चांगले अन्नसंस्कार आणि योग्य व्यायाम याचा रोजच्या जगण्यात समावेश केला तरच हेल्दी लाईफस्टाईल अचिव्ह होईल. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे योग्य असेल तसा व्यायाम करावा. तुम्ही स्टार्सना फॉलो करता. पण तसं ग्लॅमरस दिसण्यासाठी, फिट राहण्यासाठी त्यामागे त्यांची किती मेहनत असते ते तुम्हाला माहिती नसतं.
इंटरनेट, गुगल सर्च, फेसबुक, ऑनलाईन चॅट. आजची लाईफस्टाईल ही एवढीच झाली आहे. या सगळ्यामुळे आजची तरुणाई थोडी घरकोंबडी झालीय. इनॅक्टिव्ह बनलीय. सगळ्यात वाईट म्हणजे त्यांच्यावर जाहिरातींचा फार मोठा प्रभाव आहे. मी नुकतीच पाहिलेली एक अत्यंत वाईट जाहिरात मला आत्ता आठवतीय. मुलं क्रिकेट खेळायला घराबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. तेवढ्यात त्यांचे वडील घरी येतात आणि मग क्रिकेटची बॅट टाकून देऊन कॉम्प्युटरची जॉयस्टिक हाती येते. अजिबात जागचं न हलता खेळण्यासाठी ते सगळे घरातच बसतात. आजचं आयुष्य हे असंच झालं आहे. त्यात मग अल्कोहोल, स्मोकिंग असे पाश्चिमात्य देशातले ट्रेंड्स येऊ लागलेत. पण पाश्चिमात्य देशांचं अंधानुकरण करताना आपण एक गोष्ट सोईस्कर विसरतो. तिथे तरुण मुलं- मुली भरपूर आउटडोअर गेम्स खेळतात. ते सायकल वापरतात, भरपूर चालतात, स्केट्स वापरतात. फिटनेसबाबत जागरुक असतात. आपण मात्र त्यातली मजा तेवढी घेतो आणि वर्कआऊटची मेहनत सोईस्कर विसरतो.
फिटनेस हा जीवनशैलीचा एक भाग बनवणं आवश्यक आहे. जसं रोज दात घासणं आहे तसंच व्यायाम हा रोजच्या जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. तुम्ही दात घासले नाहीत तर ते किडतील आणि पडतील. तुमच्या शरीराचंही तसंच असतं. योग्य व्यायामाविना त्याचा शेप बिघडतो. तुम्ही अनफिट होता. मग एकेक दुखणी मागे लागतात.

फिटनेससाठी आपण काय केलं पाहिजे ?
* आपल्या कुटुंबानंच व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे. आई-वडिलांनीसुद्धा व्यायम केला म्हणजे मुलांसमोर योग्य आदर्श राहील.
* फिट राहण्यासाठी वेगेवगळे मार्ग आहेत. सालसा, जीम, टीआरएक्स सस्पेन्शन ट्रेिनग, स्पििनग, किक बॉक्सिंसग, सायकिलग, पॉवर योगा असे नवे पर्याय तुम्ही ट्राय करू शकता.
* जंक फूड कितीही आवडलं, तरी त्यापासून कटाक्षानं दूर राहिलं पाहिजे.
* चांगले अन्नसंस्कार आणि योग्य व्यायाम याचा रोजच्या आयुष्यात तरुणपणापासून समावेश केला तर तुमच्या लाईफस्टाईलचा तो भाग होईल. जसे रोज दात घासतो तसा रोज व्यायाम केला तर तो हेल्दी लाईफस्टाईलचा भाग होईल.
* रेग्युलर एक्सरसाईज करणारयाचे केस चांगले असतात. त्वचाही तुकतुकीत राहते. व्यायामामुळे चांगलं पोश्चर मिळतं, बुद्धीमत्ता, पॉझिटिव्ह अटिट्यूड मिळतो. परीक्षेमध्ये कामी येणारा अ‍ॅलर्टनेसही रेग्यूलर व्यायामातून येतो.
* तुम्ही स्टार्सना फॉलो करता. त्यांना आदर्श मानता. पण तसं ग्लॅमरस दिसण्यासाठी, फिट राहण्यासाठी त्यामागे त्यांची किती मेहनत असते ते तुम्हाला माहिती नसतं.
व्यायाम कसा असावा?
प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे व्यायामप्रकार आणि त्याचं प्रमाण बदलतं. आपल्या शरिराला, आरोग्याला आणि लाईफस्टाईलला योग्य असा व्यायाम केला तर त्याचे फायदे मिळतील. प्रत्येकानं स्वतच्या प्रकृतीमानुसार व्यायाम केला पाहिजे. फक्त कोणा स्टारची कॉपी करू नये. व्यायाम करताना तज्ज्ञाच्या सल्ल्यानं करावा, जीम जॉईन केली असेल तर तिथे योग्य ट्रेनरच्या सल्ल्यानंच वर्क आउट कराव. आपण आपल्या मनानं करू नये.