूध, चंदन, हळद, उटणं यापासून बनवलेले किं वा याचा अंश असलेले हे मास्क आहेत. या मास्कला ग्लोबल टचसुद्धा दिला गेला आहे. कारण काही मास्कच्या प्रकारामध्ये वेगवेगळया देशातील पारंपरिक पद्धतींमध्ये वापरले जाणारे साहित्य वापरण्यात आले आहेत. यामध्ये कोरियन पद्धतीचे मास्क जास्त ट्रेण्डमध्ये आहेत.

फेस वॉश : फेस वॉश हा प्रकार अलिकडच्या काळात खूप प्रसिद्ध झाला आहे. आपण बाहेर फिरायला जाताना कॅरी करायला सोपं जावं, वापरायला सोपं जावं हा या फे स वॉशचा मूळ उद्देश होता. परंतु बघता बघता याचेही अनेक प्रकार प्रसिद्ध झाले. फेस वॉशच्या बॉटलमुळे किंवा त्याला पॅकिंग करण्याच्या पद्धतीमुळे काही फेस वॉश जास्त गाजले. यामध्येही जुन्या स्कीन केअरच्या पद्धतीमध्ये जे घटक पदार्थ वापरले जातात तेच पदार्थ वापरून फेस वॉश बाजारात आणण्यात आले आहेत. यामध्ये अ‍ॅपल सायडर व्हीनेगर आणि टी ट्री या दोन व्हरायटीज सध्या जास्त ट्रेण्डमध्ये आहेत.

शाम्पू : आयुर्वेदिक शाम्पू वगळता बाकीच्या शाम्पूमध्ये आपण खास पारंपरिक साहित्याचा वापर केलेला बघितला नाही आहे. परंतु सध्या असेच पारंपरिक घटक पदार्थापासून बनवलेले शाम्पू अचानक ट्रेण्डमध्ये आले आहेत. निव्वळ अशा प्रॉडक्ट्सच्या निर्मितीमुळे म्हणून काही बॅ्रण्ड अल्पावधीतच फार प्रसिद्ध झाले आहेत. कांद्याच्या काळ्या बिया, कोरफड, कडीलिंबू, टी ट्री, ग्रीन ट्री, खोबरे, अ‍ॅपल सायडर व्हिनेगर अशा अनेक घटकांपासून बनवलेले शाम्पू सध्या प्रसिद्ध झाले आहेत. त्यातही कांद्याच्या काळ्या बिया आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगर हे दोन पर्याय जास्त ट्रेण्डमध्ये आहेत.

कंडिशनर : कंडिशनर हा प्रकारच मुळात भारतात तसा कमी वापरला जात होता, परंतु हळूहळू शाम्पूच्या बरोबरीने कंडिशनर हा प्रकार  खूप प्रसिद्ध झाला आहे. केसांना कंडिशन करण्यासाठी हमखास केमिकलयुक्त कंडिशनरच बाजारात उपलब्ध होते. आता या कंडिशनरमध्येही नैसर्गिक घटकांचा समावेश केला जातो आहे. पूर्वी रात्रभर भिजत ठेवलेल्या तांदुळाच्या पाण्याचा वापर कंडिशनर म्हणून के ला जात होता. आता हाच फॉम्र्युला प्रॉडक्टसच्या रूपाने बाजारात आला आहे. या खेरीज शाम्पूप्रमाणेच नैसर्गिक किंवा पारंपरिक घटक असलेले कंडिशनरही बाजारात आले आहेत.

हेअर ऑईल : हेअर ऑईलमध्येही अगदी शाम्पूप्रमाणेच कांद्याच्या काळ्या बिया, कोरफड, कडीलिंबू, टी ट्री, ग्रीन ट्री, खोबरे, अ‍ॅपल सायडर व्हिनेगर अशा अनेक व्हरायटी उपलब्ध झाल्या आहेत. नेहमीच्या खोबरेल तेलाला आता खूप पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या केसांच्या समस्येनुसार, के सांचा पोत – दर्जा यानुसार हे हेअर ऑईल उपलब्ध आहेत. तसच केसांच्या मुळापर्यंत तेल पोहोचावे यासाठी आधुनिक पद्धतीने प्रॉडक्टच्या बॉटल डिझाइन करण्यावरही अनेक कंपन्यांनी भर दिलेला दिसून येतो आहे. यामुळे तेल लावणे फार सोपे होत असल्यानेच हे प्रॉडक्ट्स अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.

स्कीन के अरचा हा वाढता पसारा अर्थातच सोशल मीडियाच्या प्रभावामुळे शक्य झाला आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रचारामुळे स्कीन के अरची ही  प्रॉडक्ट्स अचानक ट्रेण्डमध्ये आली आहेत. अनेक वेगवेगळ्या सोशल मीडियावर या प्रॉडक्ट्सच्या जाहिराती, रिवू मोठय़ा प्रमाणावर केले जातात. नव्या ढंगात लोकांसमोर आलेले हे प्रॉडक्ट्स नैसर्गिक किं वा पारंपरिक घटक वापरून, काही जुन्या पद्धतींना नवा साज चढवत कसे बनवण्यात आले आहेत, याची मांडणी सोशल मीडियावरून के ली जात असल्याने त्यांच्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि कलाकारांकडून केलं जाणारं प्रमोशन हा डबल फं डाही या जुन्याच गोष्टींचा नवा साज लोकप्रिय होण्यासाठी कारणीभूत ठरला आहे यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2021 12:02 am

Web Title: skin and hair care with old methods zws 70
Next Stories
1 निवांत सुट्टी!
2 किताब विश्वसुंदरीचा!
3 नवं दशक नव्या दिशा : वैश्विकीकरणाची चौथी लाट – २
Just Now!
X