डिसेंबर उजाडतानाच लागते वर्ष संपत आल्याची चाहूल.. मग मनात माजतं थोडंसं काहूर! किती भराभरा गेलं हे वर्ष. चांगल्या-वाईट सगळ्याच घटना आठवायला लागतात. मग त्या देश-राज्यात झालेल्या निवडणुका असोत, यशस्वी ठरलेलं मिशन मार्स असो, कायद्यांत झालेले बदल असोत किंवा यंदाही महत्त्वाचा ठरलेला स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न असो.. क्रीडा, तंत्रज्ञान, समाजकारण, राजकारण, अंतराळ विज्ञान या आणि अशा किती तरी क्षेत्रांतल्या घटनांनी तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं. नोबेल पुरस्काराबद्दलचा आनंद व्यक्त करतानाच नंतर पाकिस्तानच्या पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेधही तरुणांनी तितक्याच तीव्रपणं नोंदवलाय. निरपराधांवरचा अन्याय, भ्रष्टाचार, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, उबेरसारख्या घटनांचा निषेध करण्यासाठी तरुणांनी विविध सोशल मीडियाचा सहारा घेतला. त्याचसोबत त्यांची सर्जनशीलताही या माध्यमातून व्यक्त झाली. त्यामुळं यंगस्टर्स म्हणजे केवळ फन अ‍ॅण्ड फाइन पीपल हा समज चुकीचा ठरवत तरुणांनी आपल्या समंजसपणा नि जबाबदारीची जाणीव समाजाला दाखवून दिलीय. ती तशीच कायम राहो आणि येणारं वर्ष आनंदी नि सुखकर जावो, या शुभेच्छा.
या वर्षभरातल्या लक्षणीय घटनांची नोंद काही जणांनी ‘व्हिवा’शी शेअर केल्येय.

नेत्रा मिस्त्री
vv18     बदल हा निसर्गाचा नियमच आहे नि त्याप्रमाणं क्षणाक्षणाला या सुंदर जगात बदल घडताना दिसतो. काही बदल नुसतेच होतात नि काही एकदम सारं चित्रच बदलून टाकणारे असतात. २०१४ मध्ये परराष्ट्र व्यवहार, परदेशांशी मत्रीपूर्ण संबंध, कायद्यांतले बदल आणि मोदी नावाची लाट यांसोबतच सामान्य माणसांचा भारताच्या या बदलत्या स्वरूपातला सहभाग दिसला. राजकारणी, सामान्य आणि सेलेब्रेटी स्वच्छ भारत अभियानात थेट सहभागी झाले किंवा अशाच विविध कारणांसाठी सर्वाना आवाहन केलं गेलं. लोक जागरूक झाले. तरुणांनी सोशल कॉजसाठी उदाहरणार्थ रेप नि एक्सप्लॉयटेशनविरोधात आवाज उठवला. ‘बीएमएम’च्या विद्यार्थ्यांनी नवीन ग्रेिडग सिस्टीमविरोधात विद्यापीठात निषेध नोंदवला. या वर्षभरात पॉकेटफ्रेण्डली नि युजरफ्रेण्डली मोबाइल वापरण्यात आले. पुढय़ात आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी तरुणांना सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म मिळाला. ट्विटर नि फेसबुकच्या अकाऊंटवरच्या त्यांच्या पेजेसना नि त्यांच्या स्पेशल टॅलेंटला खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. डिसेंबरचे आणखी काही दिवस बाकी आहेत. त्यातही चार चांगल्या गोष्टी घडतील. आहे का शक्य?

कपिल चांदवडकर
vv19म्हटलं तर आपलं भविष्य आपल्या भूतकाळावर अवलंबून असतं. पण म्हणून कायमच त्यात अडकून राहता कामा नये. सेलेब्रेटीजनी रस्ता झाडणं आणि प्रधान सेवकांचं मेडिसन स्क्वेअर नि अल्फान्सो एरिनामध्ये ऐतिहासिक भाषण होणं, मेक इन इंडियाची गर्जना आणि कैलाश सत्यार्थीना मिळालेला नोबेल सन्मान, अशा किती तरी अभिमानास्पद घटना भारतात घडल्या नि घडताहेत. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे यूएननं वर्ल्ड योग डेला मंजुरी दिली. मात्र अलीकडेच घडलेल्या उबेरसारख्या घटना आणि राजकारणांच्या घोटाळ्यांमुळे कलंक लागलाच. काही घटनांनी एकात्मता अबाधित राहिली. मागच्या चुका सुधारून आíथक, सामाजिक, पर्यावरणदृष्टय़ा राष्ट्र विकसित करण्यात आपलाही खारीचा वाटा उचलायला हवा.

सुप्रिया पाटील
vv20या वर्षभरात दोन मोठय़ा निवडणुका झाल्या. देशभरात नि राज्यात भाजप सरकार आलं. मोदींची जणू लाट आली होती. तरुणाईचं आकर्षण ठरणाऱ्या आयफोन- 6चं लॉिन्चग झालं. कमी बजेट तरीही स्टेप बाय स्टेप आपलं लक्ष्य गाठणारं प्रोजेक्ट अर्थात मिशन मार्स यशस्वी ठरलं. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल प्राइज मिळालं. तिकडं पाकिस्तानच्या मलालाही नोबेल मिळालं खरं पण त्या आनंदावर पेशावरमध्ये घडलेल्या आर्मी पब्लिक स्कूलवरच्या दहशतवादी हल्ल्यामुळं विरजण पडलं. या दु:खद घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातलं फिल ह्यूजचं अकाली जाणं सगळ्यांना चटका लावून गेलं. ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आपण जिंकलो. सलमान खानची बहीण अíपताच्या राजेशाही थाटातल्या लग्नाचा मोठाच गाजावाजा झाला होता.

अलव्य टणक
vv21२०१४ हे र्वष लक्षात राहील ते मोदी लाटेसाठी. बदल घडू शकतो, ही आशा जाणवल्यानं तरुणाईत सकारात्मकता दिसली. गेली दहा र्वष भारतीय जनमानसाचे कान आपल्या नेतृत्वाचे चार शब्द ऐकण्यासाठी तरसले होते. घोटाळे, स्त्रियांवरचे अत्याचार आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं देशभर वाढतच असताना त्यावर कडक कारवाई केली गेली नाही. उलट त्यावर संबंधितांची अळीमिळी गूपचिळी ही भूमिका त्रासदायक होती. या पाश्र्वभूमीवर मोदींची एंट्री झाली नि भारतीयांना केवळ गोडगुलाबी स्वप्न दाखवण्याऐवजी त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देऊन तेही देशाच्या विकासात हातभार लावू शकतात, हे मोदींनी सांगितलं. लोकसहभाग नि लोकजाणीव नसेल तर कोणत्याही प्रकारचे बदल व्यवस्थेत करणं कठीण होतं. त्यामुळं देशाला यशशिखरावर नेतानाच, प्रेरक नेतृत्व करतानाच भ्रष्टाचार-घोटाळेमुक्तभारत घडवणं, सामान्यांशी संवाद साधणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आवाज बुलंद करत आपल्या सीमांना अधिक बळकट करण्याचं काम या काळात घडताना दिसतंय. हीच काळाची गरज आहे.

प्रतीक्षा माळकर
vv22दिवस कसे गेले ते कळलंच नाही. हा हा म्हणताना २०१५ आलंदेखील. या वर्षभरात खूप काही बदल झालेत. देश आणि राज्य पातळीवर निवडणुका झाल्या. त्यात मीही माझं मत देऊन माझा खारीचा वाटा उचलला होता. केवळ मीच नव्हे तर माझ्या मत्रिणी आणि एकूणच तरुणाईनं आपला मतदानाचा हक्क सजगपणं बजावला. या वर्षभरात काही प्रमाणात कायद्यांतही बदल झाले. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काही पावलं उचलण्यात आलेली दिसली. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाबाबत समाजात थोडी जागरूकता आलेली दिसली. मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता हे दोन्ही घटक समान आहे, अशी काहीशी जाणीव होताना दिसली. शिक्षण आणि करिअरविषयक प्रश्न हाताळले गेले.

अथर्व दीक्षित
vv23अर्जेटिनाला (मेंडोझा) आयोजित झालेल्या International Junior Science Olympiad sqru मध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूनं सहा सुवर्णपदकं पटकावली. तीसहून अधिक देशांतून सहभागी झालेल्या दीडशे स्पर्धकांमधून भारतीय मुलं अव्वल ठरली. विज्ञान क्षेत्रात जागतिक पातळीवर आपली तरुणाई अग्रस्थानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इस्रोनं प्रक्षेपित केलेलं मंगळयान २४ सप्टेंबर २०१४ रोजी यशस्वीरीत्या मंगळाच्या कक्षेत स्थिरावून कार्यान्वित झालं. भारत हा पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिमेत यश संपादन करणारा पहिलाच देश ठरला. या घटनेमुळं संपूर्ण जगानं भारतास मानाचा मुजरा केला. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपली तरुण पिढी ठअरअ मध्ये काम करण्याचं स्वप्न पाहत असे. पण आता मात्र इस्रोमध्ये काम करून अंतराळ क्षेत्रात आपल्या राष्ट्रास अव्वलस्थानी नेण्यासाठी तरुण पिढी प्रयत्नशील झाली आहे.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.