vv14सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

गाना फॉर अ मोमेंट
आपल्याकडे प्रसंग कोणताही असो, पण गाणे झालेच पाहिजे असा काहीसा अट्टहास असतो. हाच मुद्दा ट्वीटकरांनी पकडलेला दिसतोय नि #गाना फॉर अ मोमेंट हा हॅशटॅग अव्वल ट्रेण्डिंगमध्ये आहे. ‘गाना डॉट कॉम’च्या या क्वीझमध्ये अनेकांनी ‘गाना’नं अपलोड केलेल्या फोटोंजवरून गाणी ओळखायला सुरुवात केल्येय. कळेलच कोण जिंकले ते क्वीझमध्ये, पण गाणी कायमच जिंकतात आपल्याला, हे बाकी एकदम खरेय..

‘मदर इंडिया’ला आदरांजली
भारतीय चित्रपटांतील ‘मदर इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नर्गिस दत्त यांना ८६व्या जयंतीनिमित्त ‘गुगल’ने ‘डुडल’च्या माध्यमातून आदरांजली वाहिली. ‘मदर इंडिया’, ‘आवारा’ आदी ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे नर्गिस दत्त यांना बॉलीवूडची पहिली ‘क्वीन’ म्हणून ओळखले जाते. सरकारतर्फे मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होय. दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेवर आधारलेल्या चित्रपटाला ‘द नर्गिस दत्त अ‍ॅवॉर्ड’ दिले जाते.

खरेच होता का ‘नो टीव्ही डे’?
परवा ३० मे रोजी ‘नो टीव्ही डे’ होता, हे माहितेय का? नेटकरांनी विशेषत: ट्विटरवर यानिमित्ताने बरेच ट्वीटस् करण्यात आले होते. एवढे की, तो त्या दिवसातला नंबर एकचा ट्रेण्ड होता तो. टीव्ही न बघता काय काय करायचे, तर मैदानी खेळ, डान्स, पिकनिक, गप्पाटप्पा वगैरे वगैरे; पण त्याच वेळी अनेक ट्विटरकरांसह फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवरचे स्टेटस असेही सांगत होते की, त्याच दिवशी विविध मनोरंजन वाहिन्यांवर लागणारे नाटक-सिनेमे पाहण्यात ते इंटरेस्टेडेट आहेत किंवा बघताहेतही. उदाहरणार्थ अनेकांनी ‘नांदी’ नाटकाची प्रशंसा केली होती. गाण्याचे फॅन्स ‘इंडियन आयडॉल ज्युनिअर’विषयी एवढे ट्वीट करत होते की, हा हॅशटॅग पहिल्या ट्रेण्डवर होता. पाठोपाठ सुशांतसिंगचा ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ नि शाहीद कपूरचा अनेक पुरस्कारविजेता ‘हैदर’ पाहणाऱ्यांची संख्याही कमी नव्हतीच. आता सांगा, खरेच होता का ‘नो टीव्ही डे’?

इंडिया हीट वेव्ह
भारतात उष्णतेची लाट पसरलेय. आतापर्यंत त्यात दोन हजारांवर बळीही गेलेत. आता वाट बघितली जातेय ती पावसाचीच; पण म्हणून उकाडा काही कमी व्हायचे नाव घेत नाहीये. मग काय नेटकरांनी उन्हाळ्यात काय काय काळजी घ्यावी, याचे सल्लेच एकमेकांना दिल्येत. या सल्ल्यांचा विशेष हा की, त्यात शब्दांपेक्षा आयकॉन्सवर भर देण्यात आलाय. आताशा चित्रलिपी पुन्हा अवतरणार की काय, हा संशय घ्यायला आणखी एक जागा. असो. उन्हाची तलाखी कमी व्हावी म्हणून मग जोक्स व्हायरल होणे अगदी स्वाभाविक. त्यातलाच हा एक फोटोजनिक जोक..

‘फिफा’ची चर्चा
‘फिफा’ अर्थात जागतिक फुटबॉल महासंघटना आठवडाभर सोशल नेटवर्किंगवर चर्चेत राहिली. एरवी फुटबॉलप्रेमी देशविदेशांतल्या मॅचेसची नि प्लेअर्सची भरभरून चर्चा करतात; पण ‘फिफा’च्या अध्यक्षपदी सेप ब्लॅटर यांची पुन्हा एकदा निवड होणे नि महासंघाच्या सात उपाध्यक्षांना लाचखोरीच्या आरोपावरून झालेली अटक या मुद्दय़ांवर नेटकरांनी आपली मते व्यक्त केली. ‘फिफा’ची निवडणूक ७९ वर्षीय ब्लॅटर यांनी पाचव्यांदा जिंकली. ते १९९८ पासून अध्यक्षपद भूषवताहेत. त्यांचा दांडगा अनुभवच त्यांच्या भाषणातून दिसला. आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन आणि आशियाई संघटना ब्लॅटर यांच्या बाजूने उभ्या राहिल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

‘बजरंगी’ फीव्हर
भाई सलमान खानच्या ‘हिट अँड रन’च्या केसपेक्षाही सध्या नेटकरांमध्ये ‘फीव्हर’ दिसतोय तो ‘बजरंगी भाईजान’चा. या चित्रपटातला सलमानचा फर्स्ट लुक टप्प्याटप्प्याने रीलीज केल्याने नेटकारांची उत्सुकता आणखीन ताणली गेली होती. त्याच्या ‘यूटय़ूब’वरील व्हिडीओला अवघ्या १८ तासांत ७,१६,७९० व्हय़ूज मिळाले होते. या टिझर्सवरून काही फोटोपिक आणि जोक्सही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ईदला रीलीज होणारेय.

माय फॅमिली…
रितेश देशमुखने आपला मुलगा रिआनसोबतचा फोटो पहिल्यांदाच ‘ट्विटर’वर अपलोड केल्यावर त्याला अनेक लाइक्स मिळाले. अनेकांनी तो शेअरही केला. या फोटोत त्याने जेनेलियालाही टॅग केले होते. शिवाय वडील विलासराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करतानाचा फोटोही त्याने अपलोड केला. त्यात वडील-मुलाच्या नात्याविषयी लिहिले होते. त्यावर जेनेलियाने I can guarantee Pappa would be very proud of the father you are to your son असे ट्विट केले होते.

हंगर की बजाओ…
आजकाल सेलेब्रेटींच्या तोंडून गोष्ट वदली की, अनेकांना त्यातले गांभीर्य जाणवत असावे किंवा किमान भासवले जाते. म्हणूनच असेल कदाचित रणवीर सिंगच्या ‘हंगर की बजाओ’ या व्हिडीओला नेटकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय. शाळकरी मुलांना पोषण आहार मिळावा नि त्यासाठी केवळ ७५० रुपये दान करावे लागतील अशा आशयाचा हा व्हिडीओ आहे. #Rs750 आणि # hungerkibajao हे दोन्ही हॅशटॅग अव्वल ट्रेण्डमध्ये होते. अधिक माहितीसाठी http://www.hungerkibajao.com/ donate.php

टीव्हीएफ वापसी
बऱ्याच काळाने ‘टीव्हिएफ’ ०३्र८स्र्ंचा एक व्हिडीओ गाजतोय. तो आहे ‘मॅच ना मिलेगी दोबारा..’ अर्थातच ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’वर लाइट नि ह्य़ूमरस मॅनरने बेतलेला. ळ्रल्लीि१ हे अ‍ॅप भारतात लाँच झाल्याचे निमित्त आहे या व्हिडीओत. तो कसा आहे, ते प्रत्यक्ष बघून ठरवा.

तो से रैना जब से मिले…
क्रिकेटर सुरेश रैनाच्या लग्नाइतकीच चर्चा त्याच्या हनिमून फोटोंवर होतेय नि ते सोशल मीडियावर व्हायरल होताहेत. ट्रेण्डिंगचा टॉपिक ठरताहेत. भाई, बुरा मत मानो, इंडिया में कुछ भी हो सकता हैं.

मोठ्ठा आ करा…
‘मॅकडोनाल्ड’प्रेमींनो ऐका, आता यापुढे मॅकडीमध्ये गेलात, तिथला बर्गर ऑर्डर केलात नि तो खाल्ल्यावर त्याची चव वेगळी वाटली तर अजिबात गांगरून जाऊ नका, कारण ‘मॅकडोनाल्ड’च्या सीईओंनी ऑफिशिअली तसे जाहीर केलेय. बर्गरचे बीन्स थोडेसे मोठे होतील, आतल्या पॅटिसमधल्या मालमसाल्याची चवही थोडीशी बदलेल, पण ते टेस्टी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सो, आता थोडा मोठ्ठा आ करा आणि..

बारावीचा रिझल्ट
बारावीचा रिझल्ट लागला खरा, अनेक जण यशस्वी ठरले खरे. सोशल मीडियावर अनेकांनी स्वत:च्या, आपल्या मुलाबाळांच्या रिझल्टचे अपडेट्स दिले; पण त्यांच्यापेक्षाही जरा जास्त व्हायरल झाले ते व्हॉटस् अ‍ॅपवरचे असे फोटोज. रिझल्ट लागण्याआधी विद्यार्थ्यांची परिस्थिती नेमकी टिपणारं चित्रं.
राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com