29 November 2020

News Flash

सदा सर्वदा स्टार्टअप : तयार संकल्पनांची किमया!

आज या भागात आपण स्टार्टअप मार्केटिंग प्लॅन टेम्पलेटबद्दल बोलूया. 

डॉ. अपूर्वा जोशी

आजकालच्या धावपळीच्या जगात तयार साचेबद्ध संकल्पना उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरतात. यातलीच एक महत्त्वाची म्हणजे मार्केटिंग टेम्पलेट.  स्टार्टअप यशातला एक मूलभूत मंत्र म्हणजे ठोस विपणन योजना म्हणजेच मार्केटिंग प्लॅन तयार करणे आणि त्यानुसार काम करणे. तुम्ही विनिंग प्रोसेस कोठे प्रारंभ करता ज्यामुळे वास्तविक परिणाम मिळतील? यशस्वी स्टार्टअप प्रवासासाठी आज या भागात आपण स्टार्टअप मार्केटिंग प्लॅन टेम्पलेटबद्दल बोलूया.

मार्केटिंग प्लॅन तयार नसणं स्टार्टअपला परवडू शके ल का?

कोणत्याही स्टार्टअपला अशा पद्धतीचे ‘स्टार्टअप मार्केटिंग प्लॅन टेम्पलेट’ थोडं पॉलिश करून स्वत:चा मार्केटिंग प्लॅन बनवल्याशिवाय व्यवसायाच्या क्षेत्रात उतरणे परवडणार नाही. लक्षात घ्या की तुमच्या यशाचे नव्वद टक्के  श्रेय विपणन म्हणजेच मार्केटिंगवर अवलंबून आहे. मार्केटिंग ही फक्त कल्पना नाही, तुमच्याकडे बँकेतअसलेले भांडवलही नाही, कार्यसंघाचा म्हणजे टीमचा बुद्धय़ांक (कद) नाही किंवा बाजार किती मोठे आहे याबद्दलची कल्पना नाही. या सर्व गोष्टी म्हणजे तुमचा खरं तर व्यवसायाचा पाया आहे. तुम्ही या इतर सर्व विभागांमध्ये किंचित कच्चे असाल, पण जोपर्यंत तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग मजबूत असेल तोपर्यंत तुम्ही एक फायदेशीर आणि मौल्यवान व्यवसाय उभारू शकता.

इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे व्यवसायात कुठलीही योजना नसणे म्हणजे अयशस्वी होण्याची योजना आखणे असे आहे. तुम्ही मार्केटिंगमध्ये अयशस्वी झाल्यास तुमच्या व्यवसाय कल्पनेचा काही उपयोग नाही. मार्के टिंग प्लॅन अनेक कारणांसाठी आवश्यक ठरतो. सर्वात स्पष्ट म्हणजे दिशा मिळवण्यासाठी. तुम्ही काय करताय हे तुम्हाला जाणून घेता येईल आणि त्याची किमान चाचपणी करता येईल. तुमच्या टीमला निर्देशित करण्यासाठी आणि त्यांना फोकस देण्यासाठी मार्केटिंग योजनेचा वापर करा. मार्के टिंग प्लॅनद्वारे कार्य केल्याने तुम्ही गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत नाही ना हेही सुस्पष्ट होईल. प्लॅन तुम्हाला भविष्यातल्या मोठय़ा चित्रावर अधिक स्पष्टता देतो, तुमची गृहितं प्रमाणित करता येतात आणि आवश्यक तपशील प्रदान करतात. ब?ऱ्याच व्यवसायांमध्ये खूप वेळ आणि रिसोर्सेस (संसाधने) चुकीच्या दिशेने खर्च झाले तरीही तग धरून राहणे शक्य असते.

संभाव्य गुंतवणूकदार आणि इतर संस्थांसाठी मार्केटिंग प्लॅनदेखील एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी आवश्यक होमवर्क तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही बनवलेली योजना व्यवहार्य आहे की नाही हे तुम्हाला दाखवून देता येते. मार्के टिंग प्लॅनमुळे एक आर्थिक मॉडेलही तुम्ही उभे करू शकता, जेणेकरून तुम्ही योग्य प्रकारे बजेट करू शकता आणि तुम्ही  ज्या मार्केटिंगमध्ये गुंतवणूक कराल त्यामधील परताव्याचे अधिक चांगले मूल्यांकन करू शकता. मार्केटिंग उत्तम केल्याने यशस्वी झालेल्या काही कंपन्यांमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन, प्रॉक्टर अँड गॅम्बल, कॅडबरी, नेसले, पेप्सी या कंपन्यांचा उल्लेख के ला जातो.

‘स्टार्टअप मार्के टिंग प्लॅन टेम्पलेट’ कसा वापरावा?

मार्के टिंग प्लॅन टेम्पलेटचा आढावा (ओव्हरव्ह्य़ू)

योजनेचा आणि त्या कशासाठी डिझाइन केल्या गेल्या आहेत त्याबद्दलचा काही थोडय़ा वाक्यांत आढावा द्यावा.

ध्येय

या योजनेने तुम्हाला कोणती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत होईल? तुमचे ए टु झेड पॉईंट्स काय आहेत? तुम्ही कोठे आहात आणि तुम्ही कोणते मेट्रिक टार्गेट करत आहात?, स्टार्टअप मार्केटिंग प्लॅन टेम्पलेटचा हा मुख्य घटक आहे.

चालू काळातलं मार्केटिंग अ‍ॅनालिसिस आणि ऑडिट

तुमच्या सध्याच्या ब्रँड आणि मार्केटिंग असेट्स – इनिशिएटिव्ज ऑडिट करण्यासाठी एखादा थर्ड पार्टीचा अभिप्राय मिळविणे खरोखर उपयुक्त ठरेल. तुमच्याकडे काय आहे? काय चांगल्या गोष्टी आहेत? काय सुधारणा आवश्यक आहेत?, याबद्दल या विभागात खरोखरच अचूक आणि नि:पक्षपाती पुनरावलोकन तुम्ही के ले पाहिजे.

कॉम्पिटिटिव्ह मार्केट अ‍ॅनालिसिस आणि ‘स्वॉट’

आज तुमच्या बाजाराचे लँडस्केप कसे दिसते? ते कसे बदलते आहे? ते इथून पुढे कोठे जाऊ शकते? तुमच्या व्यवसायाची बाजारातील इतर प्रतिस्पध्र्यांशी तुलना करा. हा अभ्यास तुमचे सामथ्र्य (स्ट्रेंथ), दुर्बलता (विकनेस), संधी (ऑपॉच्र्युनिटीज) आणि धोके (थ्रेट्स) म्हणजेच ‘स्वॉट’ ठरवेल. इथेही हे अ‍ॅनालिसिस नि:पक्षपाती, अचूक आणि ताज्या संशोधनावर आधारित असणे आवश्यक आहे.

टार्गेट मार्केट्स

मागील सर्व लक्षात घेऊन कोणते मार्के ट टार्गेट करणं योग्य आहे?  मार्के टचा आकार समजून घेण्यासाठी तुम्ही जे मार्के ट पहिले टार्गेट कराल ते समजून घेण्यासाठी एकूण मार्के टपासून त्यातल्या एकूण अ‍ॅड्रेसेबल मार्के टपर्यंत तपशिलाचा बारकाइने अभ्यास करा. तुमचा आयडियल कस्टमर कोण असेल, कसा असेल, याचा शोध घेण्यासाठी लहानसहान तपशील लक्षात घ्या. यामुळे तुमची  स्टार्टअप मार्केटिंग प्लॅन टेम्पलेट आणखी विस्तृत होईल.

आवश्यक मार्केटिंग मटेरिअल

तुम्हाला मार्केटिंग कॅम्पेन सुरू करण्यासाठी मार्केटिंग मटेरिअलचे कोणते भाग एकत्रित करणे आवश्यक आहे, किंवा तुमच्या सुरु असलेल्या मार्केटिंग कॅम्पेनला बॅकअप म्हणजे पाठिंबा देत प्रत्यक्ष उत्पन्नात कन्व्हर्जन कसं करता येईल?, याचा विचार करायला हवा.

मार्केटिंग चॅनल्स

चाचपणी करता येतील अशा चार ते पाच मार्के टिंग स्ट्रॅटेजी आणि त्यासाठीचे चॅनेल्स सूचिबद्ध करा.

क्रमश:

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:02 am

Web Title: startup marketing plan template zws 70
Next Stories
1 रास ना रंग
2 वस्त्रांकित : लेवु लेणं चंद्रकळेचं!
3 क्षितिजावरचे वारे :  स्टिअर क्लिअर..