vn18सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

सायन ऑफ इक्क्ष्वाकू
vk01तरुणाईचा लाडका लेखक आमिषचं नवीन पुस्तक येऊ  घातलंय जूनमध्ये. शिवा ट्रायोलॉजीनंतर आता रामावरील ‘सायन ऑफ इक्क्ष्वाकू’ या पुस्तकाची आत्तापासून ब्लॅबस्टर म्हणून जाहिरात केली जातेय. त्याच्या प्रमोशनसाठी चक्कएक ट्रेलर रिलिज करण्यात आलाय. ‘यूटय़ूब’वरचा हा ट्रेलर रिलिज होताच त्याला धडाधड व्ह्य़ूअर्स मिळू लागले. एखाद्या ग्रॅण्ड एपिक मुव्हीच्या ट्रेलरप्रमाणंच या ट्रेलरचा फिल असल्याचं व्हय़ूअर्सनी म्हटलंय. अनेक फॅन्सनी त्याची स्तुती करत आता पुस्तक वाचायची उत्सुकता आणखी ताणली जातेय, असं म्हटलंय. तर काही व्हय़ूअर्सनी ट्रेलर चांगला असला तरी भारतीय स्त्रिया पतीला कधीच नावानं हाक मारत नाहीत नि ही तर भगवान राम आणि माता सीतेची कहाणी आहे. सीतामातेचं ‘राम’ अशी हाक मारणं पटत नाही, असं म्हटलंय. खुद्द पुस्तकात कोणतं ‘रामायण’ असणारेय, याची उत्सुकता वाढतेय. आगे जाने राम क्या होगा.
नॅशनल टेक्नॉलॉजी डे
‘नॅशनल टेक्नॉलॉजी डे’ अर्थात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसानमित्तानं ट्विटरकरांनी भरभरून ट्वीटस् केल्यानं #नॅशनल टेक्नॉलॉजी डे हा हॅशटॅग तिसऱ्या स्थानावर होता. तंत्रज्ञानाच्या भरारीपासून ते त्याच्या तोटय़ांपर्यंत आणि तंत्रज्ञानाला थँक्यू म्हणण्यापासून ते तांत्रिक सक्षमतेच्या मुद्दय़ांवरची चर्चा या निमित्तानं घडली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांनीही आवर्जून राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसानिमित्ताच्या शुभेच्छा दिल्या.
मेरी माँ
   मी आणि आई सॉलिड टीम असं म्हणत मे महिन्यातला दुसरा रविवार नेटकरांनी ‘मदर्स डे’चं सेलिब्रेशन अगदी दणक्यातच केलं. त्याची सुरुवातच जणू ‘गुगल डुडल’च्या अ‍ॅनिमेटेड कॅरॅक्टर्सनी झाली. ‘गुगल’ या इंग्रजी शब्दातल्या ड चं सही मायनें में अ‍ॅनिमेशन करण्यात आलं होतं. पशू-पक्ष्यांपासून ते मानवापर्यंत कॉमन फिलिंग असणाऱ्या आईच्या मायेला तोड नाही, याचा प्रत्यय यातून आला. रेडिमेड कविता, पारंपरिक कविता किंवा ग्रीटिंग्जपेक्षा नेटकरांनी आपल्या आईसोबतचा सेल्फी, जुने फोटोज शेअर करण्याला सर्वाधिक पसंती दिली. या निमित्तानं आईचं महत्त्व पुन्हा अधोरेखित करणारे काही कमर्शिअल व्हिडीओजही अपलोड करण्यात आले. तर काहींनी हा एकच दिवस आईला आदर का द्यावा, असा सवाल उपस्थित करून आईवरच्या आपल्या परमनंट प्रेमाला दुजोरा दिला. यानिमित्तानं #मदर्स डे, #मदर #आई, #व्हॉटमदरवॉण्ट्स, #मॉम्स, #हॅप्पी मदर्स आदी हॅशटॅग अव्वल स्थानी ट्रेण्डिंगमध्ये होते.
 ‘हिट’सलमान
vk02बॉलीवूडच्या ‘हिट’ अभिनेत्यांपैकी अर्थात लोकप्रियता नि बॉक्स ऑफिस नि आता ‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरण अशा तिहेरी अर्थानं हिट ठरलेल्या सलमानखानच्या खटल्याची चर्चा आठवडाभर नेटकरांना पुरली. #सलमानखान व्ह२डिक्ट, #अनफेअरसलमानव्ह२डिक्टऑनसलमान, #बिइंग हय़ुमन, #रविशकुमार, #सलमानजेलऑरबेल, #अभिजितसिंगर, #फराहअलीखान, #फ्रायडेरिलिज आदी हॅशटॅगनी ट्विटरसह फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर एक नंबर स्थान पटकावलं होतं. अनेक बॉलीवूड सेलेब्रिटीजसह सलमानाच्या फॅन्सनी त्याची बाजू उचलून धरली होती. तर तेवढय़ाच ताकदीनं त्याच्याविरोधात अर्थात न्यायाच्या बाजूनं असणाऱ्यांनी ती बाजू लावून धरली होती. या प्रकरणाचा तटस्थपणं विचार करणारेही काही मोजकेच नेटकरही होते. बाकी सर्रास त्याच्या सिनेमाचे डायलॉग वापरून लिहिलेले मेसेजेस, फोटोज, कार्टून्स, बिइंग हय़ुमनवरच्या कोटय़ा हे सारं होतंच. पत्रकार-टीव्ही अँकर रवीशकुमारनं सलमानला लिहिलेलं पत्र, बॉलीवूड डिरेक्टर चारुदत्त आचार्य यांनी लिहिलेला हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातला स्वानुभव, गायक अभिजीतची मुक्ताफळं नि माफीनामा यांचीही चर्चा सोशल मीडियावर झाली. संजय दत्त पाठोपाठ सलमानलाही न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे त्या दोघांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटांच्या नावावरून जोक्स शेअर केले जात होते. ‘चल मेरे भाई’ हा सलमान भाई आणि संजूबाबाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.
कॅमेरून इज बॅक अगेन
vk03राजकुमारीच्या जन्मापाठोपाठ ब्रिटन पुन्हा चर्चेत आलं ते तिथल्या निवडणुकांमुळं. ‘जाणार की राहणार’ या चर्चाना पूर्णविराम देत विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी ब्रिटनमध्ये सत्ता राखण्यात यश मिळविलंय. यादरम्यान मजूर पक्षाचे नेते #एड मिलिबॅण्ड, #बकिंगहम पॅलेस आदी हॅशटॅग ट्रेण्डमध्ये होते. भारतीय वंशाच्या १० उमेदवारांचा विजय, मोदींच्या कॅमेरून यांना दिलेल्या शुभेच्छांसह भारत नि ब्रिटनमधली निवडणूक नि त्यानंतरच्या सेलिब्रेशनवरही नेटकरांनी मुद्देसूद चर्चा केली.   
व्हायरल जोक ऑफ द वीक
लग्न सीझन स्पेशल.
मुलगी सासरी जायला निघते, घरची मंडळी निरोप घेतात. पाच- दहा पावलं जातात न जातात, तोच नवरी मागे येऊन पळतच घरात शिरते…
वऱ्हाडी मंडळी हैराण होतात..
तिची आई मागोमाग आत येते, म्हणते-
‘अगं काय झालं.? असं मागे परतणं अशुभ असतं पोरी..! ’
नवरी- तुला शुभ-अशुभचं पडलंय..
इथं माझा चार्जर राहिलाय.!