vn18सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

भूकंपानंतरची मॉडर्न ट्रॅजेडी
vr15अतिशय दुर्देवानं आणि दुखानं हे लिहावं लागतंय की, नेपाळमध्ये पाठोपाठ झालेल्या भूकंपांमुळं आणि त्याचे भोवताली उमटलेले पडसाद हे सोशल मीडियावर एक क्रमांकाचं ट्रेण्डिंग ठरलंय. #नेपाळअर्थक्वेक, #अर्थक्वेकअगेन, #एव्हरेस्ट, #थँक्यू पीएम हे हॅशटॅग्ज ट्रेण्डिंगमध्ये होते. या भूकंपाचे फोटोज, व्हिडीओज शेअर करतानाच माणुसकीचं भान राखत नेटकरांनी प्रार्थनांसह मदतीचा हातही पुढं केलेला दिसतोय. अनेकांनी ‘व्हॉटस् अ‍ॅप’च्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली वाहिलेय. ‘गुगल’च्या पर्सनफाइंडर आणि ‘फेसबुक’च्या सेफ्टी चेक देणाऱ्या फीचर्सचा उपयोग करण्यात आला. त्यांच्याआधारे आपल्या जिवलगांच्या सुरक्षेची ग्वाही दिली गेली. एका बाजूला माणुसकीचं दर्शन होत असलं तरी या विपरीत परिस्थितीत माणुसकीचा अगदी उलटा चेहराही समोर येतोय. नेपाळमधल्या ऐतिहासिक वारशाचं स्थान असलेला धराहरा मनोरा भूकंपाने कोसळला. त्याच्या अवशेषांसमोर उभं राहून सेल्फी काढणाऱ्यांचे फोटोही सोशल साइट्सवर फिरत होते. जमीनदोस्त झालेल्या मनोऱ्याची ही जागा म्हणजे सेल्फी स्पॉट झाला होता आणि ही आधुनिक काळातली खरी ट्रॅजेडी आहे, असं म्हणता येईल.

नच बलिये ७
कारण कोणतंही असो, आपल्याकडं लोकांना नाचायला नि नाच बघायला आवडतं. त्यातूनही ते सेलेब्रिटी डान्सर असतील तर मग बघायलाच नको. त्यामुळंच असेल पण ‘नच बलिये’चा सातवा सीझन सुरू झालाय बॉस. सेलेब्रिटी कपल्स, होस्ट्स नि जज अशी एकाहून एक दिसायला तरी वरचढ वाटणारी टीम या वेळी परफॉर्म करणारेय. त्यातही प्रीती िझटा नि माझरे पेस्तनजी या जजेसपेक्षा ‘ट्विटर’ नि ‘फेसबुक’वर जास्त चर्चा रंगलेय ती चेतन भगतची. ‘हा सेलेब्रिटी लेखक लिखाण सोडून इथं काय करतोय?’, ‘काय बोलतोय’ वगरे उलटसुलट प्रतिक्रिया लिहिल्या जाताहेत. ‘पार्टििसपन्ट्सना डान्सचं ट्रेिनग देण्यापेक्षा जजेसना बोलण्याचं ट्रेिनग द्या,’ अशा तिखट प्रतिक्रियाही आल्यात. तर काही जणांनी चेतनची बाजू जाम लावून धरल्येय. कुणी होस्टबद्दल, तर अनेकांनी आपल्या आवडत्या जोडीबद्दल पोस्ट केल्यात. काही महाभाग तर डान्स प्रोग्रॅमध्येही फॅशन ट्रेण्ड्स शोधायचा प्रयत्न करताहेत. याच रंगदार चच्रेमुळं हा शो टॉप ट्रेिण्डगमध्ये आहे.  

‘कल हो ना हो’ सलमान खुर्शीद!
vr16भारताचे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी एका जर्मन व्हिडीओ अल्बममध्ये काम केलंय, तेही २००३ मधल्या शाहरुख खान, सफ अली खान नि प्रीती िझटाच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताच्या व्हिडीओसाठी. ‘लीब झेत्स्-कल हो ना हो’ असं या अल्बमचं नाव आहे. भारतातील जर्मनीचे राजदूत मायकेल स्टेनर यांचे ‘कल हो ना हो’ या चित्रपटातील टायटल साँग प्रचंड आवडीचं असून, त्यांना या गाण्यासह चित्रपटाची अखेर या रिमेकमधून दाखविली आहे. जावेद अख्तर यांनी लिहिलेलं आणि सोनू निगमनं गायलेल्या ‘कल हो ना हो’ या गाण्यात स्टेनर शाहरुख खान, खुर्शीद सफ अली खान आणि स्टेनर यांच्या पत्नी एलिसी प्रीती झिंटाच्या भूमिकेत आहेत. ‘यू ट्यूब’वर या व्हिडीओला एका साडेतीन लाखांवर व्ह्य़ूज मिळालेत.
 
बर्थ डे बॉय सचिन इन्स्टाग्रामवर
क्रिकेट जगताचा ‘देव’ गणल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी नेटकरांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या.  आपला ‘डीपी’ किंवा प्रोफाइल पिक सचिनचा ठेवण्यापासून त्याच्या सगळ्या कारकीर्दीचा आढावा घेत त्याचे पिक्स पोस्ट केले गेले. केवळ चाहतेच नव्हे तर अनिल कुंबळे, सुरेश रैनासह त्याच्या सहकाऱ्यांनी, बॉलीवूड स्टार्सनीही त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्यात. खुद्द सचिननं याच निमित्तानं ‘इन्स्टाग्राम’वर आपलं अकाउंट सुरू करून आपला फॅमिली सेल्फी अपलोड केलाय.

चार हॉलीवूडपटांची झलक
स्टिव्हन स्लिपबर्गच्या अ‍ॅक्शन-अँडव्हेंचर पॅक्ड ‘ज्युरासिक पार्क’च्या ट्रेलरला अवघ्या एका दिवसात ८० लाख ६५ हजारांवर व्ह्य़ूज मिळालेत. जॉनी डेपच्या क्राइम ड्रामापट म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या ‘ब्लॅक मास’च्या ऑफिशिअल ट्रेलरला दोन दिवसांत १२ लाखांच्या आसपास व्ह्य़ूज मिळालेत. जेरेर्ड लेटोच्या ‘सुसाइड स्क्वॅड’ या चित्रपटातील व्हिलनचा फर्स्ट लुक नि त्या लुकविषयीचा व्हिडीओ रिलीजही झालाय. ‘पायरेटस् ऑफ कॅरेबियन’च्या पुढच्या भागाचा फर्स्ट लुकही रिलिज झालाय. उमेश कामत नि स्पृहा जोशी हा छोटय़ा पडद्यावर गाजलेल्या जोडीचा 70एमएमवर येणाऱ्या पीजी अर्थात ‘पेइंग घोस्ट’ या चित्रपटाच्या टीझरला दोन दिवसांत साडेबारा हजारांवर व्ह्य़ूज मिळालेत.

ऐश्वर्याची वादग्रस्त जाहिरात
vr17नेटकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून साडेतीन मुहूर्तापकी अर्धा मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. याच सुमारास होणारी सोने खरेदी लक्षात घेत दरवर्षीच अनेक ज्वेलर्सच्या जाहिराती प्रसिद्ध होतात, पण यंदा एका जाहिरातीवरून वाद झाला.  #ऐश्वर्या राय आणि #कल्याण ज्वेलर्स हे ट्रेिण्डग ‘फेसबुक’ नि ‘ट्विटर’वर टॉप टेनमध्ये होतं. या जाहिरातीत एक कृष्णवर्णीय मुलगा ऐश्वर्याच्या मागं छत्री घेऊन उभा आहे. वर्णभेद आणि बालमजुरीसारख्या प्रथांना गोंजारणाऱ्या या जाहिरातीचा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला. ऐश्वर्याच्या दाव्यानुसार कंपनीनं या जाहिरातीचे आर्ट वर्क बदलले. मात्र तिनंही या विषयाकडं लक्ष वेधल्याबद्दल आभार मानत जाहिरातीत बदल करण्यात आलेत, असं उत्तर दिलंय. त्या संदर्भातले फोटो, व्हिडीओजची उलटसुलट चर्चा नेटकरांमध्ये होती.

शाहरुखची रिट्विटस्
सोशल मीडियावर सेलेब्जच्या अकाउंट्सचा होणारा बोलबाला लक्षात घेऊन असेल, पण सोहा अली खाननं ‘फेसबुक’वर साइन इन केलंय. तसं तिनं ‘ट्विटर’वर अपडेट केलं असून ‘फेसबुक’वर तिनं लग्नाच्या फोटोंसकट आणखीही काही फोटोज अपलोड केलेत. कायम चच्रेत असणारा स्टार शाहरुख खान सोशल मीडियावरही चांगलाच चच्रेत आहे. आठ हजारांहून अधिक ट्विट्स नि १,२६,२४,३२४ हून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या शाहरुखचा ‘मोस्ट रिट्विटेड इंडियन ऑन ट्विटर’ असा बोलबाला होतोय. त्याचा ऑनलाइन करिश्मा अजूनही ताजा आहे म्हणायचा.
राधिका कुंटे -viva.loksatta@gmail.com