सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

‘व्हॉट्स अॅप’मध्ये आता ‘व्हॉइस कॉिलग’

vn23  ‘व्हॉट्स अॅप’नं युजर्सना ‘व्हॉइस कॉिलग’चा पर्याय उपलब्ध करून दिलाय. युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या फ्रेंडला ते देता येईल, पण यासाठी त्याला मोबाइल व्हर्जन अपडेट करावं लागेल. या अॅपमुळे युजर्सना मोफत ‘व्हॉइस कॉिलग’ची सेवा उपलब्ध होणार आहे. ‘हाइक’ला टक्कर देण्यासाठी व्हॉट्स अॅपने हा व्हॉइस कॉिलगचा पर्याय पुढे आणल्याचा आडाखा बांधला जातोय.

‘ट्विटर’ची फिचर्स नि ‘हाईक’चा फ्री व्हॉइस कॉल

‘ट्विटर’नं युजर्ससाठी व्हिडिओ शेअिरग आणि ग्रुप मेसेजिंग ही फिचर्स उपलब्ध करून दिली आहेत. व्हिडिओ शेअिरगवर युजर्स त्यावर शूट आणि पोस्ट करण्यापूर्वी एडिटही करू शकणार असून, ३० सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड करता येणारे आहे. स्मार्टफोन किंवा टॅब्लेटमधल्या कॅमेऱ्यानं शूट केलेले व्हिडिओही ट्विटरवर अपलोड करता येतील. हाइक मेसेंजरनं युजर्सना फ्री व्हॉइस कॉल सेवा उपलब्ध केलीय. टूजी, थ्रीजी, वायफाय नेटवर्कवरून युजर्सना हे वापरता येईल.

‘एआयबी’ काँट्रोव्हर्सी

सगळय़ाच सोशल साइट्सवर काही व्हिडिओजनी बऱ्यापकी धुमाकूळ घातलाय. एक आहे ‘एआयबी’ अर्थात ‘ऑल इंडिया बकचोद’ या तरुणाईच्या पसंतीस उतरलेल्या ‘यू टय़ूब’ चॅनलचा. आतापर्यंतचे त्यांच्या बऱ्याच व्हिडिओजवर तरुणाईच्या पसंतीची मोहोर उमटलीय. पण अर्जुन कपूर नि रणवीर सिंगसोबतच्या एका व्हिडिओची चर्चाच जास्त झालीय. या व्हिडिओला चार दिवसांत तीन कोटी व्हय़ूअर्स मिळाले असले, तरीही तो आवडणाऱ्यांपेक्षा तो एका अमेरिकन शोची कॉपी आहे का, त्यातले जोक्स कॉपी-पेस्ट करण्यात आलेत का नि विनोदाची ही पातळी योग्य आहे का याची सॉलिड चर्चा रंगतेय. राजकीय पक्षांनी या व्हिडिओवर विनोदांची पातळी हीन आहे, असा आक्षेप घेत माफी मागण्याची मागणी केली आहे. आता या ऑनलाईन चॅनेललासुद्धा सेन्सॉरशिप हवी की नको, याच्या चर्चा झडत आहेत. काही ‘एआयबी’चे चाहते हे सारे आरोप खोडून काढायचा प्रयत्न करताहेत. तुम्हाला काय वाटतं? यू टय़ूब चॅनेल्सला सेन्सॉरशिप असावी?

‘टेड २’ आणि  ‘फॅन्टॅस्टिक फोर’चं ट्रेलर

सोशल मीडियावर एन्टरटेन्मेंटचा सेक्शन नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. नव्या आणि आगामी चित्रपटांविषयी माहिती मिळण्याचं यू टय़ूब हे हक्काचं स्थान झालंय सध्या. इंग्रजी चित्रपटांचे शौकीन असाल तर ‘टेड’ माहितीच असेल. आपल्या एकसोएक कारनाम्यांनी समोरच्याला गार करणारा ‘टेड’ अनेकांना आवडला होता. त्याच ‘टेड’ची आणखी एक सुरस कथा ‘टेड २’मध्ये पाहता येईल. त्याच्या ट्रेलरला ‘यू टय़ूब’वर तीन दिवसांत १० लाख ३५ हजारांवर व्हूज मिळालेत. तर ‘फॅन्टॅस्टिक फोर’ या सायफाय चित्रपटाच्या ट्रेलरलाही अनेकांनी पसंती दिली असून, त्याला ‘यू टय़ूब’वर पाच दिवसांत एक कोटी ३८ लाख ६१ हजारांवर ‘व्हय़ूज’ मिळालेत.

‘बॉम्बे वेल्वेट’चा फर्स्ट लूक

vn24ग्यान प्रकाश यांच्या ‘मुंबई फेबल्स’ या पुस्तकावर आधारित ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटाचा फर्स्ट लूक ऑनलाइन मीडियावर रिलिज करण्यात आला. अनुराग कश्यप दिग्दíशत या चित्रपटात रणबीर कपूर बॉक्सर नि स्ट्रीट फायटरच्या मुख्य भूमिकेत असून अनुष्का शर्मा, करण जोहर, के. के. मेनन आदी कलावंतांच्या सहभूमिका त्यात आहेत. यू टय़ूबवरच्या या व्हिडिओवर हजारोंच्या उडय़ा पडल्या.

ओबामांची धूम
vn25गेल्या आठवडय़ात सोशल मिडियावर लोकप्रियता मिळाली बराक ओबामांना. ओबामा नि नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ ट्रेण्डमध्ये होते. ओबामा अमेरिकेला परतल्यानंतर ‘सो सॉरी’- ‘अमेरिका से आया मेरा दोस्त’ नि ‘एनएम-बराक ओबामा रॅप बॅटल’ या दोन्ही व्हिडिओजना चिक्कार व्हय़ूज मिळालेत. त्यांच्या लिंक्स – https://www.youtube.com/watch?v=9gDPrtYwNEU
https://www.youtube.com/watch?v=bEdxA9K_-iw

‘एफबी’  आणि  ‘इन्टाग्राम’चा ब्लॉक
अव्वल सोशल नेटवìकग साइट ‘फेसबुक’ आणि फोटो शेअिरग नेटवर्क ‘इन्स्टाग्राम’ची सेवा गेल्या आठवडय़ात सकाळी ४० मिनिटांसाठी बंद पडली होती. त्यामुळे जगभरातील कोटय़वधी युजर्सना मनस्ताप सहन करावा लागला. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा सायबर हल्ल्याचाच एक प्रकार होता. ‘फेसबुक’नं यास नाकारत हा प्रकार तांत्रिक कारणांमुळे घडल्याचं सांगितलं. काही वेळातच ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ची सेवा पूर्ववत झाली. यापूर्वी सप्टेंबरमध्येही काही वेळ ‘फेसबुक’ची सेवा उपलब्ध नव्हती.

 तू कोणासारखा?
‘फेसबुक’वर बऱ्याचदा कसल्या ना कसल्या टेस्ट शेअर केल्या जातात. त्यात तथ्य किती हे प्रत्येकाच्या मानण्यावर अवलंबून आहे. मुलगी किंवा मुलगा कोणासारखे याचे बरेचदा काही ठोकताळे बांधले जातात. मुलांनाही आपण नक्की कोणासारखे आहोत, हा प्रश्न अनेकदा पडतो. त्याचंच उत्तर शोधायचा हा एक तांत्रिक प्रयत्न..
http://bitecharge.com/play/motherfather/h1
तुम्हीही शोधून बघा.
राधिका कुंटे- viva.loksatta@gmail.com